पाठ ४ – गोपाळचे शौर्य
The school trip has gone to Karnagadh. Gopal witnessed forest fire at the foot of the full while returning from the fort. This is the story of Gopal’s struggle to quench the fire. All people praised this brave art of Gopal.
गुण्यागोविंदाने – आनंदाने
पौराणिक – पुरातन
परेतनंच – प्रयत्न
पोशिंदे – पोसणारे
हतबल होणे – निराश होणे
निरपेक्ष – अपेक्षा न ठेवता
कौतुकास्पद – कौतुक करण्यायोग्य
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या खेडेगावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.
(आ) ‘गाडी थांबवा’, असे गोपाळ का ओरडला?
उत्तर: गडावर लागलेली आग विझविण्यासाठी ‘गाडी थांबवा’ असे गोपाळ ओरडला.
(इ) गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर: वाटेच्या बाजूला असलेल्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याचा पाईप गोपाळने ओढून आगीवर पाणी मारण्यास सुरुवात केली.
(ई) आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर: आग वेळेवर विझली नसती तर गडावर गेलेले गुराखी व गुरे वाचली नसती. गडावरील आणखी झाडे-झुडपे आगीत जळून खाक झाली असती म्हणजेच गडाचे आणि निसर्गाचेही नुकसान झाले असते.
प्र. २. काेण, कोणास म्हणाले ते सांगा.
(अ) ‘‘अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?’’
उत्तर: असे शिक्षक गोपाळला दरडावून म्हणाले.
(आ) ‘‘माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!’’
उत्तर: असे गोपाळ गुराख्याला म्हणाला.
(इ) ‘‘पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो.’’
उत्तर: असे शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले.
प्र. ३. गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा
उत्तर: दुसऱ्याला मदत करणे हा गोपाळचा गुण मला आवडला. कारण गडावरील आग विझविण्यासाठी गोपाळने स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
चर्चा करा मांगा.
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
उत्तर: निसर्गरम्य ठिकाणे थकल्या भागल्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण करतात. आमच्या घरच्यांबरोबर नुकताच मी महाबळेश्वरला जाऊन आलो.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या रांगेतील महाबळेश्वर हे थंड हवेचे निसर्गरम्य असे ठिकाण आहे. निसर्गाची नानाविध रूपे महाबळेश्वरच्या परिसरात प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्यासारखी आहेत.
महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचे उगमस्थान. वेण्णा तलावातल्या नौकाविहाराची मज्जा काही औरच आहे. महाबळेश्वरमधील विविध देखाव्यांची ठिकाणे पॉईंट खिळवून ठेवणारे आहेत. ऑर्थर पॉईंटवरून आजुबाजूच्या परिसराचे विहंगम दर्शन व सूर्योदयाचा अनुभव मनात घर करणारा आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे विविध रंग ‘बॉम्बे पाईंट’ वर घेता येतात. जवळच असणारी ऐतिहासिक ठिकाणे प्रतापगड, मकरंदगडालाही जाता येते. महाबळेश्वरच्या परिसरातील स्ट्रॉबेरी, जांभळाचा मध, लाल मुळा तोंडाला एक वेगळीच चव आणतात. निसर्गाच्या नानाविध रंग रूपाला न्याहाळण्याचे सुख महाबळेश्वरच्या परिसरात प्रत्येकालाच लाभते.
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.
उत्तर: आपत्ती म्हणजे संकट, नैसर्गिक रितीने निर्माण झालेल्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. उदा. पूर, भूकंप, ज्वालामुखी, वादळ, अतिवृष्टी. मानवाने केलेल्या कृतीमुळे ज्या आपत्ती येतात त्यांना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. उदा. बॉम्बस्फोट, दंगली, चेंगराचेंगरी, घरगुती अपघात.
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काेणते उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
उत्तर: आपल्या परिसंस्था आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी जंगलातील आग रोखणे महत्त्वाचे आहे. मित्रांशी चर्चा करताना, अनेक उपायांचा विचार केला पाहिजे. सर्वप्रथम, जंगलातील आगीचे धोके आणि वृक्षाच्छादित भागात जबाबदार वर्तनाचे महत्त्व याबद्दल जनजागृती मोहीम प्रभावी ठरू शकते. कॅम्प फायर निर्बंध आणि धूम्रपान बंदी यासह कठोर अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित गस्त आणि पाळत ठेवल्यास आग शोधून त्यावर त्वरित प्रतिसाद मिळू शकतो. अतिरिक्त वनस्पती कमी करण्यासाठी नियंत्रित भाजणे देखील वापरले जाऊ शकते. शेवटी, आग प्रतिबंधक आणि अग्निशमन प्रयत्नांमध्ये स्थानिक समुदाय आणि स्वयंसेवकांना सहभागी करून घेतल्याने आपल्या जंगलांचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
खेळूया शब्दांशी.
(अ) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
(अ) कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
(आ) ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
(इ) तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.
(ई) सर्वांचेच चेहरे उजळले होते.
उत्तर:
(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.
(अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा)
(अ) सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ______ साक्षीदार आहेत.
उत्तर: प्रत्यक्षदर्शी
(आ) भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.
उत्तर: अकल्पित
(इ) शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.
उत्तर: पोशिंदा
(ई) ______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
उत्तर: कौतुकास्पद
(इ) ‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. ‘बिन’, ‘परा’ हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
उत्तर:
उत्तर:
(ई) खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा.
(अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
उत्तर: क्षणोक्षणी
(आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
उत्तर: नेहमी
(इ) आईने आशाला शंभरदा बजावले.
उत्तर: शंभरदा
(ई) सभोवार दाट झाडी होती.
उत्तर: दाट
कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)
(अ) _____ वाहतुकीची साधने कमी होती
उत्तर: पूर्वी
(आ) मी _____ पाणी प्यायलो.
उत्तर: घटाघटा
(इ) मला आई _____ येताना दिसली.
उत्तर: समोरून
(ई) _____ हिरवेगार गवत उगवले होते.
उत्तर: सगळीकडे
खालील वाक्ये वाचा.
(अ) मी घरी गेले; पण घराला कुलूप होते.
(आ) अश्विनी खेळायला गेली; परंतु मैदानावर कोणीच नव्हते.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असल्यास ‘;‘ हे चिन्ह वापरले जाते. त्यास अर्धविराम असे म्हणतात.
सुविचार
- आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
- शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय.
- अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही.