पाठ ११ – जंगल डायरी
Jungle Diary is written by Atul Dhamankar. Thrilling experiences are mentioned, of a jungle safari at Tadoba Sanctuary. The motherhood of a tigress is beautifully depicted in this lesson.
आश्वासक – खात्री देणारा.
उत्साहाला उधाण येणे – खूप आनंद होणे.
दंगाधोपा – दंगामस्ती.
कृती
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.
(१) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(२)
(३)
(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्येबिबळ्या बसला होता.
(५)
(६)
(७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.
उत्तर:
(१) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(२) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.
(३) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्येबिबळ्या बसला होता.
(५) बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.
(६) त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.
(७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.
(२) कारणे लिहा.
(अ) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण…..
उत्तर: वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.
(आ) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण…..
उत्तर: वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.
(३) विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.
उत्तर:
(i) तिखट – कान
(ii) खेळकर – पिल्लं
(iii) वाळक्या – काटक्या
(iv) दाट – जंगल
(v) अनामिक – दडपण
(४) स्वमत.
(अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर: अतुल धामनकर यांनी ‘जंगल डायरी’ या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करतांना आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन तसेच वाघिणीत दिसलेल्या ‘आईची झलक’ मार्मिक पणे व्यक्त केली आहे.
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारासाठी गेली होती. संभाव्य शत्रूंच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा दंगाधोपा सुरू होता. थोड्यावेळाने शिकारीपर्यंत पिल्लांना नेण्यासाठी ती उठली. बाबूंच्या गंजीत जिथे शिकार ठेवली होती तिथे पिल्ले आपल्यासोबत येताहेत की नाही हे पाहिले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली पण अद्याप दोघे पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. वाघिणीने चारही पिल्ले आपल्याबरोबर येताहेत याची पूर्ण खात्री केली. बाकीची दोन्ही पिल्ले आपला खेळ थांबून आईच्या मागे पळत सुटली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे वाघिणीनेही जबाबदारीने केले होते. आईचे कर्तव्य निभावले होते. त्याला वाघिणीतील आईची झलक अशाप्रकारे जाणवली.
In the text ‘Jungle Diary’, Atul Dhamankar has poignantly described the various experiences he had while observing the animals in the forest and the mother’s glimpse seen in the tigress.
The tigress hid the cubs in the thick purple bushes of the river bank and went hunting. The mother hid the cubs in a safe place from the attack of potential enemies. After the hunt, she sat straight in the water. The children were rioting. After a while, she got up to lead the cubs to the hunt. In Babu’s ganji, where the prey was kept, he saw whether the cubs were coming with him or not. The two cubs followed her but were still playing in the water. The tigress called back to them. The tigress made sure that all four cubs came with her. The other two cubs stopped their play and ran after their mother. The writer observed her love and care, and he got to see a glimpse of the mother in her.
(आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तर: जंगल डायरी या पाठात अतुल धामनकर यांनी चंद्रपूर येथील जंगल प्रसंगाचे जीवंत चित्रण शब्दबद्ध केले आहे.
वाघीण चारही पिल्लांना वाघ, बिबळा, रानकुत्री यांच्यापासून धोका असल्याने नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीला गेली होती. तिने पिल्लांसाठी खास खबरदारी घेतली होती. ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली. थकलेली वाघीण पाण्यात विश्रांतीसाठी बसली. पण पिल्लांना आईला बघून उधान आले. त्यातील एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. तिथून ते घसरले व धपकन पाण्यात पडले. वाघिणीच्या तोंडावर पाणी पडल्याने तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्ले खेळतच होती. आईच्या भोवती दंगाधोपा चालू होता. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे, आईला मायेने चाटणे असे खेळ चालू होते. आईच्या भेटीने लपवून ठेवलेली पिल्ले मनमोकळेपणाने खेळत होती.
In the text Jungle Diary, Atul Dhamankar has verbalized the vivid depiction of the jungle situation in Chandrapur.
The tigress had gone hunting by hiding all four cubs in the thick purple bushes on the bank of the river, as they were threatened by tigers, panthers, and wild dogs. She had taken special precautions for the puppies. She wandered in the forest all night and came back to the cubs. As soon as she heard the mother’s call, the cubs, who were still hiding, playfully jumped towards her. The tired tigress sat down to rest in the water. But the cubs woke up after seeing their mother. One of the cubs jumped on the tigress’s back. From there, they slipped and fell into the water with a splash. As the tigress’s mouth watered, she expressed her disapproval. But the cubs were playing. A riot was going on around the mother. There were games like chasing each other, jumping in the water, and licking the mother with love. The cubs, hidden by their mother’s visit, were playing freely.
(इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर: डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.
A diary is a personal journal. It is always useful to keep a record of the salient things we do every day from the time we wake up in the morning to the time we go to sleep. Writing a diary provides a summary of the day. Good and bad things are recorded. Diary is used to correct the mistakes made till date. With the record of good things, while reading them again and again, the mind feels satisfied and inspired.
उपक्रम :
(१) सुनीताबाई देशपांडे यांचा ‘दर्शनमात्रे’ हा लेख मिळवून वाचा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.
(२) ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे कृष्णमेघ कुंटे यांचे पुस्तक मिळवून वाचा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.