पाठ ५ – दोन दिवस
Human life is very short, as if it were only four days. Two out of four days passed in anticipation of happiness and prosperity. Those days lapsed in waiting for good days, and the remaining two days painfully passed in worrying for livelihood. The life span seems to have come to an end, but hardship has no end. Now when I open the account book of my life, I calculate how many hot summers remain yet—that is, how much more suffering I have to put up with. There may have been hundreds of moon-lit nights, and there may have been many captivating nights with stars blooming in the sky, but that joy was short-lived. All of the rest passed in search of the moon and the round millet bread to satiate their hunger. The entire life was ruined by struggling to make both ends meet. in fighting poverty and in worrying about tomorrow.
I toiled with my two hands. They are my sole possession, my asset, and the world to me. But I pawned them into poverty. My potency faced consummation in pauperism and paucity. At times I raised my hands to embrace the sky with pride, and occasionally my hands made me proud of their achievement.
I kept sketching dreams of affluence in my mind. but my hands were handicapped by poverty. My hands remained empty, my dreams were shattered, and when the toiling became unbearable, my eyes were filled with tears, which I did not wipe out. Yet some moments were such that tears became my companions. They rushed to soothe me. When I was lonely, I relieved my mind by weeping profusely.
Still, I did not think of myself alone. I did not become selfish. I cared for others and for society as well. I shared their happiness and sorrow. I became absorbed in the world around me. Right here, in the school of experience I learned to bear sorrow, to sustain it, and to suffer pain. Just as steel is heated in a furnace, so I baked my life. I emerged tougher after facing the tests and trials of life. That’s how I led my short life of four days: two days spent in expectancy of happiness and the remaining two in enduring sorrow.
बरबाद होणे – वाया जाणे.
हरघडी – प्रत्येक वेळी.
शेकणे – तापणे.
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
अर्थ : कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवासच अत्यंत संघर्षमय व खडतर होता. आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत म्हणून कवी म्हणतात माझ्या जीवनाचे दोन दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस आहे त्या दुःखात व्यतीत झाले. माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहेत याचाच मी हिशोब करतो आहे.
Translation in English:
The overall life journey of poet Narayan Surve was very difficult and difficult. The poet says that as each day comes he lives on the hope of tomorrow Two days of my life have been spent waiting for a better day to come and two days have been spent in the sorrow that is. I am counting how many days are left of my life.
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
अर्थ : जीवन जगत असताना अवती-भोवती अशा अनेक गोष्टी होत्या की त्या हव्या हव्याशा वाटत होत्या. पण जीवनाचे वास्तव इतके दाहक होते की त्या कधीच मिळू शकत नव्हत्या. त्यांच्या भुकेच्या तीव्र भावनेत आकाशाचा सुंदर चंद्र देखील त्यांना भाकरीसारखा दिसतो. म्हणूनच कवी म्हणतो की, मी चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद तर कधी घेऊ शकलो नाही; पण माझ्या पोटासाठी भाकरीचा चंद्र मिळवण्यातच माझे सगळे आयुष्य बरबाद (नष्ट) झाले.
Translation in English:
While living life, there were many things around that seemed to be wanting. But the reality of life was so inflammatory that they could never be obtained. In their intense sense of hunger, even the beautiful moon in the sky appears to them as bread. That is why the poet says, I could never taste the beauty of the moon; But all my life was wasted (wasted) in getting the moon of bread for my stomach.
हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
अर्थ : कवी म्हणतात, माझे हात माझे सर्वस्व आहेत. या हातांच्या साहाय्याने मी अनेक नवीन चांगल्या गोष्टी करू शकलो असतो; पण मी नेहमी या गरिबीतच अडकून राहिलो. रोजचे जीवन जगण्यासाठीच मी माझ्या हाताचा उपयोग केला. पण कधी-कधी दारिद्र्यात गुंतलेले हात मी मनात उंचावलेले पाहिले. म्हणजे नवीन काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली; पण जसे सभोवतालची परिस्थिती किंवा वास्तवाची जाणीव झाली की, असे वाटायचे की माझे हात जणू कोणीतरी छाटून टाकले आहेत. माझ्या सगळ्या आशा, उमेदी संपून जातात.
Translation in English:
The poet says, my hands are my everything. With these hands I could have done many new good things; But I was always stuck in this poverty. I used my hands only to live my daily life. But sometimes I saw hands raised in poverty. That is, the desire to do something new arose in my mind; But as soon as I became aware of the surroundings or the reality, it felt as if my hands had been cut off by someone. All my hopes and hopes disappear.
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
अर्थ : कवी नारायण सुर्वे यांना आपल्या जीवनात सतत हालअपेष्टा, अपमान, उपेक्षा यांचा सामना करावा लागला. परिस्थितीशी सतत संघर्ष करावा लागला. अशा या जीवनसंघर्षातून जात असताना कधी कधी त्यांना खूप रडावेसे वाटले पण त्यांनी आपले मन घट्ट केले. डोळयांतून अश्रू वाहू दिले नाही; पण कधी कधी असेही प्रसंग आले की, मनात दडवलेले दुःख, वेदना यांना मोकळी वाट करून देण्यासाठी अश्रूच मित्रासारखे मदतीला धावून आले. म्हणजेच काही प्रसंगी आपल्या मनातले दुःख इतरांपाशी व्यक्त न करता ते फक्त मनसोक्त रडले. रडल्यामुळे त्यांचे दुःख हलके झाले. त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्याच अश्रूंनी एखादया मित्राप्रमाणे साथ दिली.
Translation in English:
Poet Narayan Surve had to face constant harassment, humiliation and neglect in his life. Had to constantly struggle with the situation. While going through this life struggle, sometimes he felt like crying but he kept his heart strong. Tears were not allowed to flow from the eyes; but sometimes there were occasions when tears came to help like a friend to release the sorrow and pain. That is, on some occasions, without expressing their grief to others, they just cried. Crying eased their grief. His own tears supported him like a friend in his grief.
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
अर्थ : कवी नारायण सुर्वे जिथे राहत होते तिथे त्यांच्या आजुबाजूला सगळी गोरगरिबांचीच वस्ती होती. सगळ्यांचे जीवन हालअपेष्टांनी भरलेले होते. कवी नारायण सुर्वे यांना आजुबाजूच्या समाजबांधवांचे दुःख पाहवत नव्हते. स्वत: दु:खी कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्या दुःखाचा विचार केला. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला. मान-अपमान, बरे-वाईट, सुख-दुःख सगळं सगळं पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झाले. जगातल्या अनेक बऱ्या-वाईट घटनांशी ते समरूप झाले. जगाच्या या शाळेत दुःख कसे सहन करावे, दुःखावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने जीवनाला कसे सामोरे जावे. हसत हसत कसे जगावे ते याच जगाच्या शाळेने त्यांना शिकवले. म्हणजेच या जगानेच त्यांना दु:खही दिले आणि या जगानेच दुःख विसरून आनंदाने कसे जगावे हे देखील शिकवले.
Translation in English:
Where poet Narayan Surve lived, there were poor people all around him. Everyone’s life was full of misfortunes. Poet Narayan Surve could not see the suffering of the community members around him. Although he himself was suffering and suffering, he always thought of the suffering of others. At every moment he thought of the world. After digesting honour and humiliation, good and bad, happiness and sorrow, he became one with the whole world. It became synonymous with many good and bad events in the world. How to bear suffering in this school of the world, how to overcome suffering and face life with new hope. The school of this world taught him how to live with a smile. That is, this world also gave them sorrow and this world also taught them how to forget sorrow and live happily.
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.
अर्थ : कवी परळच्या चाळीत वाढले. कमालीचे दारिद्र्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. म्हणून, कवी म्हणतो एखादया भट्टीत पोलाद जसे तापून निघते त्या प्रमाणे दुनियेच्या दाहक अनुभवातून माझे आयुष्यदेखील दुःख झेलून जगण्यास सिद्ध व समर्थ झाले आहे. माझे दोन दिवस जगण्याच्या नव्या उमेदीची वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस आहे त्या दुःखात गेले, जणू दुःख दुःखात विरून गेले.
Translation in English:
The poet grew up in a chawl in Parel. His life was marked by extreme poverty, extreme poverty and struggle for survival. So, says the poet, as steel heats up in a furnace, my life has been proven and capable of enduring suffering through the fiery experiences of the world. My two days were spent waiting for a new hope of life, and two days were spent in sorrow, as if sorrow had dissolved into sorrow.
कृती
(१) कृती पूर्ण करा.
(अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तर: भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
(आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
उत्तर: दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो.
(२) एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट
उत्तर: हात
(आ) कवीचा जवळचा मित्र
उत्तर: अश्रू
(३) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(अ) माना उंचावलेले हात
उत्तर: म्हणजे कर्तृत्व करणारे हात होय. ते जरी दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले, तरी कधी कधी अभिमानाने मान उंच व्हावी, असे कामही याच हातांनी केले.
It means the hands that do the work. Even though they were mortgaged to poverty, they also worked with these hands to make them proud at times.
(आ) कलम केलेले हात
उत्तर: या हातांनी कष्ट उपसले. कधी ते दारिद्र्यात राहिले, कधी ते अभिमानाने उंचावले. तर कधी परिस्थितीमुळे अशी वेळ आली की ते जायबंदीही झाले. कलम झालेले म्हणजे बळजबरीने बांधलेले हात होय.
These hands are laboured. Sometimes they lived in poverty, sometimes they rose with pride. And sometimes due to the circumstances, there was such a time that they were banned. Grafted means hands tied by force.
(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात
उत्तर: कामगारांच्या कष्टमय जीवनाचा आलेख शब्दांत रेखाटताना कवी म्हणतात की, कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. हातांनी ते कष्ट उपसतात व कसेबसे पोट भरतात. पण तेवढ्याने पोट पूर्ण भरत नाही; कारण दैन्यदारिद्र्यात ते खितपत पडलेले असतात. त्यांना उदयाच्या पोटापाण्याची काळजी असते. हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात- जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडे गहाण पडलेले असतात. तारण म्हणून ठेवलेले असतात.
While drawing the graph of the laborious life of the workers in words, the poet says that the hands of the labourers are their everything. They work hard with their hands and somehow fill their stomachs. But that does not fill the stomach completely Because they are mired in poverty. They care about Udaya’s sustenance. Expressing this grief, the poet says, – as if the hands of the workers are mortgaged to poverty, they are kept as collateral.
(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’
उत्तर:
आशयसौंदर्य : ‘दोन दिवस’ या कवितेतून कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या वास्तव जीवनाचे व त्यांच्या मनोव्यथेचे चित्रण केले आहे. कामगारांचे आयुष्य दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले, तरी प्राप्त परिस्थितीत ठामपणे लढत राहण्याची जिद्द या कवितेत सुर्वे यांनी यथार्थपणे मांडली आहे.
काव्यसौंदर्य : प्रस्तुत ओळीमध्ये माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सांगताना कवी म्हणतात-कामगारांचे जीवन खरे तर चार दिवसांचे आहे. त्यांतील दोन दिवस सुख-समृद्धीची वाट पाहण्यात गेले, तर उरलेले दोन दिवस पोटापाण्याची चिंता करताना दुःखात गेले.. खडतर आयुष्य जगताना आयुष्य व उमेद संपत आली. वयाचा जमाखर्च मांडतो आहे. आता किती उन्हाळे, किती जगायचे ऋतू उरलेत याचा हिशोब करतो आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओळींतील विधानात्मक रचनेमुळे दुःखाचा आवेग वाचकांना थेट भिडतो. सहज, सोप्या शब्दांत वास्तवाची दाहकता प्रत्ययकारीरीत्या मांडली आहे. ‘किती उन्हाळे’ या शब्दांतून उन्हाने रापलेल्या खडतर आयुष्याचा प्रत्यय येतो. कामगारांच्या जीवनातील भयाण वास्तवाचे चटके जाणवतात.
आशयसौंदर्य :
Poet Narayan Surve has depicted the real life of workers and their mental anguish in the poem ‘दोन दिवस’. Although the lives of the workers are mortgaged to poverty, Surve has realistically presented the determination of the workers to continue fighting under the prevailing circumstances.
काव्यसौंदर्य :
In the present line, while describing the transience of human life, the poet says- The life of a laborer is actually four days. Two of those days were spent waiting for happiness and prosperity, while the remaining two days were spent worrying about food and water. While living a hard life, life and hope ended. The cost of age is presented. Now I am counting how many summers, how many seasons to live.
भाषिक वैशिष्ट्ये :
The narrative structure in the above lines directly confronts the reader with the impulse of grief. In easy, simple words, the reality is convincingly presented. The words ‘किती उन्हाळे’ imply a hard life scorched by the sun. The harsh realities of workers’ lives are felt.
(आ) ‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन ‘दोन दिवस’ या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दुःखावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जीवनचे खरे सत्य आहे.
Poet Narayan Surve’s life struggle has been described in this poem ‘दोन दिवस’. The poet says that one should face the sorrows of life without fear or hesitation. Because suffering teaches a person a lot. While overcoming suffering, the power to overcome suffering is created in a person through many aspects such as overcoming the situation, making adjustments, finding new options, by realizing many abilities in us. So says the poet. Don’t be discouraged by the sorrows of life, face the adverse situation with strength and stand strong again in life. This is the real truth of life.
(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
उत्तर: ‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात. जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.
From Narayan Surve’s poem ‘दोन दिवस’, the life portrait of many hardworking people working in various service sectors stands in front. In many places, we see laborers doing many kinds of hard and very laborious work. They are always working hard with everything like sun, wind and rain. Necessary things of life are not provided to them. Life is not guaranteed. They work very hard for very low wages. They find life very difficult. There is no guarantee of getting work everyday. Thus the life of labourers in our country is very difficult.
(ई) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं.
Happiness and sadness are always two things in human life. Sometimes there are happy days, sometimes sad. However, no time lasts forever. Man learns many things from suffering and lives on hoping for a better day of dawn. A man should remain optimistic like a poet. One should have hope that happiness will come even in suffering, so that life becomes easier.