Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ ४ – माहिती घेऊया

This lesson is a biographical sketch of the great Indian scientist Dr. Vasant Gowarikar, which describes his early life and his fundamental research work in the fields of space, weather, and population.

स्‍वाध्याय

प्र. १. भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.

उत्तर :

IMG 20230930 145314 पाठ ४ – माहिती घेऊया

प्र. २. कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.

उत्तर: आपला देश शेतीप्रधान आहे म्हणून शेतीविषयक क्षेत्रात संशोधन व्हावे. अवकाळी आलेल्या पावसापासून पिकाचे संरक्षण याविषयी संशोधन व्हावे.

प्र. ३. खालील वाक्यांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली – भिंती कोसळल्या.

(१) मला कविता आठवली.

उत्तर: मला कविता आठवल्या.

 

(२) त्याने खुर्ची ठेवली.

उत्तर: त्याने खुर्च्या ठेवल्या.

 

(३) मधू आंबा खा.

उत्तर: मधू आंबे खा.

उप्रकम : आंतरजालाचा उपयोग करून डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा. कोलाज तयार करा.

उत्तर: डॉ. वसंत गोवारीकरांचा जन्म २५ मार्च १९३३ या दिवशी पुण्यात झाला. त्यांना शाळेत असताना नवीन नवीन कल्पना सुचायच्या. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दृढ संकल्प हे गुण त्यांच्याकडे होते. कोल्हापूरला त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले. तेथील बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी ‘रासायनिक अभियांत्रिकी’ विषयात संशोधन केले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. १९६७ साली विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. त्यांच्या पुढाकाराने ‘घन पदार्थातील ऊर्जा’ या विषयाच्या संशोधनासाठी नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन तयार करण्याचे तंत्र विकसित केले. भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

प्रकल्प : वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितींची कात्रणे काढून चिकटवही बनवा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.