Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ - व्हेनिस (स्थूलवाचन)

The author of this travelogue, Ramesh Mantri, has expertly captured Venice, an idyllic Italian city floating on water, from a variety of angles.

 

The “Grand Canal,” a sizable canal in the Italian city of Venice, serves as one of the main waterways through the city. Public transportation is handled by water taxis like launches and motorboats.

 

Approximately 200 people can be transported on these boats. For tourists, it is a fascinating experience to sit on tables and chairs placed beneath bright umbrellas along the side of the canals and take in the view of passing floating watercraft while quietly sipping coffee.

 

At the same moment, boat passengers look over at the animated visitors standing by the deck railing.

 

The author arrived at Venice, where there was a good vibe and a sense of excitement. Happy youth floated on the waves as music played in everyone’s heads. Venice is unlike any other city in the world; it appears to float on the sea, which is incredible. There are no cars, traffic signals, traffic cops, or traffic backups. In reality, there are simply large and tiny canals with connecting bridges – no highways. This metropolis is made up of a number of little islands.

 

It appears to be a velvety blue carpet laid over the water that is covered in rubies and diamonds from a distance. The sky is pierced between the turrets of a church or an antique mansion.

 

The city of Venice is relatively sleepy. Everything is tranquil and serene. Tourists aren’t in a rush, and the city prefers to keep a distance from the bustle of a fast-paced city.

 

Venetian sightseeing on the water is fantastic! It resembles a floating aquatic kingdom rather than merely being a city of water canals. A wonderful city buzzing with energy and revelry.

स्वाध्याय

प्र. १. टिपा लिहा.

(१) ग्रँड कॅनॉल 

उत्तर: विस्तीर्ण नदीसारखा ग्रँड कॅनॉल हा एक प्रचंड कालवा व्हेनिस शहरात आहे. या कालव्यात प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अनेक लहानमोठ्या लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक बोटी सतत फिरत असतात. या बोटीमध्ये सुमारे दोनशे प्रवासी सहज प्रवास करतात. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर चार खुर्च्या एका टेबलाभोवती मांडून त्यावर रंगीबेरंगी मोठी छत्री अशी व्यवस्था आहे. तिथे बसून कॉफी पीत माणसे कालव्यातील प्रवासी बोटींची मौज अनुभवतात. बोटीतील प्रवासीही डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या प्रवाशांकडे पाहत पुढे सरकतात.

 

(२) व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर 

उत्तर: व्हेनिस हे गाडीचे अखेरचे स्टेशन आहे. तेथे रेल्वेचे नोकर ‘ऑल आऊट’ असे इंग्रजीत व त्या अर्थाचे इटालियन व फ्रेंच भाषेत ओरडत डब्यांतून फिरतात. स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीच. विस्तीर्ण नदीसारख्या ग्रँड कॅनॉल नावाचा प्रचंड कालवा आहे. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस व मोठ्या यांत्रिक बोटी उभ्या असतात. ‘व्हेनिझिया-व्हेनिझिया, पियाझा-पियाझा’ असा पुकारा चाललेला असतो. लेखक टॅक्सीपेक्षा बोटीच्या बसने अडीचशे लिराचे तिकीट काढून पुढच्या प्रवासाला निघाले.

 

प्र. २. खालील मुद्‌द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

(अ) व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. 

उत्तर: व्हेनिसमध्ये रस्ते जवळजवळ नाहीतच. अनेक कालवे व त्यांना जोडणारे पूल आहेत. ग्रँड कॅनॉल नावाचा नदिएवढा विस्तीर्ण व प्रचंड कालवा आहे. या कालव्यातून लहान मोटार लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक बोटी ये-जा करीत असतात. व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे, व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे, तर कालव्यात तरंगणारे शहर आहे. म्हणून व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन असे म्हटले जाते.

 

(आ) व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर. 

उत्तर: व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. तेथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. तिथल्या हवेत गारवा आणि वाऱ्यात उत्साह असतो. तेतील वास्तव्यात आपल्या मनात संगीत ८ नगर – वाजत राहते. आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य खेळत राहते. एक इटालियन लेखक प्रस्तुत लेखकांना असे म्हणाला की, व्हेनिस हे जगातील असे शहर आहे, ज्याचे वर्णन करता येत नाही. तिथे प्रत्यक्षात जायला हवे, फिरायला हवे, तिथली हवा खाल्ली पाहिजे. तिथे मुक्काम केला पाहिजे.

 

प्र. ३. खालील संकल्पना स्पष्ट करा.

(अ) व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका…………..

उत्तर: व्हेनिस हे रूढार्थाने शहर नाही, ते एक सुंदर गाव आहे. तिथे रस्ते नाहीत, नुसते कालवे आहेत व त्यांना जोडणारे पूल आहेत. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा, तसे हे लाडिक व प्रेमळ पूल आहेत. अनेक छोट्या बेटांचा हा पुंजका लांबून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा दिसतो.

 

(आ) व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर …………..

उत्तर: व्हेनिसच्या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर मध्ये टेबल ठेवलेल्या खुर्च्या टाकून व वर रंगीत छत्री घेऊन माणसे कॉफी पीत कालव्यांतील बोटींच्या हालचीनींची मौज लुटत बसतात. बोटीवरचे लोकसुद्धा किनाऱ्यावरच्या या निरुद्योगी, संथ, शांत, चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकतात. कसलीही, कुणालाही घाई-गर्दी-धावपळ नसते. म्हणून ते शहर निरुद्योगी शहर म्हटले आहे.

 

प्र. ४. ‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.

उत्तर: व्हेनिस शहर हा अनेक छोट्या बेटांचा सागरातला पुंजकाच आहे. या शहरात रस्ते, नाहीत. एकही मोटार नाही. आहेत ते फक्त आणि कालवेच् व त्यांना जोडणारे पूल. व्हेनिसमध्ये ग्रँड सारखा नावाचा प्रचंड नदीएवढा विस्तीर्ण कालवा आहे. त्यातून लहान-मोठ्या बोटी फिरतात, प्रवाशांची ने-आण करतात व्हेनिसमध्ये अफाट जलदर्शन होते. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचे शहर नव्हे, तर कालव्यांत तरंगणारे शहर आहे. अशा प्रकारे व्हेनिस हे कलासक्त व निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर असल्यामुळे ‘पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे,’ असे म्हटले जाते.

 

प्र. ५. तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.

उत्तर: गेल्या वर्षी आमची ‘मुंबई दर्शन’ची सहल होती. त्या वेळी मी मुंबई शहराला भेट दिली. मुंबई हे प्रचंड गर्दीचे व धावपळीचे शहर आहे. मुंबईचे दक्षिण, मध्य व उत्तर असे तीन विभाग पडतात. हे विभाग लांबलचक रस्ते व रेल्वेमार्गाने जोडलेले आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. बसेस व खाजगी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. दक्षिण मुंबईत अजूनही जुन्या मुंबईच्या निशाण्या जिवंत आहेत. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे महाद्वार समुद्राला लागून आहे. याला ‘काळा घोडा’ परिसर असे म्हणतात. तिथे प्रचंड मोठे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) आहे. त्याला लागून सुप्रसिद्ध ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ आहे. त्यासमोर पुराणे एल्फिन्स्टन कॉलेज आहे. फोर्ट विभागात हुतात्मा चौक आहे. पूर्वीचे बोरीबंदर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रचंड मोठे श्रीछत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे. येथून लोकलगाड्या व भारतभर जाणाऱ्या रेल्वेगाड्या आहेत. कुलाब्यापासून वाळकेश्वरपर्यंत समुद्राला लागून असलेला मोठा रस्ता – हा रात्री दिव्यांनी झगमगतो. त्याला ‘क्विन्स – नेकलेस’ असे म्हणतात. मध्य मुंबईत राणीचा बाग व कामगारवस्तीचे गिरणगाव आहे. उत्तर मुंबई मोठमोठ्या इमारतींनी व माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेले असते. महाराष्ट्राच्या या राजधानीची सफर करणे हा एक सुखद पण विस्मयकारक अनुभव आहे.

भाषाभ्यास

विरामचिन्हे

* खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.

(१) आवडले का तुला हे पुस्तक

(२) हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली

(३) वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का

 

          वरील संवाद वाचताना वाक्य कुठे संपते, प्रश्न आहे की उद्गार आहे, हे काहीच कळत नाही कारण या वाक्यात विरामचिन्हे नाहीत. बोलताना काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो, म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळावा, यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. 

 

* वरील वाक्यातील चिन्हे आणि त्यांची नावे यांचा तक्ता तयार करा.

(१) आवडले का तुला हे पुस्तक

उत्तर: आवडले का तुला हे पुस्तक ?

 

(२) हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली

उत्तर: “हो! जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे,” जया म्हणाली.

 

(३) वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का

उत्तर: वडील म्हणाले, “ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का?”

 

विरामचिन्हे नावे
?
प्रश्नचिन्ह
" "

!

.
दुहेरी अवतरणचिन्ह

उद्गारचिन्ह

पूर्णविराम
,

-
स्वल्पविराम

संयोगचिन्ह