Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ ३ – पाऊस आला! पाऊस आला!

On a high noon, suddenly there was a flash of lightning in the sky, and heavy rain began to pour. There was deafening thunder, followed by howling winds. All of a sudden, big hailstones started falling from the sky.

 

Due to the unexpected rain, the mud fort, which children had built very enthusiastically during Diwali, collapsed. The sudden rain caught the dogs unawares, and they started barking. Grandfather started mending his worn umbrella.

 

The father was already late for his office. The sudden rain created havoc and annoyed him more. The papad (chips), which the mother had put in the sun for drying, became soggy and wet.

 

However, the sudden showers cheered up the students at school. They were ecstatic and started shouting with joy. So their teacher, Ms. Kutti, smiled and said, “You can go home, children. No school today!”

लुकलुकणे – चमकणे

तल्लीन होणे दंग होणे, गुंग होणे

कडकडून भेटणे – प्रेमाने मिठी मारणे

बिलगणे – प्रेमाने जवळ येणे

गहिवरून येणे मन भरून येणे

धमाल – मजा

पाडाचा आंबा – अर्धवट पिकलेला आंबा

आमराई – आंब्याच्या झाडांची बाग

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा :

 

(१) विजा केव्हा चमकल्या ?

उत्तर : भर दुपारी विजा चमकल्या.

 

(२) सुटलेला वारा कसा होता?

उत्तर : सुटलेला वारा भणाणा होता.

 

(३) पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?

उत्तर : पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली.

 

(४) आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?

उत्तर : बाबांना कामावर जायला उशीर झाला होता. ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला; त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला; म्हणून बाबांची चडफड केली.

 

(५) पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? 

उत्तर : पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले.

प्र. २. (अ) शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

उदा., वारा-गारा

उत्तर:
(अ) कुत्री – छत्री
(आ) गिल्ला – किल्ला
(इ) पापड – चडफड
(ई) पळा – घोटाळा
(उ) कुट्टी – सुट्टी

 

(आ) कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.

उत्तर:

धडधड

गडगड

बडबड

खडखड

रडरड

गडबड

पडझड

प्र. ३. खालील शब्दांचे वचन बदला.

(अ) माणूस

उत्तर: माणसे

 

(आ) गाय

उत्तर: गाई

 

(इ) दप्तर

उत्तर: दप्तरे

 

(ई) पाणी

उत्तर: पाणी

 

(उ) वह्या

उत्तर: वही

 

(ऊ) पत्र
उत्तर: पत्रे

प्र. ४. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली अाहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.

उत्तर: एकदा ताई आणि मी बाजारात गेलो होतो. अचानक पाऊस आला. छत्र्या नव्हत्या. आम्ही झाडाखाली उभे राहीलो पण पूर्ण भिजलो होतो. रस्त्यात पाणी तुंबले होते. रिक्षा बंद झाल्या होत्या. दोघे कसेबसे घरी पोहोचलो. आईने पापड, मिरच्या वाळवण ठेवले होते. तेही भिजले. बाबांना घरी यायला खूप उशीर झाला. बाहेर वाळत घातलेले कपडेही भिजले. पावसामुळे खूप धावपळ झाली.

प्र. ५. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते
चार-पाच वाक्यांत लिहा.

उत्तर: दिवाळीत आम्ही सर्व मुलांनी मिळून किल्ला बांधला होता. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवले होते. मातीच्याच प्रतिमा असल्याने त्या तुटून गेल्या. किल्ला ढासळला. ताईने दारात काढलेली रांगोळी पुसली गेली. आमचे फटाकेही भिजले.

प्र. ५. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते
चार-पाच वाक्यांत लिहा.

उत्तर: दिवाळीत आम्ही सर्व मुलांनी मिळून किल्ला बांधला होता. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवले होते. मातीच्याच प्रतिमा असल्याने त्या तुटून गेल्या. किल्ला ढासळला. ताईने दारात काढलेली रांगोळी पुसली गेली. आमचे फटाकेही भिजले.

प्र. ६. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.

IMG 20230802 210652 1 पाठ ३ – पाऊस आला! पाऊस आला!

(अ) रिमझिम पाऊस पडत होता. झाडे जणू आंघोळ करीत होती. शेतांमध्ये पाणी साचले होते. कौलारू घरांवरून पागोळ्या सांडत होत्या. मी तळहातावर थेंब झेलत उभा होतो. मला खूप आनंद वाटत होता.

(आ) रिक्षा खडखड करत थांबली. त्यातून राजू उतरला. त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. राजू माझा मित्र आहे. मी पुढे झालो, त्याला आधार दिला. हळू हळू त्याला मी घरापर्यंत नेले.

प्र. ७. ‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., भणाणणारा वारा सुटला होता.

IMG 20230802 233127 पाठ ३ – पाऊस आला! पाऊस आला!

उत्तर: 

(१) मंद मंद वाऱ्याची झुळूक आली.

(२) गिरक्या घेत वारा नाचू लागला. 

(३) जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले.

(४) थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुखवत होता.

(५) थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही.

प्र. ८. पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.

उत्तर: पापड विविध प्रकारचे असतात. उडदाची डाळ, मिरे यांपासून उडदाचे पापड बनतात. तांदळापासून तांदळाचे पापड बनतात. काही पापड पोयांपासून तर काही नाचणीपासून बनतात. साबूदाण्यापासून व बटाट्यापासूनही उपवासाचे पापड बनतात.

प्र. ९. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा.

उदा., पापड.

उत्तर: उन्हाळ्यात वाळवून साठवण्याचे पदार्थ – पापड, कुर्डया, सांडगे, शेवया, मिरच्या, आंबापोळी, फणसपोळी, उपवासाच्या चकल्या, उपवासाचे पापड, आमचूर, बोरकूट इ.

प्र. १०. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता?

उदा., छत्री खरेदी करणे.

उत्तर: पावसाळा येण्यापूर्वी, मी माझ्या घराच्या छतावर आणि भिंतींमध्ये गळती किंवा कमकुवत ठिपके आहेत का ते तपासून ते दुरुस्त करून घेतो. मी छत्री, रेनकोट आणि वॉटरप्रूफ शूज यांसारख्या रेन गियरचा साठा करतो. हवामानाच्या अंदाजांबद्दल माहिती देत ​​राहिल्याने मला बाहेरच्या क्रियाकलापांचे सुज्ञपणे नियोजन करण्यात मदत होते आणि मी पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात टाळण्याचा प्रयत्न करतो. तयार राहिल्याने, मी सुरक्षितपणे आणि आरामात पावसाळ्याचा आनंद घेऊ शकतो.

प्र. १०. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता?

उदा., छत्री खरेदी करणे.

उत्तर: पावसाळा येण्यापूर्वी, मी माझ्या घराच्या छतावर आणि भिंतींमध्ये गळती किंवा कमकुवत ठिपके आहेत का ते तपासून ते दुरुस्त करून घेतो. मी छत्री, रेनकोट आणि वॉटरप्रूफ शूज यांसारख्या रेन गियरचा साठा करतो. हवामानाच्या अंदाजांबद्दल माहिती देत ​​राहिल्याने मला बाहेरच्या क्रियाकलापांचे सुज्ञपणे नियोजन करण्यात मदत होते आणि मी पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात टाळण्याचा प्रयत्न करतो. तयार राहिल्याने, मी सुरक्षितपणे आणि आरामात पावसाळ्याचा आनंद घेऊ शकतो.

उपक्रम :

(१) पावसाची गाणी मिळवा. वर्गात सादर करा.

उत्तरविद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.

 

(२) ‘पावसाळ्यातील एक दृश्य’ निसर्गचित्र काढा व रंगवा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.