पाठ २ – श्यामचे बंधुप्रेम
Shyam’s younger brother’s shirt was torn; therefore Shyam got a new coat stitched for him from his petty pocket money. Shyam overcame hurdles (of travelling) during heavy monsoon rains and exhibited his brotherly affection.
This lesson portrays the heartfelt description of Shyam’s affection towards his younger brother and the teaching of his mother.
लुकलुकणे – चमकणे
स्वाद – चव
रोजगारी होणे – कामधंद्याला लागणे
गाबड्या – ठिगळ, कापड फाटल्यावर त्याठिकाणी लावलेले दुसरे कापड
डोळे अश्रूंनी न्हाणे – डोळ्यांतून अश्रू ओघळणे
पऱ्ह्या – ओढा
दुथडी भरून वाहणे – पूर्ण भरून वाहणे
पंचमहाभूते – पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश
फलद्रुप – फळाला आलेली
दवडणे – वायाघालवणे
स्मृती – आठवणी
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उत्तर: नवीन पाऊस सुरू झाल्यावर मातीचा एक रम्य सुंदर वास सुटतो.
(आ) श्यामने कोणता निश्चय केला होता?
उत्तर: खाऊच्या पैशांतून लहान भावास नवीन कोट किंवा सदरा शिवायचा असा निश्चय श्यामने केला होता.
(इ) लहान भावाला आईने कसे समजावले?
उत्तर: श्यामच्या आईने लहान भावास सांगितले, तुझे अण्णा, दादा मोठे होतील, कामधंदयाला लागतील. मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. अशा प्रकारे आईने लहान भावास समजावले.
(ई) श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
उत्तर: श्यामचे वडील कोर्ट-कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात.
(उ) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
उत्तर: खाऊच्या पैशांतून लहान भावासाठी शिवलेला कोट घेऊन कधी एकदा त्याला नेऊन देतो असे श्यामला झाले होते. म्हणून त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.
प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
प्र. ३ का लिहा.
(अ) स्वामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.
उत्तर: स्वतःसाठी खाऊचा एकही पैसा न खर्च करता त्या पैशांतून श्यामने लहान भावासाठी नवीन कोट शिवला. नवीन कोट मिळाल्यावर भावाला होणाऱ्या आनंदाचा विचार मनात आला. त्याचा हट्ट आपण पूर्ण करू शकलो म्हणून श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते..
(आ) श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला ‘जाऊ नको’ असे म्हटले.
उत्तर: श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांना श्यामची काळजी वाटत होती. पावसाळ्याचे दिवस होते. नदीनाल्यांना पूर आले असतील. अशा परिस्थितीत श्यामने जाणे त्याच्या जीवाला धोकादायक होते. म्हणून श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी ‘जाऊ नको’ असे म्हटले.
(इ) पिसईचा या दुधडी भरून वाहत होता.
उत्तर: पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीनाल्यांना पूर आल्याने, पिसईच्या पन्हयाला ओढ फार असल्यामुळे तो दुथडी भरून वाहत होता.
(ई) स्वामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
उत्तर: वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे स्वतः साठी खर्च न करता श्यामने लहान भावासाठी नवीन कोट शिवला. तो कोट घरी घेऊन येण्यासाठी श्यामला अनेक अडचणींना तोंड दयावे लागले. श्यामचे आपल्या लहान भावावरील निःस्वार्थी प्रेम पाहून आईला गहिवर आला.
चर्चा करा मांगा.
पंख असते तर एकदम उडून गेलो असतो यामागील श्यामची कल्पना काय असावी, पाचायत मित्रांशी चर्चा करा.
उत्तर: पंख ही पक्ष्यांना मिळालेली देणगीच असते. त्यांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. ‘श्यामचे बंधुप्रेम’ या पाठात लहान भावाला दिवाळीला नवा कोट नेऊन देण्यासाठी श्यामची धडपड चालली होती. शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या श्यामला लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या भावाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता; मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी-नाल्यांना आलेला पूर असे असंख्य अडथळे श्यामसमोर उभे होते. अशा अवस्थेतही आईला आपल्या या कृतीने किती आनंद होईल या विचाराने, घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी पंख असते तर एकदम उडून गेलो असतो आणि अंतर केव्हाच पार करत मी घरी पोहोचलो असतो असा विचार श्यामने केला असावा.
खेळूया शब्दांशी.
(अ) खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद अर्थाच शब्द चौकटीतून शोधून लिहा.
चंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती
दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे
उत्तर:
थंड × गरम
सापडणे × हरवणे
सुगंध × दुर्गंध
थोरला × धाकटा
जुना × नवीन
लक्ष × दुर्लक्ष
स्मृती × विस्मृती
(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द का नाही ते सांगा.
(१) समीरा, विनीता, त्यांनी, निखिल,
उत्तर: त्यांनी.
कारण, इतर सर्व नामे आहेत व ‘त्यांनी’ हे सर्वनाम आहे.
(२) भी, सातपुते, त्याने, तिला,
उत्तर: सातपुते.
कारण, इतर सर्वनामे आहेत व ‘सातपुते’ हे नाम (आडनाव) आहे.
(३) हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य,
उत्तर: हिमालय.
कारण, इतर विशेषणे आहेत. ‘हिमालय’ हे विशेषनाम आहे.
(४) लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.
उत्तर: आम्ही.
कारण, इतर सर्व क्रियापदे आहेत. ‘आम्ही’ हे सर्वनाम आहे.
लिहिते होऊया
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता ? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
उत्तर: मी माझ्या भावासाठी नेहमी बुद्धीला चालना आणि हातांना काम देणारे खेळ घेतो. असे खेळ दिल्यामुळे त्यालाही गुंतवून ठेवता येते. आता तो बऱ्यापैकी मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी आता चित्रे असलेली गोष्टींची पुस्तके घेतो.. छोटे छोटे प्रयोग असणारी विज्ञानाची पुस्तके घेतो. या भेटवस्तू मी त्याला त्याच्या वाढदिवसाला देतो. मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सणाला देतो.
आपण समजून घेऊया.
खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.
उत्तर: