Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ २ – माझा अनुभव

During the vacations after the final examinations. Rima and her brother. along with their mother, went to their maternal uncle’s village. They were fascinated by the train journey and they enjoyed the picturesque view of their uncle’s village.

 

In this lesson, Rima’s brother narrates his experience in very simple words.

लुकलुकणे – चमकणे.

तल्लीन होणे – दंग होणे, गुंग होणे.

कडकडून भेटणे – प्रेमाने मिठी मारणे.

बिलगणे – प्रेमाने जवळ येणे.

गहिवरून येणे – मन भरून येणे.

धमाल – मजा.

पाडाचा आंबा – अर्धवट पिकलेला आंबा.

आमराई – आंब्याच्या झाडांची बाग.

स्‍वाध्याय

प्र. १. का ते लिहा.

(अ) रिमाने आनंदाने उड्या मारल्या.

उत्तर : सुट्टीत मामाच्या गावी जायला मिळत होते, म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या.

 

(आ) मुलाने बाळाला मांडीवर घेतले.

उत्तर : बाळ मुलाकडे पाहून खुदकन हसले; म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले.

 

(इ) मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.

उत्तर : सायंकाळची मामाच्या गावाची शोभा पाहून मुलाचे मन आनंदाने नाचू लागले.

 

(ई) मुलांना गहिवरून आले.

उत्तर : आजीने मुलांना जवळ घेतले. मुलांच्या डोक्यावरून, तोंडावरून मायेने हात फिरवला. तिच्या हाताचा स्पर्श खूप प्रेमळ व बोलका होता. आजीच्या प्रेमाने भारावून गेल्यामुळे मुलांना गहिवरून आले.

प्र. २. ‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : मामाच्या गावी मुलांनी खूप धमाल केली. विहिरीवर पोहायला गेली. शेतात बागडली. आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या व पाडाचे आंबे त्यांनी तोडून खाल्ले. मामाबरोबर बैलगाडीतून शेतात, तर कधी आमराईत त्यांनी फेरफटका मारला. रोजच त्यांनी मौज लुटली. म्हणून ‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला कळलेच नाही. ‘ असे मुलाला वाटले.

प्र. ३. वाचा. सांगा. लिहा.

(अ) नादमय शब्द
उदा., छुमछुम, झुकझुक.

उत्तर :

फडफड

खडखड

सळसळ

खळखळ

खुळखुळ

थुईथुई

प्र. ४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(अ) वारा

उत्तर: पवन, वायू

 

(आ) तोंड

उत्तर: मुख, चेहरा

 

(इ) रस्ता

उत्तर: मार्ग, सडक

 

(ई) आई

उत्तर: माता, जननी

 

(उ) शेत

उत्तर: शिवार

प्र. ५. जोड्या जुळवा.

‘अ’ गट

 

(अ) आगगाडी 
(आ) पैंजण 
(इ) घुंगूरमाळा 
(ई) बैलगाडी 
(उ) पाणी 

‘ब’ गट

 

(१) खुळखुळ
(२) खडखड
(३) झुकझुक
(४) खळखळ
(५) छुमछुम

उत्तर:

‘अ’ गट

 

(अ) आगगाडी 
(आ) पैंजण 
(इ) घुंगूरमाळा 
(ई) बैलगाडी 
(उ) पाणी 

‘ब’ गट

 

(१) खुळखुळ
(२) खडखड
(३) झुकझुक
(४) खळखळ
(५) छुमछुम

प्र. ६. ‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी –

उत्तर: बेंऽ बेंऽऽ

 

(आ) वाघ –

उत्तर: डरकाळी

 

(इ) बेडूक –

उत्तर: डराँवऽ डराँवऽऽ

 

(ई) कुत्रा –

उत्तर: भुंकणे

 

(उ) मांजर –

उत्तर: म्याँव म्याँव

 

(ऊ) मोर –

उत्तर: माओ माओ

प्र. ७. खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) खुदकन हसणे.

उत्तर: चॉकलेट देताच राजू खुदकन हसला.

 

(आ) गाढ झोपणे.

उत्तर: थकल्यामुळे आई गाढ झोपली. वाक्प्रचार कडकडून भेटणे.

 

(इ) कडकडून भेटणे.

उत्तर: वाक्य खूप वर्षांनी एकमेकांना पाहिल्यामुळे राजन व सुरेश कडकडून भेटले.

 

(ई) टुकुटुकु पाहणे.

उत्तर: झाडावरच्या कावळ्याकडे बाळ टुकुटुकु पाहत होता.

 

(उ) आनंदाने थुईथुई नाचणे.

उत्तर: पहिला पाऊस येताच शेतकऱ्याचे मन आनंदाने थुईथुई नाचते.

 

(ऊ) गहिवरून येणे.

उत्तर: परदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईला गहिवरून आले.

प्र. ८. ‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.

उत्तर: 

धावपळ

नातीगोती

पाटपाणी

नरमगरम

भाजीपाला

धुणीभांडी

गणगोत

प्र. ९. तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.

उत्तर: मी रस्त्यावर गस्त घालत असताना मला एक अंध व्यक्ती रस्ता ओलांडण्यासाठी धडपडताना दिसली. न डगमगता, मी त्याच्या मदतीला धावून गेलो आणि त्याला सुरक्षितपणे पलीकडे नेले. मदतीबद्दल कृतज्ञ असलेल्या अंध व्यक्तीने माझे मनापासून आभार मानले. आम्ही वेगळे झालो तेव्हा मला दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं केल्याचा आनंद वाटला.

प्र. १०. तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.

उत्तर: सुट्टीच्या दिवशी आम्ही गावाजवळील आमराईत फिरायला गेलो होतो. सर्व झाडे कैऱ्यांनी लादली होती. मी झाडावर चढून भरूपूर कैऱ्या काढल्या त्या वेळी खूप मजा आली. जेवणाचे डब्बे आम्ही सोबत घेतले होते. झाडाच्या थंडगार सावलीत बसून आम्ही जेवण केले. बाजूच्या विहीरीतील थंड पाणी पिऊन खूप समाधान वाटले. आंब्याच्या झाडावर विविध पक्षी पाहावयास मिळाले. दिवसभर भरूपूर मज्जा केली व संध्याकाळी आम्ही घरी परतलो.

प्र. ११. खालील शब्दांसारखे दोन-दोन शब्द लिहा.

(अ) सळसळ

उत्तर: मळमळ, जळजळ

 

(आ) भुरभुर

उत्तर: फुरफुर, गुरगुर

 

(इ) लुकलुक

उत्तर: झुकझुक, टुकटुक

 

(ई) खडखड

उत्तर: धडधड, बडबड

प्र. १२. हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

प्र. १३ खालील शब्द आपण कधी वापरतो?

कृपया, माफ करा, आभारी आहे.

उत्तर:

(१) विनंती करताना ‘कृपया’ हा शब्द वापरतात.

उदा. “कृपया, मला एक पेन्सिल दे.”

(२) क्षमा मागताना ‘माफ करा’ हे शब्द वापरतात.

उदा. “माफ करा. तुम्हांला चुकून धक्का लागला.”

(३) कृतज्ञता व्यक्त करताना ‘आभारी आहे’ हे शब्द वापरतात.

उदा. ’तू मला पेन्सिल दिलीस, त्याबद्दल मी आभारी आहे.“

आपण एका वस्तूबद्‌दल बोलू लागलो, की त्यास एकवचन म्हणतो आणि अनेकांबद्‌दल बोलू लागलो, की त्यास अनेकवचन म्हणतो.

उदा., एक झाड – अनेक झाडे.

IMG 20230803 081417 पाठ २ – माझा अनुभव

खालील वाक्यांतील नामांना अधोरेखित करा.

(अ) बाबांचा सदरा उसवला.

उत्तर: बाबांचा सदरा उसवला.

 

(आ) सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.

उत्तर: सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.

 

(इ) पाकिटात पैसे नव्हते.

उत्तर: पाकिटात पैसे नव्हते.

 

(ई) मुले बागेत खेळत होती.

उत्तर: मुले बागेत खेळत होती.

 

(उ) समोरून बैल येत होता.

उत्तर: समोरून बैल येत होता.

 

(ऊ) सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.

उत्तर: सरिताफरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.

 

(ए) पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.

उत्तर: पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.