पाठ ३ – माझ्या अंगणात
When the crops are ripe in the fields, the farmer is absolutely delighted, since his labour is rewarded. The poem has very appropriately described the harvest in the farm and the sentiments blooming in the farmer’s mind.
शाळवा मोती – ज्वारीचे दाणे
रास – ढीग
मिजास – तोरा
रानमेवा – रानात पिकणारी फळे
शिणणे – दमणे, थकणे
आसू – डोळ्यांतील पाणी, अश्रू
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
उत्तर: कवीच्या अंगणात गव्हाची आणि ज्वारीची रास पडते.
(आ) रानमेवा कुठे उगवला आहे?
उत्तर: रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.
(इ) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?
उत्तर: एकमेकांना देत घेत एकत्र बसून आपण रानमेवा खाल्ला तर आपल्यातील प्रेम, वात्सल्य, बंधुभावाची भावना वाढीस लागते. आपसातील मतभेद विसरून सर्वजण आनंदाने राहतात, म्हणून कवी रानमेवा गुण्यागोविंदाने खायला सांगत आहे.
(ई) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उत्तर: कवीच्या अंगणात दाणे टिपण्यासाठी पाखरे येतात.
प्र. २. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
उत्तर:
काळ्याशार मातीतुनी
मोती पवळयाची रास.
(आ) काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
उत्तर:
गहू शाळवाचं मोती
काळ्या रानात सांडले.
(इ) शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
उत्तर:
जीव दमतो, शिणतो
घास भरवते माय.
(ई) रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.
उत्तर:
दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा,
तुम्ही आम्ही सारेजण गुण्यागोविंदानं खावा.
प्र. ३. तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.
उत्तर: दिवाळीच्या सुट्टीत गावाला मी बाबांबरोबर शेतावर गेलो होती. हिरवेगार शेत पाहून मला खूप आनंद झाला. मोत्यासारख्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेली ज्वारीची कणसं वाऱ्यावर डुलत होती. वाऱ्याची झुळूक येताच, समुद्राच्या पाण्याप्रमाणे पिकांवर सुंदर लहरी उमटत होत्या, ताठ मानेने वाऱ्यावर डोलणारी ज्वारीची कणसं खूप गोंडस दिसत होतो. निसगांचा हा हिरवागार ठेवा पाहून मला खूप आनंद झाला.
चर्चा करा मांगा.
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
उत्तर: रानमेवा म्हणजे दया डोंगराच्या रानातली आंबट, तुरट, गोड अशा प्रकारची फळे ती खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीमुळे कुठेतरी अनोखी तृप्ती मनाला लाभते. सर्वसाधारणपणे रानमेव्यात करवंदे, जांभळे, चिंचा, बोरे, आळू, तोरणं, मलबेरी / तुती इ. स्थानपरत्वे यात एखाद दुसऱ्या फळांची भर पडते. आडरानात असलेली, ठराविक मोसमातली फळे रानमेव्यात येतात.
डोंगरची काळी मैना उर्फ करवंदे, गावठी बोरे, जांभळे यातही रानजांभळे वेगळी. कमी गर असलेली तसेच आळू हे चिक्कूसारखे दिसणारे व आंबट गोड चवीचे फळ, जाम म्हणजे पांढरट व काहीसं पिस्ता रंगाचं फळ, ताडगोळे एक रसदार, उन्हाच्या काहिलीत थंडावा देणारं फळ, रायआवळा हे एकदम छोट्या आकाराचे आवळे, रानातला हा रानमेवा गुणांच्या बाबतीतही श्रेष्ठ, चवही एकदा खाल्ल्यावर जीभेवर रेंगाळणारी. आंबट तुरट गोड चव असणारा रानमेवा आरोग्यासाठी खूपच उत्तम असतो. रानावनातल्या निसर्गातलं हे फळाचं वैभव लक्षणीय असे आहे.
खेळूया शब्दांशी.
(अ) कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची _____ (मिजास, आस, रास)
उत्तर: रास
(२) घरामंदी घरट्यात जशी दुधातली _____ (माय, साय, जाय)
उत्तर: साय
(३) दूर उडुनिया जाता, आसू येती _____
(गालावर, सारेजण, घरट्यात)
उत्तर: गालावर
(आ) समूहदर्शक शब्दांची यादी करा.
उदा., धान्याची रास
(१) लाकडाची
उत्तर: मोळी
(२) पक्ष्यांचा
उत्तर: थवा
(३) केळीचा
उत्तर: घड
(४) प्राण्यांचा
उत्तर: तांडा
(५) मुलांचा
उत्तर: घोडक
(६) द्राक्षांचा
उत्तर: घड
(इ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
(अ) सांडलं
उत्तर: पडलं
(आ) रास
उत्तर: मिजास
(इ) माय
उत्तर: साय
(ई) खालील शब्दांसाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
(अ) खावा
उत्तर: खाऊया
(आ) माय
उत्तर: आई
(इ) घरामंदी
उत्तर: घरामध्ये
(ई) आसू
उत्तर: अश्रू
उपक्रम : तुमच्या परिसरातील एखादया अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तर:
प्रश्नावली :
(१) तुमचे नाव काय ?
(२) तुम्ही किती वर्षांपासून शेती करत आहात?
(३) तुमची किती एकर शेती आहे?
(४) तुमच्या शेतात तुम्ही कोणकोणती पिके घेता?
(५) शेतीचे तुम्ही कोणते प्रशिक्षण घेतले आहे ?
(६) शेतात तुम्ही कोणत्या खतांचा वापर करता?
(७) तुम्हांला सरकारच्या योजना उपयोगी वाटतात का?
(८) या व्यवसायात तुम्ही आनंदी आहात का?
(९) वर्षभर शेतातून पिके घेण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे का?
खेळ खेळूया.
‘स’ चा शब्दपंखा पूर्ण करा.
(१) वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
(२) जंगलातील एक भित्रा प्राणी.
(३) नेहमी.
(४) एक शीतपेय.
(५) रस्ता.
(६) उत्सव.
(७) ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द.
उत्तर:
कविता करूया.
वरील आकृत्यांमध्ये गोलात दिलेल्या शब्दांशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे निरीक्षण करा. यांमध्ये शेवट समान असणारे काही शब्द आहेत.
उदा.,
खेळ, मेळ, नारळ
सण, तोरण, सारेजण
दार, घर, सुंदर
अशा शब्दांना यमक जुळणारे शब्द म्हणतात.
या शब्दांचा वापर करून आपल्याला लयबद्ध वाक्ये तयार करता येतात.
उदा., घराभोवती प्रशस्त अंगण,
जमले तेथे सारेजण,
सडा, रांगोळी अन् तोरण,
साजरे करतो सगळे सण.
याप्रमाणे वरील आकृत्यांमध्ये दिलेल्या इतर शब्दांचा उपयोग करून कवितेच्या ओळी तयार करा.
उत्तर:
१) आला आला गुढीपाडवा
स्वागतयात्रेची तयारी करा ।।१।।
दारी रेखीली रांगोळी
दिव्यांचा सण दिवाळी ।।२।।
करा दुर्गुणांची होळी
आनंदाने खा पुरणपोळी ।।३।।
२) माझ्या घराभोवती
झाडे झुडुपे किती ।।१।।
रंगीबेरंगी पाने फुले
दारी सुंदर तोरण झुले ।।२।।