पाठ १२ – रंग मजेचे रंग उदयाचे
As a result of globalization, a human being appears to be more connected to technology than nature. The preservation of nature and the environment should be the first priority of a human being. Only then can he live a satisfied life. The poetess has tried to elaborate on this understanding in her poem.
सृष्टी – जग.
पुष्टी – दुजोरा, पाठबळ.
वृष्टी – पाऊस.
फेनधवलशा – फेसाप्रमाणे पांढऱ्या.
अनोखी – निराळी, वेगळी.
तुष्टी – तृप्ती.
फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी
रंग मजेचे, रंग उदयाचे, जपून ठेवू सृष्टी…
अर्थ : निसर्ग हा खरा जादूगार आहे. त्याच्या जादूई दुनियेमध्ये रंगा-गंधाचे साम्राज्य पसरले आहे. आभाळाची दुलई, पाण्याची आणि वाऱ्याची अंगाई ऐकत धरतीच्या निळाई मांडीवर फुलाफुलांचे म्हणजेच अनेक रंगाच्या फुलांचे बाग बगीचे आपण फुलवूया आणि हे बगीचे फक्त एका ठिकाणी फुलवायचे नाहीत तर कवयित्रीच्या मते जिथे जिथे नजर पोचते तेथे तेथे उद्याच्या भविष्याचे रंग, उद्याच्या मजेचे रंग आपण फुलवूया म्हणजेच निसर्गाच्या रंगात आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून जो आनंद, जी मजा मिळणार आहे. अशी एक सुंदर सृष्टी आपण उद्याच्या भविष्यासाठी जपून ठेवूया.
English Translation:
Nature is a real magician. In his magical world, the kingdom of color and smell is spread. Listening to the sound of the sky, the movement of water and the wind, let us bloom the garden of flowers, i.e. flowers of many colors, on the blue lap of the earth, and these gardens should not be made to bloom only in one place, but according to the poet, wherever the eye can see, let us make the colors of tomorrow’s future, the colors of tomorrow’s fun, that is, in the colors of nature and The joy and fun of being in the closeness of nature. Let us preserve such a beautiful creation for tomorrow’s future.
धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी…
रंग मजेचे, रंग उदयाचे
अर्थ : कवयित्री म्हणते आजचे युग कितीही आधुनिक झाले, तंत्रज्ञान विकसित झाले तरी निसर्ग तुमचा खरा मित्र आहे. तुमचा पोषण कर्ता आहे. कारण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संगणकाची निर्मिती झाली. पण हा संगणक तुम्हांला धान्य देऊन तुमचे पोषण करू शकत नाही. तर काळी आई म्हणजेच धरतीमाता आपण जगवली तरच आपण जगू शकतो. तीच खरी आपले पोषण करणारी जननी आहे. तिला आपण जगवूया असे कवयित्री सांगते. या काळ्या मातीमध्ये जे हात खऱ्या अर्थाने राबतात, कष्ट करतात आणि तिचे संगोपन करतात अशा शेतकऱ्याचे भूमिपुत्राचे सुद्धा आपण संरक्षण केले पाहिजे त्याच्या कष्टांना पाठबळ, दुजोरा दिला पाहिजे. तरच आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे रंग व जीवनातील मजेचे रंग पाहायला मिळतील आणि ही धरती खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होऊन इथला मनुष्यप्राणी सुखी होईल.
English Translation:
The poetess says that no matter how modern the age is, no matter how technology is developed, nature is your true friend. You are the nurturer. Because the development of technology led to the creation of computers. But this computer cannot feed you with grain. So we can live only if we live the black mother i.e. Mother Earth. She is the true mother who nourishes us. The poet says that we will live here. We should also protect the farmer, the son of the soil, who really works in this black soil, works hard and nurtures it. Only then we will see the colours of tomorrow’s bright future and the colours of fun in life and this earth will be truly prosperous and the human beings here will be happy.
उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे
गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी…
रंग मजेचे, रंग उदयाचे
अर्थ : झाडे लावा, झाडे जगवा. हा मंत्र सत्यात उतरविण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कोणती कृती केली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणते की, आपण आपल्या देशामध्ये पिकणारी, उगवणारी जी फळे, फुले आहेत, ज्या बिया आहेत त्या आपण डोंगरावर, पर्वतावर उधळूया म्हणजे डोंगरावर त्या रुजतील आणि देशी झाडांनी आपली जंगले परत गच्च भरून जातील, माजतील ज्यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि वृष्टी होईल, भरपूर पाऊस पडला तर ही सृष्टी हिरवी समृद्ध होईल आणि समृद्ध अशा भविष्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल.
English Translation:
Plant trees, live trees. Telling what action we should take to make this mantra come true, the poetess says that we should scatter the fruits, flowers, and seeds that grow in our country on the mountains, so that they will take root on the mountains and our forests will be filled with native trees. Go, wash which will stop soil erosion and rain, if there is plenty of rain this creation will be green and prosperous and our dream of a prosperous future will be fulfilled.
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
रंग मजेचे, रंग उदयाचे
अर्थ : आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे, त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दुःखे विसरून जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने जावू. खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली दुःखे राहणारच नाही. किंबहुना त्यांना पाहिल्यावर कसे राहू आपण कष्टी? असाच प्रश्न कवयित्री आपल्याला विचारते आहे.
English Translation:
Due to the rain falling from the sky, the water will flow from the mountains. When we see the waterfalls flowing from the mountain valleys, the white frosts gushing out of them like foam, we will forget all our sorrows and go in the true sense of nature. By seeing the flowing water, we will also be filled with laughter and our sorrows will be gone. In fact, when we see them, how can we be hardworking? A similar question is being asked by the poetess.
मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती
आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी…
रंग मजेचे, रंग उदयाचे
अर्थ : तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा, दौलत मिळेल पण त्या कागदी नोटांना समाधानाचा, तृष्टीचा गंध येणार नाही. त्यातून स्पर्धा, अवहेलना वाढेल. दुसऱ्याचे दु:ख जाणून घेण्याची मनाची दौलत तिथे नसेल. परंतु निसर्गाच्या सान्निध्यात एकाच आभाळाच्या छत्राखाली आपण सारे भेदभाव विसरून जाऊ, कुणी लहान-मोठा, श्रीमंत, गरीब राहणार नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई असे म्हणण्यातच आपल्याला खरी तुष्टता, समाधान मिळेल आणि एकत्वाच्या छत्राखाली आपण उदयाच्या भविष्याचे, आनंदाचे रंग जपून या सृष्टीलाही जपून ठेवू.
English Translation:
Technology will give us money, wealth, but those paper notes will not smell of satisfaction, desire. It will increase competition, contempt. The wealth of mind to know other’s suffering will not be there. But in the presence of nature, under the umbrella of one sky, we will forget all discrimination, no one will be small or big, rich or poor. We will get true contentment and satisfaction only in saying that we are the children of the sky, the black soil is the mother, and under the umbrella of unity, we will preserve the colors of the future of Udaya and happiness and preserve this creation as well.
हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी…
रंग मजेचे, रंग उदयाचे
अर्थ : या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सान्निध्यात सान्यांची मने हिरवी होतील, आनंदी होतील. नवीन विचारांनी, सुखासमाधानाने भरून जातील आणि या आनंदाच्या विविध छटा आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहता येतील. पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगरावर उधळलेल्या बियांमुळे झाडे निर्माण होतील. घनदाट जंगले तयार होतील व त्यामुळे भरपूर वृष्टी होईल. त्यामुळे सर्वत्र उगवलेल्या गवताची रेशमासारखी नाजूक, मऊ पाती डोलतील. हिरव्यागार धरणीमुळे मनाला समाधान मिळेल. निसर्गसौंदर्यामुळे जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल. आपली मनेही हिरवी हिरवी अर्थात प्रसन्न होतील. आपण सर्व जगाला या हिरवाईचा आनंद सांगूया. सगळ्या जगाला आनंदी करत आपण उद्याच्या भविष्याचे, आनंदाचे रंग जपून या सृष्टीलाही जपून ठेवू.
English Translation:
Under the umbrella of this blue sky, the hearts of children will become green and happy in the presence of nature. You will be filled with new thoughts, happiness and you will see different shades of this happiness around you. Trees will grow from the seeds scattered on the mountain to protect the environment. Dense forests will form and it will rain heavily. So the delicate, soft leaves of the grass growing everywhere will sway like silk. A green dam will give satisfaction to the mind. Natural beauty will also bring real joy of living. Our hearts will also be green and happy. Let us tell the world the joy of this greenery. By making the whole world happy, we will preserve the colors of tomorrow’s future and happiness and preserve this creation as well.
कृती
(१) (अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
उत्तर:
(आ) आकृती पूर्ण करा.
उत्तर:
(२) चौकटी पूर्ण करा.
(अ) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण
उत्तर: ताटवे
(आ) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट
उत्तर: सृष्टी
(३) कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) आभाळाचे छत्र ______
उत्तर: पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन
(आ) गर्भरेशमी सळसळ ______
उत्तर: हिरव्या पानांची, हिरव्याशार गवताची वाऱ्यामुळे सळसळ.
(४) कृती पूर्ण करा.
(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
उत्तर: मातीमध्ये जे हात राबती तयांस देऊ पुष्टी.
(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: यंत्रांच्या संगतीने काय मिळणार आहे ?
(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
उत्तर: सृष्टी दृष्टी, वृष्टी-कष्टी, तुष्टी-गोष्टी..
(५) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’
उत्तर: या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सान्निध्यात सान्यांची मने हिरवी होतील, आनंदी होतील. नवीन विचारांनी, सुखासमाधानाने भरून जातील आणि या आनंदाच्या विविध छटा आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहता येतील. पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगरावर उधळलेल्या बियांमुळे झाडे निर्माण होतील. घनदाट जंगले तयार होतील व त्यामुळे भरपूर वृष्टी होईल. त्यामुळे सर्वत्र उगवलेल्या गवताची रेशमासारखी नाजुक, मऊ पाती डोलतील. हिरव्यागार धरणीमुळे मनाला समाधान मिळेल. निसर्गसौंदर्यामुळे जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल. आपली मनेही हिरवी हिरवी अर्थात प्रसन्न होतील. आपण सर्व जगाला या हिरवाईचा आनंद सांगूया. सगळ्या जगाला आनंदी करत आपण उदयाच्या भविष्याचे, आनंदाचे रंग जपून या सृष्टीलाही जपून ठेवू.
‘हिरवी मने’ या शब्दाने प्रफुल्लितता दर्शवून आशयसौंदर्य निर्माण झाले आहे. गर्भरेशमी सळसळ या शब्दप्रयोगामुळे भाषिक सौंदर्य वाढले आहे. हिरव्या छटांच्या विलोभनीय आविष्काराने जगण्याच्या गोष्टी जगतास सांगून निसर्गाला जोपासण्याची प्रेरणा दिली आहे.
Under the umbrella of this blue sky, the hearts of children will become green and happy in the presence of nature. You will be filled with new thoughts, happiness and you will see different shades of this happiness around you. Trees will grow from the seeds scattered on the mountain to protect the environment. Dense forests will form and it will rain heavily. Therefore, the delicate, soft leaves of the grass growing everywhere will sway like silk. A green dam will give satisfaction to the mind. Natural beauty will also bring real joy of living. Our hearts will also be green and happy. Let us tell the world the joy of this greenery. By making the whole world happy, we will preserve the colors of Udaya’s future and happiness and preserve this creation as well.
The term ‘green mind’ has created content beauty by expressing exuberance. Linguistic beauty has been enhanced by the use of Garbha Reshami Salsala. The fascinating invention of shades of green has inspired the cultivation of nature by telling the world the story of survival.
(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तर: पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा हरितक्रांती व औदयोगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.
Humans have set the stage to destroy the ecological balance on earth. Slaughter of trees, concretization, heavy use of plastic, pollution etc. Earth is threatened by problems. There is no rain as there is no balance of environment. The water problem is dire. In such a situation it is necessary to protect the earth. Afforestation, preventing the killing of trees, banning plastic, such measures can prevent many problems. Green revolution and industrial revolution such as curbing the growing population, planting trees in villages, increasing water reserves, building wells, proper disposal of e-waste, separating wet and dry waste, using biogas, using solar energy, limited appropriate use of technology. Earth can be saved. Earth is mother, everyone should respect and take care of her.
(इ) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतात. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(१) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(२) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(३) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(४) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके.
(५) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.
Vasundhara looks beautiful in a green shawl. Various green shades of greenery, fields, fields and grass open up the nature. The following measures can be taken to preserve the greenery of Vasundhara.
(1) With the promise of ‘plant trees, live trees’, if everyone keeps the scale of ‘one person, one tree’, Vasundhara will be greener.
(2) Fruit seeds should be scattered in open spaces, on hills.
(3) Official land for orchards and forests should be maintained and saplings should be planted there.
(4) Do not use materials that reduce or destroy soil quality. e.g. Plastics, Thermocol, overused pesticides.
(5) Water reservoirs should be created in places, so that the plants will get water in addition to monsoons. Our existence depends on the greenness of Vasundhara. Awareness of this should be made in the mind of every citizen.