Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १२ - पुन्हा एकदा

The poetess writes: Once more, let the lightning flare and plunge to blend into the youthful blood and spark the young muscles to shout as she expresses her desire to establish a society based on new ideals. May it happen again soon!

 

Allow the rain to flood the soil recklessly once more. Allow the ground beneath the feet to meld into it. Let new values spread across society and eradicate prejudice against people based on their caste, creed, race, or religion. and bring people back together!

 

Allow the creative wind to blow once more, this time igniting the youth’s desire for fresh reforms. Let them pursue the goal without thinking about hunger or thirst.

 

Let the nation pay attention to the fortune-telling forecast to welcome the next generation. Let India, our motherland, establish its dominance outside the planet. Let there be a fresh start for humanity, illuminating the land and the sky once more with new ideals!

(१) प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री –

प्रतिमा इंगोले.

 

(२) कवितेचा रचनाप्रकार –

मुक्तछंदातील कविता.

 

(३) कवितेचा विषय –

समाजातील भेदाभेद संपून निकोप व आदर्श समाज निर्माण व्हावा.

 

(४) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव –

नवविचारांची नव समाजनिर्मिती हा मूल्यभाव व्यक्त झाला आहे.

 

(५) कवितेच्या कवींची /कवयित्रींची लेखनवैशिष्ट्ये –

कवितेची भाषा साधी व थेट काळजाला भिडणारी आहे. वीज, पाऊस व वारा अशी तीन प्रतीके वापरून कविता आशयसंपन्न झाली आहे. प्रत्येक कडव्यात एक अंतर्गत शब्दलय साधली आहे.

 

(६) कवितेची मध्यवर्ती कल्पना –

परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा. नवविचारांनी भारावा. धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद मिटून नवनिर्मिती व्हावी, अशी इच्छा कवयित्रींनी प्रकट केली आहे.

 

(७) कवितेतून व्यक्त होणारा विचार –

सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मता या मुल्यांचे रोपण व्हावे. त्यांतून नवीन विचारांनी भारलेला नवीन सकारात्मक समाज निर्माण व्हावा. मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवावी, हा विचार या कवितेतून व्यक्त झाला आहे.

 

(८) कवितेतील आवडलेली ओळ –

मातीत माती व्हावी एक.

 

(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –

माणुसकीचा व धर्मभेदापलीकडच्या समाजाच्या निर्मितीचा विचार जनमानसात रुजवणारी ही कविता मला आवडली. अलीकडच्या काळात समाज मूल्यहीन व एकारलेल्या धर्माध विचारांचा होऊ पाहतोय. या बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात तरुणाईने एकत्र व्हायला हवे, हा आशय या कवितेत मांडल्यामुळे ही कविता मला आवडली.

 

(१०) कवितेतून मिळणारा संदेश –

सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये आपण जपायला हवीत व धर्मनिरपेक्षता दृढ व्हायला हवी. नवीन मानवतावादी विचारांचा प्रसार व्हायला हवा.

स्वाध्याय

प्र. १. कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

(१) पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण ……………………………….

उत्तर: मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट व्हावेत.

 

(२) भुलावी तहान विसरावी भूक, कारण ……………………………………..

उत्तर: इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागावी.

 

प्र. २. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
(१) वीज चमकणे.
(२) वारा घुमणे.

उत्तर:

गोष्टी परिणाम
(१) वीज चमकणे.
रक्तात भिनून स्नायू पेटावेत. घोष करावा.
(२) वारा घुमणे.
तहानभूक विसरून युवक भारला जावा. त्याला नवनिर्माणाची चाहूल लागावी.

प्र. ३. खालील प्रतीके व त्यांचा अर्थयांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी
(अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी
(२) मातीत माती एक व्हावी
(आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी
(इ) मातीने भेदभाव विसरावा
(४) पुसून टाकीत भेदभाव
(ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(५) उजळावी भूमी दिगंतात
(उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी
(ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(२) मातीत माती एक व्हावी
(इ) मातीने भेदभाव विसरावा
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी
(उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी
(४) पुसून टाकीत भेदभाव
(आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
(५) उजळावी भूमी दिगंतात
(अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी

प्र. ४. भावार्थाधारित.

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.

उत्तर: आपण सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीत राहतो. भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात. विविधतेत एकता, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु कधी कधी वर्णभेद, जातिभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली घडतात. असे होऊ नये. मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावी, म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी. सर्व भेदभाव नष्ट व्हावेत. म्हणजे पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शक्त होईल. सर्व जगात मानाने वावरेल.

 

प्र. ५. अभिव्यक्ती.

(१) आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.

उत्तर: राक्षसीवृत्ती कधी कधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते. यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मूल्यशिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणूत सर्वधर्मसमभावाचे व्रत प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मा जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशात धर्मभेद लयाला जातील व पुन्हा एकदा भारत साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल, असे वाटते.

 

(२) कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.

उत्तर: नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेत व्यक्त झाला आहे. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व नवनिर्मितीचा घोष करावा. पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जावी. म्हणजेच सर्वधर्मसमभावाच्या, राष्ट्रीय एकात्मतेच्या पावसात सारे जातिभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत; अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना दिसतात. नवविचारांचा वारा घुमावा व त्याने तरुणाईची मने भारून जावीत. नवसमाजरचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी.

अपठित गद्य आकलन

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्र. १. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक

उत्तर: प्रकाश, सत्य व साधेपणा

 

(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक

उत्तर: त्याग व नम्रता

 

(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक

उत्तर: हरितश्यामल भूमाता

 

          आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

 

प्र. २. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.

उत्तर: भारत मध्ये अनेक जातीचे लोक राहतात आणि ह्या तिराग्यमधील मधील तीन त्यांचे स्पष्टीकरण करते. ह्या तीन रंग मध भगवा हा रंग मराठी लोकांचा मानल्या जातो आणि हिरवा हा रंग मुस्लिम लोकांचा आहे असे मानले जाते. भारताचा तिरंगा हा खूप महत्वाचा अर्थ स्पष्ट करतो. 

 

भारत मध्ये अनेक जातीचे लोक राहतात आणि ह्या तिराग्यमधील मधील तीन त्यांचे स्पष्टीकरण करते. ह्या तीन रंग मध भगवा हा रंग मराठी लोकांचा मानल्या जातो आणि हिरवा हा रंग मुस्लिम लोकांचा आहे असे मानले जाते. भारताचा तिरंगा हा खूप महत्वाचा अर्थ स्पष्ट करतो