Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १६ - शब्दांचा खेळ

The day my teacher, Anne Mansfield Sullivan, visited me is the one I remember most clearly in my entire life. Three months later, on March 3, 1887, I would turn seven years old.

 

On that memorable day’s afternoon, I stood dumbstruck on the porch and faintly deduced from my mother’s signals that something remarkable was about to occur. I had no idea what surprises was in store for me in the future. For weeks, constant anger and hatred tormented me, and a deep lethargy ruled my thoughts.

 

I heard footsteps coming toward me. I put out my hand, and someone grabbed it and pulled me into their arms. The person who had come to teach me and shower me with love more than anything else was my instructor, Anne Sullivan.

 

She gave me a doll that the tiny blind kids at Perkins Institution had sent for me. After a little period of playing with it, Miss Sullivan carefully wrote the word “d-o-l-l” on my hand. I immediately became intrigued by this finger play and made an effort to mimic it. I eventually formed the letters perfectly, and I was overcome with childish joy and pride.

 

I didn’t even aware that words existed or that I was spelling one. In the days that followed, I discovered how to spell a large number of words in this confusing manner, including sit, stand, and walk as well as words like pin, hat, and cup.

 

One day, Miss Sullivan tried to explain to me that “d-o-l-l” applied to both when she placed my large rag doll in my lap while spelling “d-o-l-l.” We had a disagreement earlier in the day about the distinction between the phrases “m-u-g” and “w-a-t-e-r,” but I insisted on confusing the two. She tried several times before I lost patience and threw the new doll to the ground. When I felt the broken doll’s fragments at my feet, I was incredibly happy.

 

There were no powerful emotions or tenderness in the silent, black world I lived in.

 

My hand was once placed underneath the water spout by her. She typed out the word “water” with her second hand as the chilly stream spilled over her other hand. I remained still as I focused solely on her finger movements.

 

I suddenly experienced a hazy awareness of something I had forgotten, together with the excitement of discovery, and in some strange way, the mystery of language became clear to me. I realised at that point that “w-a-t-e-r” stood for the delightful, cool substance that was flowing over my hand.

 

My soul was awakened by that living message, which also brought it light, hope, joy, and freedom. Although there were obstacles, they would eventually disappear with time.

 

I came to understand that everything had a name, and each name generated a fresh idea. With the unusual, fresh sight I had just gained, I started to perceive everything. I recalled the doll I’d damaged. I scooped up the fragments as I made my way to the fireplace. I made futile attempts to combine them. When I realised what I had done, tears welled up in my eyes, and for the first time, I felt repentance and sadness.

 

That day, I learned a lot of new words. I can’t recall them all, but I do recall that they included my mother, father, sister, and teacher. My emotional universe grew with new words. There probably wasn’t a happier youngster than I was as I lay on my bed at the end of that exciting day, savouring the pleasures it had provided me, and for the first time, I yearned for a new day to begin.

स्वाध्याय

१. खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

(अ) बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले. 

उत्तर: बाईंनी हेलनला विहिरीपाशी नेले व water या शब्दाचा अनुभवाने प्रत्यय दिला. तेव्हा हेवनला त्या चैतन्यमय शब्दाने आत्म्याला नवी जाग आणली. प्रकाश, आशा व आनंदाची उधळण केली. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तिचे मन आतुर झाले. जगण्याची नवी उमेद मिळाली. घरी आल्यावर तिला मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. तिने केलेल्या कृत्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिचे डोळे भरून आले. हेलनला विच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनेने मोळा केले.

 

(आ) हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली. 

उत्तर: आंधळी, मुक्की व बहिरी असलेली हेलन केलर अपंगत्वाशी झगडत होती. त्या वेळी तिचे मन रागाने व कडवटपणाने भरले होते. धुक्यातून जहाज जावे, तसा तिच्या जीवनाचा प्रवास होता. तिचे जग अधारमेय होते, प्रकाशासाठी तिचे मन आक्रोश करीत होते. नि एके दिवशी अचानक ॲनी सुलिव्हॅन या बाई तिला शिकवायला आल्या. त्यांनी मायेची पाखर तिच्यावर घातली. तिचा आत्मविश्वास जागृत केला. ‘doll’ हा पहिला शब्द ती शिकली. त्या क्षणाचे वर्णन करताना हेलन केलर म्हणतात – हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले.

 

प्र. २. w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

Screenshot 20221222 061331 01 01 पाठ १६ – शब्दांचा खेळ

उत्तर:

20221222 062103 0000 01 पाठ १६ – शब्दांचा खेळ

प्र. ३. जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आतुर होणे.
(अ) खूप आनंद होणे.
(२) हिरमोड होणे.
(आ) प्रेम करणे.
(३) उकळ्या फुटणे.
(इ) उत्सुक होणे.
(४) पालवी फुटणे.
(ई) नाराज होणे.
(५) मायेची पाखर घालणे.
(उ) नवीन उत्साह निर्माण होणे.

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आतुर होणे.
(इ) उत्सुक होणे.
(२) हिरमोड होणे.
(ई) नाराज होणे.
(३) उकळ्या फुटणे.
(अ) खूप आनंद होणे.
(४) पालवी फुटणे.
(उ) नवीन उत्साह निर्माण होणे.
(५) मायेची पाखर घालणे.
(आ) प्रेम करणे.

प्र. ४. फरक स्पष्ट करा.

Screenshot 20221222 061331 01 02 पाठ १६ – शब्दांचा खेळ

उत्तर:

20221222 062647 0000 01 पाठ १६ – शब्दांचा खेळ

प्र. ५. खालील गटातील लेखननियमांनुसार योग्य असलेला शब्द लिहा. 

(अ) शिरीष, शिरिश, शिरीश, शीरीष = 

उत्तर: शिरीष

 

(आ) पुनर्वसन, पूनर्वसन, पुनर्वसन, पुनरवसन = 

उत्तर: पुनर्वसन

 

(इ) पारंपारिक, पारंपरिक, पारंपारीक, पारंपरीक = 

उत्तर: पारंपरिक

 

(ई) क्रिडांगण, क्रीडांगण, क्रिंडागण, क्रिडांगन = 

उत्तर: क्रीडांगण

 

प्र. ६. खालील वाक्यातील काळ ओळखा. 

(अ) काल शब्द शिकून घेतले. 

उत्तर: पूर्ण भूतकाळ

 

(आ) सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली. 

उत्तर: पूर्ण भूतकाळ

 

(इ) आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली. 

उत्तर: साधा भूतकाळ 

 

प्र. ७. स्वमत.

(१) तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहात असेल ?

उत्तर: जेव्हा हेलन water हा शब्द प्रत्यक्ष अनुभवातून शिकली, तेव्हा तिला गमावलेली स्मृती परत येण्यातला थरार जाणवला. तिचे मन चैतत्याने भारले व तिची जगण्याची उमेद वाढली. आत्म्याला नवी जाग आली व नवी दृष्टी मिळाली. त्या दिवशी तिने खूप नवे शब्द शिकून घेतले. त्यामुळे तिच्या भावविश्वाला पालवी फुटली. तो दिवस हेलनचा नाट्यमय होता. रात्री झोपताना तिला स्वतः आनंदी जीव आहोत, याची जाणीव झाली. ती दिवसभराच्या आनंदी आठवणी पुन्हा पुन्हा आठवत राहिली. तिला दुसऱ्या नवीन दिवसाची उत्कंठा लागली. म्हणून हेलन केलर पहिल्यांदा आयुष्यात ‘उदयाची’ वाट पाहत होती.

 

(२) ‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या. 

उत्तर: ‘ॲनी सुलिव्हॅन’ या हेलन केलरच्या जीवनात येण्यापूर्वी हेलन केलरचे मन रागाने व कडवटपणाने भरलेले होते. पहिल्यांदा ॲनी सुलिव्हॅन तिला शिकवायला आल्या, तेव्हा त्यांनी ‘डॉल’ आणली होती व बोटांनी हळूच हेलनच्या हातावर अक्षरे जुळवली होती. तेव्हा हेलनचे मन बालसुलभ आनंदाने व अभिमानाने फुलून आले होते. कालांतराने इतर अनेक शब्द हेलन शिकली. पण विहिरीपाशी तिला ‘वॉटर’ या शब्दाचा जो ‘प्रत्यक्ष अनुभव आला, त्याने ती थरारली. तिला नवीन चैतन्यमय दृष्टी प्राप्त होऊन तिच्या भावविश्वाला नवी पालवी फुटली. ती ‘उदयाच्या’ भविष्यातील सुखस्वप्ने पाहू लागली. ॲनी सुलिव्हॅन या बाईंमुळे हेलनला जगण्यातला आत्मविश्वास गवसला; म्हणून “ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती” हे विधान सत्य आहे.

 

प्र. ८. अभिव्यक्ती.

(१) तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.

उत्तर: दिव्यांग मुले पाहू शकत नाहीत; म्हणून वस्तूंचे आकार त्यांना कळणे कठीण होते. स्पर्शाने ते वस्तूंचे आकार ओळखतात. पण दृष्टीचे सुख दिव्यांग मुलांना मिळत नाही. कर्णबधिर असल्यामुळे त्यांना भाषा पारखी होते. ध्वनींचे ज्ञान होत नाही. त्यामुळे दिव्यांग मुले वाचेने बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. हालचालींवरून समोरच्यांशी संवाद ते साधतात. अशा दिव्यांग मुलांच्या अडचणी समजावून घेऊन व त्यांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन त्यांना उत्तम नागरिक करण्याची जबाबदारी धडधाकट माणसांची आहे.

 

(२) ‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा. 

उत्तर: ‘मुले म्हणजे देवाघरची फुले!’ डहाळीवरची फुले जशी निरागस व भाबडी असतात, तसे प्रत्येक मूल हे निरागस असते. त्यांची मने कोवळी व नाजूक असतात. दिव्यांग मुले व इतर मुले यांत बिलकूल फरक करता कामा नये. दिव्यांग मुलांना आपण दिव्यांग आहोत, याची जरासुद्धा जाणीव नसते. म्हणून त्यांना शिक्षण देताना भेदाभेद करून चालणार नाही. दिव्यांग मुलांना इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेण्याचा समान हक्क आहे आणि तो त्यांना मिळवून देणे, हे समाजाचे कर्तव्यच आहे. केवळ दया दाखवणे हे नाकर्तेपणाचे लक्षण आहे. सह-अनुभूती महत्त्वाची आहे; म्हणून सर्वसाधारण मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी दयायला हवी. त्यांना स्वतंत्र अस्तित्व देणे गरजेचे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतर मुलांप्रमाणेच फुलायला हवे.

 

उपक्रम :

नसीमा हुरजूक यांचे ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मवृत्त मिळवून वाचा.

(विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे)

 

चाकासी खुर्ची पुस्तकाचा सारांश;

वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी… अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते…!

 

सुरवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते; पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व, नसीमा हुरजूक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी…. त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाऊंडेशन’ सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, आदर्श व्यक्ती म्हणून केंद्र सरकारने गौरवलेल्या प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन.”