पाठ – जाता अस्ताला (स्थूलवाचन)
जाता अस्ताला सूर्याचे
डोळे पाणावले
जाईन मी जर या विश्वाचे
होईल कैसे भले
अर्थ : सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करत असतो. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्याने उचललेली आहे. या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी आहे. तो कुटुंबाचा प्रमुख या नात्याने चिंतातुर आहे.
आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल, ही भीती या सूर्याला वाटत आहे. याच भीतीने व पृथ्वीच्या काळजीपोटी सूर्याचे डोळे पाणावले आहेत. सूर्याला वाईट वाटत आहे, माझ्यानंतर या विश्वाचे काय होईल? ही चिंता या सूर्याला लागलेली आहे.
Translation in English:
The sun illuminates the entire earth with its intense heat. He works tirelessly from sunrise to sunset. That is, the responsibility of illuminating the entire earth has been taken by the sun. This sun cares for everything on earth. He is anxious as the head of the family.
This sun fears that the earth will be dark when we go down. Due to this fear and concern for the earth, the eyes of the sun have watered. Sun is feeling sad, what will happen to this universe after me? This concern is due to the Sun.
अंधारामध्ये बुडून जाईल
लगेच सारी धरा
कुणी वाचवा या पृथ्वीला
करा करा हो त्वरा
अर्थ : मावळतीला चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागली आहे. आपण अस्ताला गेल्यानंतर लगेचच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते. पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे, तिला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटते. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा, त्वरेने यावे असे सूर्याला वाटते. आपला कोणीतरी उत्तराधिकारी असावा, आपले कार्य कोणीतरी थोड्याफार प्रमाणात उचलावे अशी सूर्याची आंतरिक इच्छा आहे.
Translation in English:
The setting sun is worried about what will happen to this earth after us. The sun seems to plunge the entire earth into darkness soon after it sets. Sun feels that there must be someone to care for the earth, someone to save it. Sun wants someone to take the initiative and come quickly. The inner desire of the sun is to have someone to succeed him, someone to take up his work in a small way.
कुणी न उठती
ये ना पुढती
कुणास ना शाश्वती
इकडे तिकडे बघत हळूचि
पणती ये पुढती
अर्थ : सूर्याच्या प्रचंड तेजाला दुसरा पर्यायच नाही. त्याच्यासारखा तोच ! त्याची जागा कोण चालवील? त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही. या पृथ्वीतलावरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार नाही कारण पृथ्वीवरील अंधार दूर करण्याची कोणाकडेच ताकद नाही.
तेवढ्यात हळू हळू मनाचे धाडस करत, इकडे तिकडे बघत एक पणती पुढे येते. खरे तर पणतीचा केवढा तो प्रकाश. पण ती पुढाकर घेते. अंधारल्या रात्री पृथ्वीवर थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्विकारते. ती तेवढे धाडस दाखवते.
Translation in English:
There is no other alternative to the immense brightness of the sun. He is like him! Who will take his place? No one can do such a huge task like him. No one on this earth can replace the Sun. So no one is willing to come forward because no one has the power to remove the darkness on earth.
At that time, a small earthen lamp comes forward slowly, daring her heart, looking here and there. In fact, it is the light of a lamp. But she takes the initiative. She assumes the responsibility of giving some light to the earth in the dark night. She shows so much courage.
विनम्र भावे लवून म्हणे ती
तेजोमय भास्करा
मम तेजाने जमेल तैसी
उजळून टाकीन घरा
अर्थ : सूर्यापुढे आकाराने अगदीच लहान असणारी पणती सूर्याचे प्रचंड तेज जाणते आहे. त्याचा तेजोमय प्रकाश तिला माहीत आहे. त्याच्यापुढे। आपण क्षुल्लक आहोत हेही तिला माहीत आहे. तरीही ती धाडस करते आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणते, “हे तेजोमय भास्करा, तुझ्याकडे प्रचंड तेज आहे. मी बापडी लहानशी. माझ्याकडेही प्रकाश आहे पण त्याची तुझ्याशी तुलना होऊच शकत नाही. मी माझ्याकडे असणाऱ्या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमेल तेवढी पृथ्वी उजळून टाकू शकते. माझा तेवढाच ‘खारीचा वाटा’. माझ्यामुळे खूप मोठी प्रखरता निर्माण होणार नाही, परंतु अंधाराला छिद्र पाडण्याची ताकत माझ्यात आहे. तुझ्या जाण्याने तयार झालेला अंधार मी थोडाफार तरी भेदू शकते. तुझे पृथ्वी प्रकाशमय करण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना मी करू शकते”, तसे आश्वासन ती सूर्याला देते.
Translation in English:
Earthen lamp, which is very small in size compared to the sun, knows the great brilliance of the sun. She knows its bright light before him. She also knows that we are insignificant. Still she dares and very humbly bows to the sun god and says, “O brilliant Bhaskara, you have great brilliance. I am a small baby. I too have light but it cannot be compared to you. I can illuminate the earth as much as I can with the little light I have.” That’s my share। I may not create great intensity, but I have the power to pierce the darkness. I can see through the darkness created by your departure. At least I can do the work of lighting your earth in a small way”, she assures the sun.
वच हे ऐकुनि त्या तेजाचे
डोळे ओलावले
तृप्त मनाने आणि रवि तो
झुकला अस्ताकडे
अर्थ : दैदिप्यमान असणाऱ्या सूर्यापुढे एवढीशी पणती बोलत होती. तिच्या बोलण्यात तेज होते. धाडस होते. आपण अस्ताला गेल्यानंतर आपले कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना चालू राहील याची शाश्वती सूर्याला मिळाली. छोट्याशा पणतीचे हे धाडस पाहून सूर्याचे डोळे ओलावले, त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारे कोणीतरी आहे, या विचाराने तो तृप्त झाला. पृथ्वीमातेची काळजी घेण्याची जबाबदारी पणतीने उचलली आहे, या मनाला आनंद देणाऱ्या विचारातच सूर्य अस्ताकडे झुकला. सूर्य मावळला पण त्याचे कार्य सुरू राहिले. त्याचे प्रकाश देण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना पण पणती करत राहिली.
Translation in English:
The lamp was talking to him in front of the glorious sun. Her speech was sharp. Be brave. Sun was assured that his work would continue, at least to a small extent, after his sunset. Sun’s eyes became wet seeing this courage of the little lamp, tears of joy came to his eyes. He was satisfied with the thought that there is someone who will take care of this earth after him. The Sun bowed to the sunset with the mind-pleasing thought that the small earthen lamp had taken up the responsibility of taking care of Mother Earth. The sun went down but his work continued. The lamp continued to do the work of giving light to him, albeit to a lesser extent.
आसुसणे – एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा बाळगणे.
अनवाणी – पायात चप्पल न घालता.
निरपेक्ष – अपेक्षारहित.
ऋण असणे – उपकार असणे.
झोकून देणे – पूर्णपणे सहभागी होणे.
कृती
(१) तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर: दररोज नित्यनेमाने सूर्य उगवतो. सर्व जगाला सर्व सृष्टीला, चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. पृथ्वीला तेज बहाल करण्याचे कार्य तो अविरतपणे पार पाडतो. तो जेव्हा मावळायला जातो, तेव्हा त्याच्या मनात एक खंत कायम उद्भवते, की मी गेल्यावर या धरतीची काळजी कोण घेईल? पृथ्वी सारी अंधारात बुडेल, तेव्हा तिला माझ्यासारखे कोण उजळेल. या विचाराने सूर्याचे डोळे पाणावतात. गुरुदेव टागोरांनी या कवितेत सूर्याचे पृथ्वीवर असलेले निर्व्याज प्रेम आर्त शब्दांत व्यक्त केले आहे. या कवितेतून सूर्याची आईच्या प्रेमळपणाची व मायेची भूमिका प्रकट होते.
The sun rises regularly every day. Gives light, energy, vitality to the whole world, to all creatures, to animals. It ceaselessly performs the task of imparting radiance to the earth. When it goes to set, a regret always arises in its mind, “who will take care of this earth when I am gone?” When the whole earth falls into darkness, who will light it like me? Sun’s eyes water with this thought. In this poem, Gurudev Tagore has expressed the unrequited love of the sun for the earth. This poem reveals the role of sun as a mother’s affection and love.
(२) पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तर: ‘जाता अस्ताला’ या गुरुदेव टागोरांच्या बंगाली कवितेत व श्यामला कुलकर्णी यांनी केलेल्या रूपांतरात सूर्य व पणती ही तेजाची दोन प्रतीके मांडली आहेत.
सूर्य दिवसभर पृथ्वीला ऊर्जा देतो, चैतन्य बहाल करतो. परंतु अस्ताला जाताना मनोमन खंतावतो की माझ्या मागे या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? अशा वेळी एक छोटी पणती पुढे येते नि ती सूर्याला म्हणते की मला जमेल तशी या पृथ्वीला मी उजळीत ठेवीन. पणतीच्या या उदाहरणातून असा संदेश मिळतो की सत्कार्य ज्याचे त्याने कुवतीप्रमाणे करीत राहावे. सेवा करण्याचा आपला वाटा उचलावा. मनापासून केलेले कार्य मोठे किंवा छोटे ठरत नाही. अंधारामध्येही प्रकाश देण्याची शक्ती छोट्या पणतीतही असते. तिनेही उजेड देण्याचा वसा अंगिकारला आहे.
In the Bengali poem ‘जाता अस्ताला’ by Gurudev Tagore and adapted by Shyamala Kulkarni, sun and granddaughter are two symbols of brightness.
The sun gives energy to the earth throughout the day, restoring vitality. But while going to the sunset, the mind regrets that who will light this earth after me? At such a time a small earthen oil-lamp comes forward and says to the sun that I will keep this earth as bright as I can. From this example of earthen oil-lamp, we learn that one should keep doing their work to the best of their abilities. Do your part to serve. A work done with heart is not big or small. Even in the dark there is the power of giving light even in a small branch. She has also embraced the power of illumination.
(३) सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा.
उत्तर: सूर्य उगवतो तेव्हा मानवी जग चैतन्याने रसरसते. मानवाचे जीवन फुलते. मनात कार्य करण्याची इच्छा जागृत होते. दिवसभर सूर्यप्रकाशात मानवी मन उजळत राहते. परंतु सूर्यास्त होताच मानवी मन कृतार्थतेने भरून येते. घरी परतण्याची व कुटुंबात रमण्याची ओढ निर्माण होते. पण त्याच बरोबर दिवस मावळतोय याची मंदशी उदासी मनात रेंगाळत राहते. मन काहीसे हळवे होते. कातर होते. प्रियजनांच्या भेटीची हुरहूर मनात दाटून येते. सूर्यास्ताच्या वेळचा तेजोगोल मानवी जगाचा निरोप घेतो नि माणूसही सूर्याला आर्त निरोप देतो. परंतु पुन्हा उद्या सूर्यदर्शन होणार ही आशा मानवीमनात पल्लवीत होतच राहते.
When the sun rises, the human world is alive with vitality. Human life flourishes. The desire to act is awakened in the mind. The human mind shines in the sunlight all day long. But as soon as the sun sets, the human mind is filled with gratitude. There is a desire to return home and enjoy the family. But at the same time, the slow sadness that the day is ending keeps lingering in the mind. The mind was somewhat sensitive. There were scissors. The excitement of meeting loved ones fills the mind. At the time of sunset, the sun bids farewell to the human world, and man also bids farewell to it. But the hope of seeing the sun again tomorrow continues to linger in the human mind.
(४) कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर: सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतिक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून कळवळून साद घालणारा तो व्याकूळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखादयाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करूणा हृदयात निर्माण करावी लागते. सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले, श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतिकातून दिसून येते. त्या उलट, पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटाशा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतिकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पणतीच्या प्रतीकातून जाणवते.
Sun is the creator of the earth, the life cycle on it, the bloomer, the creator of the animals, the symbol of great power. He seems to be a besotted father or creator who is longing for someone to protect the earthly life we have created in his absence. No matter how strong and powerful we are, we have to be humble if we want to plead for someone’s good, welfare. One has to put aside the ego of power and create compassion and kindness in the heart. It is seen from the symbol of Sun that when you start doing something with kindness, something good, credit will surely come to you. On the contrary, the lamp is a small patch of light in front of the sun. But she dares to answer Sun’s plea. Her confidence gives her the courage to speak up. If the desire is strong and one starts the work with a positive attitude, nothing is impossible from the symbol of the lamp. At the same time, to give something to the world even in a small life. The ability to make the world beautiful is also felt through the symbol of the lamp.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
सूर्य : ………………………………..
पणती : ………………………………..
सूर्य : ………………………………..
पणती : ………………………………..
सूर्य : ………………………………..
पणती : ………………………………..
सूर्य : ………………………………..
पणती : ………………………………..
सूर्य : ………………………………..
पणती : ………………………………..
उत्तर:
सूर्य : चला, माझी मावळायची वेळ झाली. पण एक चिंता लागून राहिलेय ती माझ्यानंतर या धरतीला कोण उजळेल ?
पणती : प्रणाम, सूर्य देवा !
सूर्य : कोण गं तू?
पणती : मी पणती आहे.
सूर्य : इथे कशी तू ?
पणती : तुमचं बोलणं ऐकलं नि धावत आले.
सूर्य : काय काम आहे का माझ्याकडे ?
पणती : माझं काहीच काम नाही. उरलेलं तुमचं काम मला करायचं आहे ? करू का?
सूर्य : काय करणार गं तू?
पणती : तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवीन.
सूर्य : खरं की काय? तुझा प्रकाश तो केवढां!
पणती : चिमुकला असला तरी प्रकाशच ना? तुमचाच वसा घेतलाय मी. स्वतः जळत दुसऱ्यांना उजेड देणे हे कर्तव्य मानते मी!
सूर्य : होय रे, बाळा ! आज मी धन्य झालो. माझा आशीर्वाद आहे तुला!
पणती : चरणस्पर्श करते, बाबा तुम्हांला !