Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १३ - तिफन

In the dark earth, the plough is in motion. The clouds thunder as if beating a drum while the lightning dances in the sky. Rain is falling heavily.

 

Goddess Parvati, the farmer’s wife, follows behind while carrying a sack of seed grain, which she carefully scatters in the ground as Lord Sadashiv (in the shape of a farmer) drives the pair of bulls (Nandi) in his field.

 

The infant is kept in a cotton swing that the farmer’s wife keeps tethered to a tree branch as she toils and moils along. The baby cries because it misses its mother’s care. Clouds continue to pour rain.

 

The rice fields’ parallel rows of sowed seed grains shimmer as though moonlight is being dispersed. They resemble green tattoo-like spots in the dark dirt. Rainfall after shower falls, soaking the ground and making it fertile. The scent of the earth tempts the senses. The farmer, a parrot, controls the tripod while his wife, Myna, a parrot, attends to him. The showers pour continuously.

 

The plough attempts to hold the seeds that are dispersed throughout the soil as it is being drawn through it, with its blades attempting to catch the dropping seed grains. A silky, creamy feeling is provided to feet by the way the damp lump of earth breaks up. The green dream in that dark lump of soil is visible to the farmer’s sight. A thorn stabs the farmer’s foot while his eyes are dreaming. In the midst of the red blood spilling out, a green vision of the future begins to bloom. Rain falls heavily from the sky.

(१) कवी / कवयित्री –

सुप्रसिद्ध कवी श्री. विठ्ठल वाघ यांची ही कविता आहे. 

 

(२) संदर्भ –

पेरणीच्या हंगामाचा संदर्भ या कवितेला आहे.

 

(३) प्रस्तावना –

कवी विठ्ठल वाघ यांचे ‘काळ्या मातीत मातीत,’ ‘पंढरीच्या वाटेवर’, ‘कपाशीची चंद्रफुले’, ‘पाऊसपाणी’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रामीण जीवनातील वास्तव वर्णन करणे, हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

 

(४) वाङ्मयप्रकार (काव्यप्रकार) –

वैदर्भीय बोलीभाषेतील लोकगीताचा छंद या कवितेचा आहे.

 

(५) कवितेचा विषय –

पेरणीच्या वेळी शेतकामाची लगबग व शेतकऱ्याचे कष्टमय जीवन हा या कवितेचा विषय आहे.

 

(६) कवितेतील आवडलेल्या ओळी –

‘झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते 

त्यात तानुलं लळते ढग बरसते.’

 

(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना –

काळ्या मातीत पेरणी चाललेली असताना शेतकरी व शेतकरीण भर पावसात सहकार्याने बियाणे पेरतात. झोळीत तान्हुले रडत असते नि पायात काटा रुततो, तरी शेतकऱ्याच्या डोळ्यांतील फुललेले हिरवे स्वप्न यांचे हृदयंगम चित्रण प्रस्तुत कवितेत केले आहे.

 

(८) कवितेतून मिळणारा संदेश –

साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, त्याचे कष्टमय जीवन जाणून घ्यावे व ग्रामीण जीवनाचा व बोलीचा परिचय व्हावा, हा उद्देश समाजमनाला कळणे, फार महत्त्वाचे आहे.

 

(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –

शेतकऱ्यांच्या कष्टकरी जीवनाचे चित्र हृदयाला भिडणारे आहे. भर पावसात शेतीकाम करताना तान्हे मूल रडत असतानाही पेरणी करावी लागते व हिरवे स्वप्न फुलवावे लागते, हा आशय हृदय हेलावून सोडणारा आहे. लोकगीताची एक संथ लय या कवितेला आहे. पावसात भिजलेल्या मातीला न्हातीधुती स्त्री म्हटले आहे व या काळ्या आईचे हृदय वर्णन चपखल शब्दांत केल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

 

(१०) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये –

विदर्भातील बोलीभाषेचा साज या कवितेला चढवला आहे. तसेच ८+६ अक्षरांचा लोकबंध या कवितेला असल्यामुळे या कवितेची अंतर्गत लय मनोहारी झाली आहे. आशयाला पूरक असलेला लोकगीताचा बाज व लयबद्धता ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. शेतकऱ्याची दशा व कष्टाला समर्पक शब्दांची जोड मिळाल्यामुळे आणि सहज ओठात गुणगुणावा असा नाद कवितेला असल्यामुळे ही कविता गेयतेने परिपूर्ण झाली आहे.

स्वाध्याय

प्र. १. खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

(१) पेरणीसाठी लागणारे बियाणे 

उत्तर: बिजवाई 

 

(२) शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार 

उत्तर: तिफन 

 

(३) पाराबती करते त्या दोन कृती 

उत्तर: 

ओटी पोटाला बांधते.

झोळी काठीला टांगते.

 

प्र. २. खालील ओळींतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

(१) काकरात बिजवाई जस हासरं चांदनं 

उत्तर: नांगरलेल्या शेतजमिनीत पेरलेले बियाणे असे दिसते की जणू मातीवर चांदणे हसत आहे.

 

(२) काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते

उत्तर: पावसात नांगरून झालेल्या जमिनीत बी पेरले की भविष्यात हिरवे तरारलेले पीक उगवेल अशी शेतकऱ्याच्या मनात आशा निर्माण होते. काळ्या ढेकळातून उगवलेल्या हिरव्या कोंभाचे तो प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वप्न पाहतो आहे.

 

प्र. ३. या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द

उत्तर:

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
काया
काळ्या
जोळीले
जोडीला
झोयी
झोळी
लळते
रडते
लाळानौसाचं
लाडानवसाचे
पाळते
पाडते
सांजीले
सांजवेळी
रगत
रक्त

प्र. ४. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना

उत्तर:

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
शेतमधील पेरणी
सदाशिव व पार्वती
काक्रात बिजवाई जसं हसरं चांदनं
वीज नाचते नि ढग बरसतात

प्र. ५. अभिव्यक्ती.

(१) ‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्वसपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

उत्तर: शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करतो. त्याचे पोट भरण्यासाठी व संसार चालवण्यासाठी शेतात पीक येणे गरजेचे असते. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून पावसाची चाहूल लागताच तो शेत नांगरती व बियाणे पेरतो. या ओळीमध्ये ‘काटा पायात रुततो आणि रक्त निघते’ या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या दु:खाचे सूचन केले आहे. पण शेतात धान्य उगवणार आहे, हे हिरवे स्वप्न तो डोळ्यांनी पाहत असतो. पीक उगवण्याच्या आनंदात तो असल्यामुळे त्याला कष्टाचे व सोसलेल्या दुःखाचे काहीच वाटत नाही. म्हणून कवींनी म्हटले आहे की काटा रुतून पायातून लाल रक्त जरी आले तरी त्या लाल रक्तात उदयाचे हिरवे स्वप्न फुललेले आहे.

भाषाभ्यास

* खालील वाक्ये वाचा.

(१) मी शाळा जातो.

(२) मी शाळेत जातो.

 

ही दोन वाक्येतुम्ही वाचलीत. यांपैकी पहिले वाक्य चुकीचे आहे कारण त्या वाक्यांचा अर्थबोध होत नाही आणि दुसरे वाक्य बरोबर आहे कारण त्या वाक्यांचा पूर्ण अर्थबोध होतो. या दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यात ‘शाळा’ हा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यात ‘शाळा’ या शब्दाला ‘-त’ हा प्रत्यय लागला आहे.

 

* खालील वाक्ये वाचा.

(१) राम मित्राशी बोलतो. 

(२) रेश्मा पालीला घाबरते. 

(३) कल्पना दुकानात जाते.

 

या वाक्यांमध्ये, मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे -शी, -ला, -त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्येकाही बदल झाले आहेत. उदा., मित्र~मित्रा-, पाल~पाली-, दुकान~दुकाना-. शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला सरळरूप म्हणतात. 

उदा., ‘दुकान’ हे सरळरूप आणि दुकाना- हे सामान्यरूप.

 

नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. -ला,-त,-ने,-शी,-चा,-ची,-चे इत्यादी.

 

नामांना व सर्वनामांना प्रत्ययांबरोबरच शब्दयोगी अव्यये जोडली जातात. तेव्हासुद्धा सामान्यरूप होते.