Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ - मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)

कृती

(१) टिपा लिहा.

(अ) बार्क.
उत्तर: बार्क म्हणजे B.A.R.C. म्हणजेच ‘भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर’ चे लघुरूप (शॉर्ट फॉर्म) आहे. बार्कला मराठीत ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे म्हणतात. डॉ. होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे जनक (पायोनियर) होत. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. ‘बार्क’ ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे. ही संस्था अणुऊर्जे-संबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजपर्यंत निष्ठेने करीत आहे.

BARC stands for B.A.R.C. That is the short form of ‘Bhabha Atomic Research Centre’. BARC is called ‘Bhabha Nuclear Research Center’ in Marathi. Dr. Homi Bhabha was a great nuclear scientist of India. He laid the foundation of nuclear research in India. Homi Bhabha was the pioneer of nuclear research in India. Hence his name is given to the Nuclear Research Centre. The organization ‘BARC’ is very big and famous. This institute is faithfully carrying out important work of nuclear energy-related research till date.

(आ) डॉ. होमी भाभा.
उत्तर: डॉ. होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. B.A.R.C. म्हणजे भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर ! त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे – लेखक ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना, तिथे होमी भाभा तीन-चार वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की, आम्हा सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक (पॉझिटिव्ह) दृष्टिकोन दिसून येतो.

Dr. Homi Bhabha was a world renowned nuclear scientist from India. He laid the foundation of nuclear research in India. Hence his name is given to the Nuclear Research Centre. B.A.R.C. That means Bhabha Atomic Research Center! His personality inspired the young new generation of scientists. There is a memory told by the author about him – when the author was studying at the training school, Homi Bhabha used to come there three or four times. The children asked him, is there enough work for all of us? Then Bhabha said don’t worry. All of you do your research. You create the work yourself. You decide what to do. The tendency to work as much as the boss says is wrong. Homi Bhabha’s positive attitude towards research can be seen from this statement.

(२) ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

उत्तर: डॉ. होमी भाभा यांच्या मते, स्वत:च काम निर्माण करणे व काय काम करावे, हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे, ही चुकीची वृत्ती आहे. चिंता करीत न बसता, कामात गढून गेले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती सुरुवातीला ठीक आहे. परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, स्फूर्ती मिळवणे व कार्यात प्रवीण होणे हे ध्येय असावे. यालाच ‘स्काय इज द लिमिट’ असे म्हटले आहे.

Dr. According to Homi Bhabha, everyone should think positively about creating their own work and deciding what to do. Doing as much work as the boss says is a wrong attitude. Instead of worrying, getting absorbed in work creates a situation where the sky is the limit. It’s okay to have someone hold the boat and lead the way. But ultimately the goal should be to find one’s own way, to gain inspiration and to master the task. This is called ‘sky is the limit’.

(३) मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

उत्तर: बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आले. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामग्री असली, तरी कोणी वापरत नाही. इंजिनियरला वेल्डर व फोरमन लागतात. परंतु आता काहीच मदत मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात येते. त्यामुळे कुणाचीही मदत न घेता इंजिनियरला आधी सर्व कामे करायला लागतात. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली, तर मग त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील आणि ते आनंदाने काम करतील. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे योग्य नाही. प्रथम आपण काम करायचे मग इतरांना सांगायचे, हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाही.

When the author joined BARC as an engineer, he was asked to work on the metallizing process. From that incident we know the reasons for not working on the metallizing process. Even though all the machinery is there, no one uses it. An engineer needs a welder and a foreman. But now they are told that there will be no help. So the engineer has to do all the work first without taking help from anyone. If all the work falls to the engineer himself, then he will have other men under him and they will work happily. It is not right to ask someone else to do the work when you are not available. First we would work then tell others, because this is not happening, the metallizing process is not working.

(४) ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

उत्तर: समर्थ रामदासांचे असे सुवचन आहे की ‘आधी केले मग सांगितले!’ यातून फार मोठा मोलाचा संदेश संत रामदासांनी दिला आहे. आपल्याला एक वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामे दुसऱ्यांनी करावीत. आपल्या आळशी प्रवृत्तीतून ‘देरे हरी । खाटल्यावरी’ अशी भावना तयार होणे गैर आहे. आपण परावलंबी न होता, स्वत:ची कामे स्वतः करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. आपण स्वतः आपली कामे करण्यात कुशल असलो, की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांसाठी आदर्श (आयडॉल) होतो. यालाच ‘आधी केले, मग सांगितले’ असे म्हणतात.

Samarth Ramdas has a saying that ‘first done then said!’ Sant Ramdas has given a very valuable message from this. We have a bad habit of wanting others to do our work. From our lazy tendency ‘Dere Hari. It is wrong to form such a feeling ‘on bed’. We should have the determination to do our own work without being dependent. If we ourselves are good at our work, we can show our example to others. When we do our work by being self-reliant, others also feel confident. Then we become an idol for others. This is called ‘first done, then told’.

(५) ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

उत्तर: दिवाळीत रंगीत कागदी कंदिलांची शोभा मला खूप आवडते. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची. या वर्षी मी ठरवले की, आपण स्वतः कागदी कंदील तयार करायचा. बघूया जमते की नाही ते? मी स्वतः स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत जिलेटिन, कागद व काड्या आणल्या. धाग्याचे बंडल आणले नि दिवाळीच्या आदल्या सकाळी कंदील करायला घेतला. चौकोनात काड्या जोडायला घेतल्या; पण काही मनासारखे जमेना. मी पुन्हा विस्कटायचो, पुन्हा जोडायचो. नीट जमत नव्हते. दुपार झाली पण निश्चय केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचे नाही. हळूहळू मला ते जमायला लागले. पूर्ण कंदिलाचा काड्यांचा सांगाडा तयार झाला. मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिकटवणे सोपे गेले. अखेर खूप मेहनतीनंतर सुंदर कंदील तयार झाला. तेव्हा मला कळले की, ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’.

I love the beauty of colorful paper lanterns during Diwali. Mother used to buy small lanterns from the market. This year I decided that we would make our own paper lanterns. Let’s see if it fits or not? I myself brought colored gelatin, paper and sticks from the stationery store. He brought a bundle of thread and took it to make Kandil in the morning before Diwali. To join the sticks in the square; But nothing like it. I used to disassemble, reassemble. It didn’t fit well. It was noon but decided not to eat until the kandil was done. Gradually I started to get it. The stick skeleton of the complete lantern was formed. Then it was easy to stick different colored paper on it by stretching it. Finally, after a lot of hard work, a beautiful lantern was created. That’s when I realized, ‘Learning from direct experiences is more effective’.

उपक्रम :

आंतरजालाच्या साहाय्याने कोणत्याही दोन भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.

अपठित गद्य आकलन

उतारा वाचून त्यावरील कृती करा.

(अ) वैशिष्ट्ये लिहा.

IMG 20230706 153701 पाठ – मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)

उत्तर:

IMG 20230706 155104 पाठ – मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)

विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. 

(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.

घटना/कृती

(१) झाडाची मुळे खोल जाणे. 

(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. 

परिणाम

(१) ……………..

(२) ……………..

उत्तर:

घटना/कृती

(१) झाडाची मुळे खोल जाणे. 

(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. 

परिणाम

(१) झाडाचा पाया भक्कम होणे.

(२) व्यक्तिमत्त्व प्रभावी होणे.

(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(१) विजेसारखे चमकणे –
उत्तर: एकदा लख चमकून विझून जाणे, अल्पकाळाचे यश मिळणे.

 

(२) सूर्यासारखे प्रकाशणे –
उत्तर: कायम तळपत राहणे, दीर्घकालीन यश मिळणे.

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल. 

उत्तर: 

संपूर्ण – विशेषण

राष्ट्र – नाम

तुमच्या – सर्वनाम 

प्रकाशाने – नाम

व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.

उत्तर: विद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व प्रभावी करते. व्यक्तीला मान-सन्मान प्राप्त होतो. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. स्वप्नवत असलेल्या इच्छांची परिपूर्ती होते. असा व्यक्ती सूर्यासारखा सतत प्रकाशित राहतो. संपूर्ण राष्ट्र अशा व्यक्तीच्या प्रकाशात दिपून जाते.

Education influences a person’s personality. A person gets dignity. The feeling of being respected goes away from the mind, everyone is eager to be in your company, to show you hospitality. Dreams come true. Such a person shines continuously like the sun. The whole nation shines in the light of such a person.