Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ ९ – औक्षण

In touching words, the present poem has expressed the emotional turbulence experienced by common country people as they pray for the goodwill of the soldiers who sacrifice their lives for the safety and security of the country and its people. Their infinite faith and love towards the bravery of the soldiers is depicted in this poem.

औक्षण – ओवाळणे.

द्रव्य – धन, पैसा, संपत्ती.

बंबारा – बंदुकीच्या गोळ्यांचा/तोफगोळ्यांचा भडिमार. 

कल्लोळ – लोळ. 

पाजळणे – पेटवणे, चेतवणे

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

 

अर्थ : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र आपले जवान शत्रूशी दोन हात करत असतात. आपल्या भारतमातेचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सर्व आनंदाने, सुखाने जगत असतो. सण, उत्सव साजरे करत असतो. आपणांस त्यांचा नेहमीच अभिमान वाटत असतो. त्याचप्रमाणे कवयित्री इंदिरा संत या सुद्धा जवानांवर खूप प्रेम करतात. जवानांप्रती त्यांच्या मनात जिव्हाळा, प्रेम, आदर आहे. घरातून सीमेवर लढण्यासाठी जायला निघालेल्या जवानाला त्या ओवाळत आहेत. त्याला ओवाळणी करत असताना कवयित्रिच्या मनात विविध भावना निर्माण होतात. त्या म्हणतात, मी ओवाळणी करत आहे; पण माझ्याकडे संपत्ती, पैसे नाहीत, मी श्रीमंत नाही. माझ्या शरीरात लढण्यासाठी शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नाही. त्यामुळे ओवाळणी कशाप्रकारे करावी हे कवयित्रीला कळेनासे झाले आहे.

 

English Translation:

For the protection of the country, our soldiers are fighting the enemy day and night on the border. Protecting our motherland. That is why we all live happily and happily. Festivals are celebrated. We are always proud of them. Similarly poetess Indira Sant also loves jawans a lot. He has warmth, love and respect towards the soldiers. They are waving to a soldier who is leaving home to fight on the border. While waving him, various emotions arise in the poetess’s mind. They say, I am waving; But I have no wealth, no money, I am not rich. My body doesn’t even have blood rushing through its veins to fight. So the poetess has not known how to wave.

 

 

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

 

अर्थ : कवयित्रीला जवानाबद्दल नितांत आदर, प्रेम, जिव्हाळा आहे. त्याचे औक्षण करत असताना कवयित्री म्हणतात, या जवानांचे कार्य इतके मोठे आहे की, माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो जवानांच्या शौर्यगाथेपुढे, त्यांच्या पराक्रमापुढे त्यांच्या धैर्यापुढे, त्यांच्या कर्तव्यापुढे लहान आहे. तिचे आयुष्य त्याच्या शौर्यापुढे अगदी कवडीमोल (लहान) आहे. त्या जवानाची शौर्यगाथा इतकी महान आहे की त्या शौर्यगाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार ? असे कवयित्रीला वाटते.

 

English Translation:

The poetess has great respect, love and affection for the young man. While praising him, the poet says, the work of these jawans is so great that even if my life is sacrificed, it is small compared to the bravery of the jawans, compared to their bravery, compared to their duty. Her life pales in comparison to his bravery. The gallantry of that soldier is so great that what will be the honour of our common life before that bravery? The poetess thinks so.

 

 

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

 

अर्थ : सैनिक सीमेवर शत्रूशी लढत असतात, त्यावेळची परिस्थिती अतिशय हृदयद्रावक, हृदयाला हेलावून टाकणारी असते. युद्धभूमीवर शत्रू आक्रमण करत असतो. त्याचा परतवार करत असताना अनेक सैनिक घायाळ होतात. तोफांचा आवाज होत असतो, बंदुकीतून सुटणाऱ्या असंख्य गोळया अनेकांची छाताडे उडवत असतात. धुरावा लोळ उठत असतो. कवयित्री म्हणतात; हे सारे चालू असताना आपला हा जवान मागे हटत नाही तर दोन पावले नेहमी पुढेच टाकत असतो. न घाबरता, डगमगता, शत्रूशी दोन हात करून जिद्दीने लढत असतो.

 

English Translation:

Soldiers are fighting the enemy on the border, the situation is very heartbreaking, heart wrenching. The enemy is attacking the battlefield. While retaliating, many soldiers are injured. There is a sound of cannons, numerous bullets from the guns are blowing away the umbrellas of many people. Rolling fire is rising. The poet says; While all this is going on, this jawan of ours does not retreat but always takes two steps forward. Fearless, unwavering, stubbornly fighting the enemy with two hands.

 

 

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळ्यांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

 

अर्थ : सीमेवर चालू असलेल्या रणसंग्रामामध्ये आपल्या जवानाचा विजय निश्चित आहे. कवयित्री म्हणतात, या जवानांचा पराक्रम मला डोळे भरून पाहायचा आहे. तसेच आपल्या जवानाकडून भारतीयांची असलेली अपेक्षा व्यक्त करताना त्या म्हणतात, शत्रूला पराजित करून प्रत्येक युद्धात तुझाच विजय झाला पाहिजे. तुझ्या विजयाची दौड अशीच राहिली पाहिजे. तुझ्या विजयाने माझ्या डोळयांमध्ये आनंदाश्रू दाटून येतील. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत नेहमी तेवत असते तशीच माझ्या डोळयांतील अश्रूंची ज्योत नेहमीच पाजळत राहिली पाहिजे.

 

English Translation:

In the ongoing battle on the border, the victory of your jawan is certain. The poetess says, I want to see the valor of these soldiers with my eyes full of eyes. Also, while expressing the expectations of Indians from their soldiers, they say, you should win every war by defeating the enemy. Your victory streak should continue like this. Your victory will fill my eyes with tears of joy. Just as the flame of a lamp is always burning, the flame of tears in my eyes should always be burning.

 

 

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळ्यांचे असें

तुला एकच औक्षण.

 

अर्थ : कवयित्री सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला म्हणतात की, सर्व जनमानसांच्या असंख्य ज्योती तुझ्या रक्षणासाठी सदैव तुझ्याच पाठीशी आहेत. म्हणजेच असंख्य लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आम्ही सर्वजण दीनदुबळे आहोत. आमच्यामध्ये तुझ्यासारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये ती उमेद नाही. तुझ्याकडे हे सर्व आहे. तुझ्यामध्ये आणखी उर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत.

 

English Translation:

The poet says to the soldier who goes to fight on the border that the countless flames of all the people are always by your side to protect you. That means the blessings of countless people are with you. We are all weak. We are not as strong as you. There is no hope in the blood. You have it all. We all Indians are praying to you in the form of blessings to generate more energy in you.

कृती

(१) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?

उत्तर: जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते तसेच जेव्हा शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते.

 

(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?

उत्तर: धडाडत्या तोफांतून, धुरांच्या कल्लोळातून घोंघावणान्या बंबाऱ्याचा सामना करून सैनिक पुढे जातो म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.

 

(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?

उत्तर: जवानाची विजयाची दौड हे डोळे भरून पहावे असे दृश्य आहे.

(२) योग्य पर्याय निवडा.

(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते …..

(१) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत: करणाने

(२) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी

(३) तबकातील निरांजनाने

(४) भाकरीच्या तुकड्याने

 

उत्तर: पर्याय (२) : डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी

 

(आ) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे …..

(१) कष्टाचे, पैसे नसलेले.

(२) सैनिकाबरोबर लढणारे.

(३) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.

(४) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.

 

उत्तर: पर्याय (४) : सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.

(३) काव्यसौंदर्य. 

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळ्यांचे असें

तुला एकच औक्षण.’

 

उत्तर: कवयित्री सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला म्हणतात की, सर्व जनमानसांच्या असंख्य ज्योती तुझ्या रक्षणासाठी सदैव तुझ्याच पाठीशी आहेत. म्हणजेच असंख्य लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आम्ही सर्वजण दीनदुबळे आहोत. आमच्यामध्ये तुझ्यासारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये ती उमेद नाही. तुझ्याकडे हे सर्व आहे. तुझ्यामध्ये आणखी उर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत.

The poet says to the soldier who goes to fight on the border that the countless flames of all the people are always by your side to protect you. That means the blessings of countless people are with you. We are all weak. We are not as strong as you. There is no hope in the blood. You have it all. We all Indians are praying to you in the form of blessings to generate more energy in you.

(आ) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.

उत्तर: देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन ‘देशरक्षण’ हेच त्यांचे ध्येय असते. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुलेबाळे यांना ते महिनोंमहिने भेटत ही नाही. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. खाजगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करून केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात.

A soldier who guards the country’s borders is always a source of pride for the country. The citizens of the country can sleep peacefully because of his duty of national defense. Otherwise, our security would have been threatened due to foreign invasions, wars and crises. Their aim is to ‘protect the country’ by facing heat, rain and cold. They stand unflinchingly on the border, sacrificing their lives. He does not meet his family, children for months. They cannot even meet their loved ones for the duty of national defense. They cannot even meet their loved ones for the duty of national defense. These jawans are ready to defend the country only at the border by completely giving up their private life and pleasures.

(इ) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: ‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणान्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहेत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

Poet Indira Sant has told the poignant meaning of Dindubale in the poem ‘Aukshan’. We Indians love our country India very much. There are some of us who may not have money, wealth, or blood flowing in their veins, but still have pride in every one of them for the soldiers who go to battle on the frontier. With the flames in their eyes, they are beckoning the soldiers who are ready for battle. All of us poor Indians are praising you like this. Here Dindubale does not mean weak or penniless poor, but ‘Dindubale’ means ‘people who take pride in the work of soldiers’.

(ई) ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.

उत्तर: देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. त्यांचे हे काम अतुलनीय आहे. अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करु शकतो. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवानांसाठी तीळगुळ पाठवून स्नेह प्रदर्शित करू शकतो. त्यांच्या शहरातील वा गावातील कुटुंबाकडे स्थळभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारु शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतुट नाते जोडू शकतो.

Soldiers are serving the country thinking that the country is God. His work is unparalleled. For many months they leave their homes and families and fight on the border. Regardless of heat, cold and rain, they are ready to sacrifice their lives for the country. At such times we can appreciate their qualities by giving gift cards. One can send them a greeting card on 15th August Independence Day. Can send Rakhi to them on Raksha Bandhan day. Makar Sankranti can be a display of affection by sending tilagulas to border jawans. One can visit their family in their city or village and ask for their family’s happiness, can establish an unbreakable relationship of love with them.

(आ) ‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन ‘दोन दिवस’ या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दुःखावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जीवनचे खरे सत्य आहे. 

Poet Narayan Surve’s life struggle has been described in this poem ‘दोन दिवस’. The poet says that one should face the sorrows of life without fear or hesitation. Because suffering teaches a person a lot. While overcoming suffering, the power to overcome suffering is created in a person through many aspects such as overcoming the situation, making adjustments, finding new options, by realizing many abilities in us. So says the poet. Don’t be discouraged by the sorrows of life, face the adverse situation with strength and stand strong again in life. This is the real truth of life.

(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

उत्तर: ‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात. जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.

From Narayan Surve’s poem ‘दोन दिवस’, the life portrait of many hardworking people working in various service sectors stands in front. In many places, we see laborers doing many kinds of hard and very laborious work. They are always working hard with everything like sun, wind and rain. Necessary things of life are not provided to them. Life is not guaranteed. They work very hard for very low wages. They find life very difficult. There is no guarantee of getting work everyday. Thus the life of labourers in our country is very difficult.

उपक्रम :

(१) सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.

उत्तर: 

१) सैन्यात सामील होण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली? 

२) तुमच्या लष्करी अनुभवाने तुम्हाला एक व्यक्ती म्हणून कसा आकार दिला आहे? 

३) सेवेदरम्यान तुम्हाला कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आणि तुम्ही त्याचा सामना कसा केला याचे तुम्ही वर्णन करू शकता? 

४) सैन्यात कोणती मूल्ये महत्त्वाची आहेत असे तुम्हाला वाटते? 

५) तुम्ही तुमची लष्करी कर्तव्ये तुमच्या वैयक्तिक जीवनात संतुलित कशी करता? 

६) सैन्यात असताना तुम्ही कोणते महत्त्वाचे धडे शिकलात? 

७) तुमच्या लष्करी अनुभवाचा तुमच्या टीमवर्कच्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडला आहे? 

८) तुमच्या लष्करी सेवेमुळे जागतिक समस्यांवरील तुमचा दृष्टीकोन कसा बदलला आहे? 

९) तुम्ही तुमच्या लष्करी सेवेतील एक शक्तिशाली क्षण शेअर करू शकता जो तुमच्यासोबत राहिला आहे? 

१०) तुमच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये तुमची लष्करी कौशल्ये कशी वापरायची तुमची योजना आहे?

1) What inspired you to join the army?

2) How has your military experience shaped you as a person?

3) Can you describe a difficult situation you faced during service and how you dealt with it?

4) What values ​​do you think are important in the military?

5) How do you balance your military duties with your personal life?

6) What important lessons did you learn while in the military?

7) How has your military experience influenced your approach to teamwork?

8) How has your military service changed your perspective on world issues?

9) Can you share a powerful moment from your military service that has stayed with you?

10) How do you plan to use your military skills in your future endeavors?

(२) एखाद्या माजी सैनिकाची मुलाखत घेऊन त्याचे अनुभव जाणून घ्या.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

 

(३) ‘सैनिक’ या विषयावरील गीतांचे संकलन करून त्यांचा संग्रह करा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

भाषाभ्यास

रस म्हणजे चव किंवा रुची. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट अशा सहा प्रकारच्या चवी अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. त्यातील भावनांमुळे साधारणपणे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात.

IMG 20231028 120930 पाठ ९ – औक्षण

रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे. ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात. याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो. तसेच कधी कधी या नऊ रसांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात. कवितेतील रस हा विशिष्ट शब्दांत नसतो. उदाहरणार्थ, कवितेत ‘वीर’ हा शब्द आला म्हणजे त्या कवितेत वीररस असेलच असे नाही. तसेच ‘हुंदका’ शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही.