Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ - विश्वकोश (स्थूलवाचन)

An overview of what an encyclopaedia is and how it was made is provided in this lesson. Some of the distinguishing characteristics of the encyclopaedia include the fascinating process of gathering references, language enrichment, and gaining knowledge of a certain topic connected to many other areas.

 

Your school’s town or city has a library. There, you may find several books on Marathi literature as well as many other subjects. Every library is proud to have the Marathi Encyclopaedia (Marathi Vishwakosh), the Marathi Charitra Kosh, the Marathi Vyutpatti Kosh, etc.

 

To gather knowledge and data on all topics in the social sciences, pure sciences, and technology, encyclopaedias were developed. Marathi Vishwakosh is useful for learning about the core topic and its connected subjects.

 

The spread of education was quick in India. The needs of society in terms of science and technology began to increase as industrialization grew. Many words and phrases were used. Language and life have both improved. As a result, the demand for a multi-topic database (an encyclopaedia) increased.

 

The language of instruction for higher education was Marathi. Due to the urgent need for Marathi reference books and the recognition of Marathi as the official language of the government, it was necessary to create a multi-subject database (Vishwakosh) in the language. Dr. Shridhar Vyankatesh Ketkar introduced the very first encyclopaedia in the years preceding Indian independence.

स्वाध्याय

प्र. १. टीप लिहा.

(१) विश्वकोशाचा उपयोग- 

उत्तर: शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे.

 

(२) विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया-

उत्तर: मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले – मुख्य, मध्यम व लहान नोंदी. त्यांतील मुद्द्यांची टाचणे करण्यात आली. नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारांनुसार यादया तयार करण्यात आल्या. अकारविल्ह्यानुसार या यादया क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे १९७६ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत.

 

प्र. २. ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर: विविध मासिकांमधून व वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने-नवे शब्द कळतात. आपली शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दाचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो. उदाहरणार्थ, जंगल या शब्दाला अरण्य, रान, वन, कानन, विपीन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो. शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या यांची जाण शब्दकोड्यामुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.

 

प्र. ३. विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.

उत्तर: आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतनीस होतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषयसाखळीमुळे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात.

 

प्र. ४. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.

उत्तर: मोकळे केस इतरांना दिसू नयेत, म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा. लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढवणे हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे, हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो. केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो.

 

प्र. ५. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.

उत्तर: मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची व्युत्पत्ती, तिचा इतिहास, वेदांपासून ते अद्ययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास मदत होईल.

भाषा सौंदर्य

विश्वकोश अकारविल्ह्यांनुसार (अनुज्ञेय) पाहावा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्णवर्णमाला (आता ॲ व ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णांची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).

 

खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्येहे भरतात.

(१) फु
(२)

×

मा
(३)
रे
गू
(४)

×

गू
(५)
पू

भाषाभ्यास

अनुस्वार लेखनाबाबतचे नियम :

* खालील शब्द वाचा.

‘रंग’, ‘पंकज’, ‘पंचमी’, ‘पंडित’, ‘अंबुज’ हे शब्द तत्सम आहेत. हे आपण पर-सवर्णानेसुद्धा लिहू शकतो, म्हणजे अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरून लिहू शकतो. उदा., रङ्ग, पङ्कज, पञ्चमी, पण्डित, अम्बुज असे. विशेषत: जुने साहित्य वाचले तर असे लेखन दिसते. परंतु, आजकाल अशी पर-सवर्णाने लिहिण्याची पद्धत जुनी झाली आहे. त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात. खालील शब्द बघा कसे दिसतात!
‘निबन्ध’, ‘आम्बा’, ‘खन्त’, ‘सम्प’, ‘दङ्गा’ हे शब्द बघायला विचित्र वाटतात ना! कारण हे तत्सम नाहीत. पर-सवर्ण लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावेत.
मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

 

* खालील शब्द वाचा.

‘सिंह’, ‘संयम’, ‘मांस’, ‘संहार.’ या शब्दांचा उच्चार खरे तर खूप वेगळा आहे ना? या शब्दांचे ‘सिंव्ह’, ‘संय्यम’, ‘मांव्स’, ‘संव्हार’ उच्चार असे होत असले तरी लिहिताना हे शब्द तसे लिहू नयेत.
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

 

पर-सवर्णाने लिहा. 

(१) घंटा

उत्तरे: घण्टा

 

(२) मंदिर

उत्तरे: घण्टा

 

(३) चंपा

उत्तरे: चम्पा

 

(४) चंचल 

उत्तरे: चञ्चल

 

(५) मंगल

उत्तरे: मङ्गल

 

अनुस्वार वापरून लिहा.

(१) जङ्गल 

उत्तरे: जंगल

 

(२) चेण्डू 

उत्तरे: चेंडू

 

(३) सञ्च

उत्तरे: संच

 

(४) गोन्धळ

उत्तरे: गोंधळ

 

(५) बम्ब

उत्तरे: मङ्गल