पाठ ९ – घर
Through this poem, the poet gives us the noble message of ‘what a home is’. Home is not the brick walls and things within it. It is the close knit, sacred bonds of the members that makes it a ‘home’.
देखण्या – सुंदर
वास्तू – इमारत
ओल्या भावना – प्रेमळ भावना
जिव्हाळा – प्रेम
दु:खाचा डोंगर चढणे – दु:खाला सामोरे जाणे
जवळ करणे – स्वीकारणे
अपार – अमाप
गप्पिष्ट – गप्पा करणारे
चविष्ट – चव असलेले
स्वाध्याय
प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
उत्तर: ज्या घरात जिव्हाळा आहे त्या घरात माणसांची पहिली शिक्षणाची शाळा सुरू होते.
(आ) घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
उत्तर: घराने म्हणजेच घरातील माणसांनी काळाचे भान ठेवून त्याप्रमाणे नवीन मूल्ये व नवीन ज्ञान या गोष्टी जवळ कराव्यात.
(इ) आईच्या हातचे जेवण कसे असते?
उत्तर: आईच्या हातचे जेवण चविष्ट असते.
प्र. २. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
उत्तर: घर ही एक आनंदी वास्तू असून त्यातील सुंदर कृती, प्रेमळ भावना, जिव्हाळा यांनी युक्त असते. ती वास्तूच माणसाची पहिली शाळा असते. घराला त्याची कहाणी असते. घराच्या वास्तूमधून आपला चेहरा व्यक्त होत असतो. घर आपल्याला पाहायला, चालायला, धावायला व प्रसंगी दुःखाचा डोंगर चढायला शिकवत असते. घरानेही काळाप्रमाणे बदलायला हवे, नवीन ज्ञान, नवीन मूल्ये यांचा स्वीकार करून अखंड सावधान असायला हवे. घरातील आईचे कष्ट, आजीच्या सुंदर गोष्टी, आजोबांच्या गप्पा, आईचे चविष्ट भोजन यांचा आपल्याला विसर पडता कामा नये.
प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ४. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
(१) वस्तू
उत्तर: वास्तू
(२) खोल्या
उत्तर: ओल्या
(३) जिव्हाळा
उत्तर: शाळा
(४) पसारा
उत्तर: निवारा
(५) पाहायला
उत्तर: चालायला
(६) सावधान
उत्तर: समाधान
(७) भान
उत्तर: ज्ञान
(८) गोष्ट
उत्तर: कष्ट
(९) चविष्ट
उत्तर: गप्पिष्ट
प्र. ५. योग्य पर्याय निवडा.
(अ) घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
(अ) घरातील व्यक्तींनी रडावे.
(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
(इ) घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.
उत्तर: पर्याय (आ) – घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे
(ब) घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
(अ) घरामध्ये बालमंदिर भरते.
(आ) घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
(इ) घराच्या शाळेत नाव घातले जाते.
उत्तर: पर्याय (आ) – घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
(क) जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
(अ) नवी मूल्येव नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.
(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
(इ) काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
उत्तर: पर्याय (इ) – काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
प्र. ६. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
उत्तर:
गोकुळधाम
कृष्णकुंज
ग्रीनव्हिला
दिपांजली
राधाकृष्णनिवास
मातोश्री
मनःस्मृती
केशवधाम
वृंदावन
उत्कर्ष
प्र. ७. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
(१) चविष्ट – चव असणारे.
(२) विशिष्ट – ठरावीक प्रकारचा.
(३) भ्रमिष्ट – भ्रम झालेला.
(४) गप्पिष्ट – गप्पा मारणारा.
(५) कोपिष्ट – रागावणारा.
(६) अनिष्ट – योग्य नसलेले.
उत्तर:
प्र. ८. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
उत्तर:
प्र. ९. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
प्र. १०. खालील शब्द वाचा. लिहा.
प्र. ११. वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू – जिन्नस, नग (२) वास्तू – घर
(१) कप-काप
उत्तर:
कप – चहा पिण्याचे भांडे
काप – चिरणे तसेच फळाची फोड
(२) तार-तारा
उत्तर:
तार – धातूचा बारीक दोरा
तारा – आकाशातील स्वयंप्रकाशित तारे
(३) खरे-खारे
उत्तर:
खरे – सत्य
खारे – मीठाचे प्रमाण अधिक असलेले
(४) गर-गार
उत्तर:
गर – फळातील मगज
गार – थंड
(५) घर-घार
उत्तर:
घर – गृह, सदन
घार – एक पक्षी
(६) चार-चारा
उत्तर:
चार – अंक
चारा – गवत
(७) पर-पार
उत्तर:
पर – पंख
पार – पलीकडे
(८) वर-वार
उत्तर:
वर- उर्ध्व
वार – आठवड्याचा एक दिवस
प्र. १२. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
उत्तर: मुंबईत चार मजल्यांच्या इमारतीमध्ये माझे घर तिसऱ्या मजल्यावर आहे. माझ्या घरामध्ये चार खोल्या आहेत. बाहेरच्या हॉलमधून आत गेल्यावर स्वयंपाकघर असून तेथे एका बाजूला देव्हारा आहे. एका बाजूला बेडरूम आहे. तर एका बाजूला आम्हा भावंडांची अभ्यासाची खोली आहे. त्या
खोलीत माझे स्टडी टेबल आहे. माझ्या घरात आवश्यक त्या सर्व गोष्टी आहेत. उदा. फ्रिज, कपाट, टी.व्ही. परंतु जास्त सामानाची अडचण नाही. त्यामुळे आम्ही ते नेहमी स्वच्छ, व्यवस्थित व नीटनेटके ठेवतो. तिसऱ्या मजल्यावर घर असल्याने व प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या असल्याने हवा व उजेडही खूप असतो.
माझ्या घराला बाल्कनी आहे. त्यामध्ये माझ्या आईने तुळस, कोरफड, सदाफुली, जास्वंद अशी विविध प्रकारची फुलझाडे लावली आहेत. माझे घर खूप छान आहे. माझ्या घरातील सर्व माणसे आई, बाबा, ताई, आजी एकमेकांशी प्रेमाने व आपुलकीने वागतात. त्यामुळेच खरे माझ्या घराला शोभा येते. असे माझे घर मला खूप आवडते.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
उत्तर: पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.
उत्तर: वासरात लंगडी गाय शहाणी.
उत्तर: अडला हरी गाढवाचे पाय धरी.
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
उत्तर: मस्त सुट्टीचा दिवस होता. सोसायटीतील सगळी मुले खेळायला बागेजवळच्या मैदानात गेली. आकाशात पांढरे ढग होते म्हणजे आता पाऊस पडण्याची शक्यताच नव्हती. मुलांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हळूहळू खेळाची रंगत वाढत होती.
संजू आणि राजू लगेचच बाद झाल्यामुळे नाराज झाले होते. क्रिकेटमध्ये त्यांना रस वाटत नव्हता, म्हणून सोबत आणलेला पतंग घेऊन ते मैदानाच्या कडेला गेले. वायाबरोबर पतंग छान भरारी मारत होता. पण एवढ्यात बागेत स्वच्छंदी उडणारे फुलपाखरू पतंगाच्या मांज्यात अडकले, गुरफटले गेले, त्याला तेथून निघता येईना. मुलांनी लगेच पतंग खाली घेतला. फुलपाखराची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
पण सर्व व्यर्थ मांज्यामुळे फुलपाखराचे पंख तुटले. उडण्यासाठी ते धडपडू लागले. त्याची धडपड पाहून राजू आणि संजूला खूप वाईट वाटले. एव्हाना सगळी मुले सभोवती गोळा झाली होती.
शेवटी तडफडून फुलपाखराने प्राण सोडला. मुलांना खूप वाईट वाटले. आपल्या खेळामुळे फुलपाखराचा जीव गेला याचे राजू आणि संजूला खूप दुःख झाले.
आपल्या खेळामुळे जर पक्षी, कीटकांचा जीव जात असेल तर असा खेळ आपण आजपासून खेळायचा नाही अशी मुलांनी प्रतिज्ञाच केली.