पाठ – जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
Jagna Cactus Che is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cacti, their utility, and their adaptation to less water. He has offered detailed information about the cactus.
दुर्भिक्ष – अभाव, कमतरता, दुष्काळ.
मरुभूमी – वाळवंट.
कृती
(१) ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर: जगणं कॅक्टसचं या पाठात वसंत शिरवाडकर यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे.
साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो. वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.
In this lesson on living cactus, Vasant Shirwadkar has given special information about cactus in the desert region. It has been proved that nature is a great magician.
Generally, a plant cannot survive without water. There is very little water in the desert. But nature is a magician. Even in that little water it makes the plants flourish. Animals live there. There is a special kind of life in the desert region. Plants and animals can live there too. The red-yellow flowers on the cactus plants are picturesque. Life in the desert is truly one of the wonders of the earth. That is why nature is truly a great magician who creates life even in adverse conditions.
(२) ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तर: वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन- दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटात सूर्य आग ओकत असतो. हवा तापलेली असते. सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. पण पावसाची वाट पहात बियांच्या रूपाने मातीत पडून रहायचे हा कॅक्टसचा गुणधर्म असतो. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वतः मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते. मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’.
Desert regions receive only one rainfall per year. Sometimes there is no rain for two-two, three-three years, and the sun burns in the desert. The air is hot. Leaves, flowers, grass are cut in the sun’s fire. In the desert there is a barren, luxuriant life. But it is the property of cactus to remain in the soil in the form of seeds waiting for rain. Cactus is drought resistant. It would store whatever water it got and grow very slowly during the dry season. Such is the survival alchemy of cactus. Saguaro cactus lives for 200 years. Cactus has a water storage structure. He stores as much water as he gets. Its entire structure is made to store water. Desert land absorbs very little water when it rains. Therefore, cactus roots have a special structure that can absorb a lot of water in a short time. It absorbs water from the surrounding area by spreading its roots long. Most of the water in the plant is lost to their leaves through evaporation, so the cactus plant has removed the leaf itself. That is why it is said ‘Cactus is the epitome of how to grow on little water!’
(३) टिपा लिहा.
उत्तर: सवारी कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचा अगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोड़ा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो.
सग्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत सग्वारो कॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खाद्य असते.
The riding cactus is a very special representative of the desert region. Among the many varieties of cactus, the saguaro is considered the king of cactus. It grows to a height of 50 feet. It grows so slowly that it grows only 3 feet in 50 years and lives for 200 years. The flowers of the saguaro cactus are marigolds that make the barren desert beautiful for a while. The saguaro cactus bears fruit. Its heat is like Kalingada. The saguaro cactus looks like a giant doll standing with arms raised.
The saguaro cactus was used by the American Red Indians. During the dry season, the cactus is squeezed and its water is extracted and the water is drunk to quench the thirst. The fruits of the saguaro cactus are edible because they are similar to kalingada. Sugar can be added to the pulp of the fruit to preserve it as a moravali. It is a staple food of the Red Indians.
(४) वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.
उत्तर: वाळवंटी प्रदेशात कॅक्टसचे रोप लहान असते तेव्हा त्याला दोन चार लहान पाने येतात. नंतर ते कॅक्टस बिनपानांचे राहते. याचे मुख्य कारण म्हणजे झाडाचे बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात त्यामुळे कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडाच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. तसेच वाळवंटातून प्रवास करणारे लोक तहान भागवण्यासाठी कॅक्टसचे घट्ट साल सोलून त्यातील गरातील पाणी पितात. पण त्याचे काटे फार धारदार असतात. ते सारे तोडून काढून फक्त वाटीभर पाणी मिळवणे खूप त्रासाचे असते. अगदी निरुपाय झाला तरच प्रवासी ही मेहनत घेतो. जनावरांनी ओरबाडून खाऊ नये म्हणून ह्या झाडांनी काट्यांची शस्त्रे केली आहेत.
When a cactus plant is young in a desert region, it produces two or four small leaves. Later that cactus remains leafless. The main reason for this is that the plant loses most of its water to its leaves through evaporation, so the cactus plant has removed the leaf itself. A cactus plant has juicy sap, so it is prone to being attacked by animals. As a precaution for this, sharp thorns are spread on the body of the cactus tree. Also, people travelling through the desert peel the hard bark of the cactus and drink its hot water to quench their thirst. But its thorns are very sharp. It is very difficult to break all of them and get only a bowl of water. The traveler takes this effort only if it becomes worthless. These trees are armed with thorns so that they are not scratched and eaten by animals.
(५) ‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर: पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू- पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
A synonym for water is ‘life’. It shows the priceless importance of water. If there is no water in life, man will die of thirst. There will be no cleanliness. Animals, birds, trees, and nature will not survive. All creation will be destroyed. Deserts and barren plains will be created. There will be no life. The creation of aquatic animals will be destroyed. The sun will produce more heat. There will be big cracks in the ground. There will be chaos all around. Life itself will end. So it is the responsibility of all of us to use water properly.