Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ १० – रंग साहित्याचे

Every language is enhanced by a body of literature. When different types of literature take human form and introduce themselves, they add to the beauty of language. The various characteristics of literature help in this process. When we get acquainted with these literary types, we not only get entertained but also acquire a fair amount of knowledge. This message is conveyed through this lesson. This animated lesson introduces us to various types of literary division.

उत्कंठा – उत्सुकता. 

रममाण हाेणे – मग्न होणे. 

भान ठेवणे – जाणीव ठेवणे.

कृती

(१) प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्यप्रकारांची नावे लिहा.

IMG 20231026 104805 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर:

IMG 20231028 214919 पाठ १० – रंग साहित्याचे

(२) आकृतिबंध पूर्ण करा.

(अ)

IMG 20231026 104826 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

IMG 20231028 214117 पाठ १० – रंग साहित्याचे

(आ)

IMG 20231026 104831 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

IMG 20231028 214132 पाठ १० – रंग साहित्याचे

(इ)

IMG 20231026 104932 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

IMG 20231028 214141 पाठ १० – रंग साहित्याचे

(३) फरक स्पष्ट करा.

IMG 20231026 104950 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

IMG 20231026 104620 पाठ १० – रंग साहित्याचे

(४) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

(अ) रस्ते 

उत्तर: रस्ता – हा रस्ता रूंद व डांबरी आहे.

 

(आ) वेळा 

उत्तर: वेळ – सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते.

 

(इ)  भिंती 

उत्तर: भिंत – चीनची भिंत खूप उंच व लांब आहे.

 

(ई)  विहिरी 

उत्तर: विहीर – गावाकडची विहीर पाण्याने भरली आहे.

 

(उ) घड्याळे 

उत्तर: घड्याळ – भिंतीवरचे घड्याळ सुशोभित दिसते.

 

(ऊ)  माणसे

उत्तर: माणूस – कष्टाळू व इमानदार माणूस बक्षिसपात्र असतो.

(५) खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

IMG 20231028 213658 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

परप्रांत

परभाषा

परदेश

परग्रह

परराष्ट्र

(६) खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.

यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष

IMG 20231026 105016 पाठ १० – रंग साहित्याचे

उत्तर: 

IMG 20231029 105049 jpg पाठ १० – रंग साहित्याचे

(७) स्वमत.

(अ) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.

उत्तर: पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच. पुस्तके आपल्याशी बोलतात. त्यांचे विचार प्रगट करतात. ज्ञान देतात. चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात. चित्रांद्वारे, शब्दांतून मनमोकळ्या गप्पा मारतात. शब्दसंग्रह वाढवितात. प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाही. रूसत नाहीत. भांडत नाहीत. काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Friendship with books is sheer joy. Books speak to us and express their thoughts. It provides knowledge. It gives inspiration for good work. It explains difficult concepts in simple terms. Open-hearted chats through pictures and words increase vocabulary. They enjoy visiting various places on occasion. Books are never angry with us. It doesn’t displease or fight. They have no expectations. So it is equally important to befriend them and take care of them.

(आ) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाती’, ‘स्वामी’ या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.

My favorite type of literature is a novel. A novel is a big story, decorated with various characters and occasions. If the novel is good, it does not get out of hand. I look forward to what will happen next. The characters are introduced in it, and those characters start to feel like one of us. The mind is happy in the novel. Consciousness is lost in the event of happiness. A sad event also feels very sad; so much can be identified with the novel. ‘Yayati’ and ‘Swami’ are my favorite novels.

(इ) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर: ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात. लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.

As the saying goes, reading gives us many benefits. Reading increases vocabulary. Learn new concepts. Thoughts deepen. All of these are useful for being a writer. Information about the customs, culture, new inventions, tourism, and educational level of society is obtained by reading. A meeting of minds is sure. A sense of time comes. Learn new and old things. Great ideas are revealed through good writing.

(ई) तुम्हांला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्‌द्यांचा विचार करून माहिती लिहा.

(१) पुस्तकाचे नाव 

(२) लेखक 

(३) साहित्यप्रकार 

(४) वर्ण्यविषय 

(५) मध्यवर्ती कल्पना 

(६) पुस्तकातून मिळणारा संदेश 

(७) मूल्य 

(८) सामाजिक महत्त्व 

(९) आवडण्याची कारणे

उत्तर: मला ‘शामची आई’ हे पुस्तक आवडले. त्याचे लेखक ‘पांडुरंग सदाशिव साने’ हा ‘कादंबरी’ साहित्यप्रकार असून प्रस्तुत कादंबरीत श्याम हे मुख्य पात्र आहे. बालपणी त्यावर झालेले संस्कार, आईने लावलेले वळण, घरची गरीबी पण संस्कारांची श्रीमंती अशा मिश्रणातून घडलेला श्याम म्हणजे स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने. अर्थात साने गुरूजी. मोठेपणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. गांधीवादाचा पुरस्कार केला. कारागृहात रोज रात्री आपल्या इतर कैदी मित्रांसोबत लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. रोज एक कथा सांगण्याचा परिपाठ झाला व त्यातून ‘श्यामची आई’ पुस्तक साकारले. धारिष्ट्य, खरेपणा, स्वाभिमान, निखळप्रेम, सहिष्णूता या गोष्टींचा अंतर्भाव या कादंबरीत ओतप्रोत भरला आहे.

 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्ध्यांक जरी वाढला तरी भावनांक कमी झाला आहे. ही कादंबरी वाचून समानता, आदरभाव, स्वाभिमान, सच्चेपणा या मुल्यांची सजवणूक समाजात होईल. आईविषयीचे नितांत प्रेम, आईचे ही खरे मार्गदर्शन अशा वात्सल्यतेची अपूर्व कहाणी ‘श्यामची आई’ मध्ये असल्याने ही कादंबरी आवडली.

I liked the book ‘Shamchi Aai’. Its author, ‘Pandurang Sadashiv Sane’, is a ‘novel’ literary genre, and Shyam is the main character in the presented novel. Shyam is the writer Pandurang Sadashiv Sane himself, who was born from a combination of childhood upbringing, mother’s twists, poverty at home, and a wealth of traditions. Of course, Sane Guruji participated in the freedom struggle as an adult. Advocated Gandhism. Every night in prison, he relived all his childhood memories with his other inmate friends. There was a cycle of telling a story every day, and the book ‘Shyamchi Aai’ was created out of it. Wisdom, honesty, self-respect, pure love, and tolerance are abundant in this novel.

 

In today’s age of technology, even though the IQ has increased, the emotional quotient has decreased. By reading this novel, the values of equality, respect, self-respect, and truthfulness will be inculcated in society. I liked this novel because ‘Shyamchi Aai’ is an extraordinary story of deep love for a mother and true guidance from a mother.

उपक्रम :

(१) साहित्यप्रकार व त्यांची वैशिष्ट्येयांबाबत आंतरजालावरून माहिती मिळवा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

 

(२) साहित्यप्रकारानुसार अन्य लेखकांची नावे व त्यांच्या साहित्यकृतींची नावे आंतरजालावरून शोधून लिहा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

वाक्यरूपांतर

वाक्यरूपांतराला वाक्यपरिवर्तन असेही म्हणतात. वाक्यरूपांतर म्हणजे वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल होय. आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्ये बोललो तर ऐकणाऱ्याला ती कंटाळवाणी वाटतात. तसेच लेखकांनी एकाच साच्याची वाक्येलिहिली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. म्हणूनच वाक्यरचनेतील बदल गरजेचा ठरतो. 

 

वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात अजिबात बदल होता कामा नये.

 

यावर्षी आपल्याला (१) प्रश्नार्थक (२) विधानार्थी (३) उद्गारार्थी (४) आज्ञार्थी (५) होकारार्थी (६) नकारार्थी

वाक्यांचे वाक्यरूपांतर शिकायचे आहे.

 

(अ) प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

(१) जगात सर्व सुखी असा कोण आहे? (प्रश्नार्थक)

जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (विधानार्थी)

वरील उदाहरणात होकारार्थी प्रश्नाचे रूपांतर मात्र विधानार्थी रूपांतर नकारार्थी झाले आहे.

 

(२) अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (नकारार्थी प्रश्न)

अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. (होकारार्थी)

वरील उदाहरणात नकारार्थी प्रश्नाचे रूपांतर मात्र होकारार्थी विधानात झाले आहे.

 

या दोन्ही उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्येच त्यांचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे, की

(१) प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे.

(२) प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे.

 

(आ) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर 

(१) केवढी उंच इमारत ही! (उद्गारार्थी)

ही इमारत खूप उंच आहे. (विधानार्थी)

(२) किती पाऊस पडला हो काल रात्री!

काल रात्री खूप पाऊस पडला.

 

उद्गारार्थी वाक्ये अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारक रीतीने व्यक्त केलेली असते. विधानार्थी वाक्यांत कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते स्पष्ट करावे. त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यांसारखे शब्द वापरले जातात.

 

(इ) आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

उदा., तू चित्र काढ. (आज्ञार्थी) 

तू चित्र काढावे. (विधानार्थी)

आज्ञार्थी वाक्यांत आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यांत सरळ विधान अभिप्रेत असते. या वाक्यांचे परस्पर वाक्यरूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा. 

 

(ई) होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

(१) पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी)

पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही. (नकारार्थी)

(२) ही काही वाईट कल्पना नाही. (नकारार्थी)

ही कल्पना चांगली आहे. (होकारार्थी)

 

वरील उदाहरणांमध्ये ‘मोठी’ विरूद्ध ‘लहान’ आणि ‘वाईट’ विरूद्ध ‘चांगली’ असे शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही.