Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ १३ – हिरवंगार झाडासारखं

This poem is written by George Lopis. In it, he speaks at length about the traits of a tree: its patience, generosity, cooperation, and resoluteness in difficult situations. Always be happy and evergreen, like a tree. This is the message in this poem.

मौन व्रत – न बोलण्याचा नियम. 

मुकाट – शांत. 

कवेत घेणे – मिठीत घेणे.

झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत

धारण करून तपश्चर्या करत…

 

अर्थ : आनंदी जीवन जगण्यासाठी आपण झाडाचा आदर्श घ्यावा, असे कवी ‘जॉर्ज लोपीस’ आपल्याला पटवून देत आहेत. ते म्हणतात की, झाड अचल असते. ते एका ठिकाणी काहीही न बोलता अढळ उभे असते. ऋषीमुनी जसे तपश्चर्येला ध्यान लावून बसतात. त्याचप्रमाणे झाड देखील मौन व्रतात उभे असते. बाह्य गोष्टींच्या सर्व परिणामांना ते बिनतक्रार सहन करत असते. पक्षी येतात जातात, झाडांच्या मुळांवरही कधी कधी घाव बसतात. पानझड होते तरी झाड स्थिर व सहनशील असते. कठीण प्रसंगातही पाय घट्ट रोवून ध्यानस्थ ऋषिसारखे शांत असते. आपणही तोच मार्ग अनुसरला पाहिजे.

 

English Translation:

Poet ‘George Lopes’ is convincing us that we should take the example of a tree to lead a happy life. They say that the tree is immovable. It stands still in one place without saying anything. As sages meditate on penance. Similarly, the tree also stands in silence. It tolerates all the effects of external things uncomplainingly. Birds come and go, even the roots of trees are sometimes injured. Even if the leaves fall, the tree is stable and patient. Even in difficult situations, the meditator remains calm like a sage with his feet firmly planted. We should follow the same path.

 

 

पक्षी झाडांचे कुणीच नसतात

तरीही झाड त्यांचं असतं

 

अर्थ : पक्षी झाडांवर सतत येत असतात. घरटे बांधून राहतात. काम झाले की, फळे चाखून, खाऊन पुन्हा दुसरीकडे उडून जातात. झाड त्यांना निवारा देते, अन्न देते. ऊन-पावसापासून रक्षण करते; पण जेव्हा झाडावर घाव घातले जातात, ते कापले जाते तेव्हां पक्षी स्वत:चाच विचार करून झाडावरून उडून जातात. परंतु, झाड मात्र हिरवेगार असताना येणाऱ्या पक्ष्यांना कधीही अडवत नाही, आश्रय नाकारत नाही. म्हणूनच पक्षी झाडांचे कुणीही नसून झाड त्यांचे असते, असे कवी म्हणतात.

 

English Translation:

Birds are constantly visiting the trees. They build nests. After the work is done, the fruits taste, eat and fly away again. The tree gives them shelter, food. Protects from sun and rain; But when a tree is wounded, it is cut down, the birds think of themselves and fly away from the tree. But, the tree never blocks the birds coming when it is green, it never denies shelter. That is why the poet says that the birds are not part of the trees but the trees are theirs.

 

 

मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते

झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब

 

अर्थ : झाडाचे कुणीच नसते, पण झाड मात्र सर्वांचे असते. झाड छाया देते, निवारा देते, फळे-फुले सर्व काही इतरांना देते. परोपकार हा त्याचा गुणधर्मच आहे. निर्दयी मानव जेव्हा आपल्या फायद्यासाठी या झाडाच्या मुळावर घाव घालतो तेव्हा देखील झाड बिनतक्रार ते सहन करते. झाडांची कत्तल होत असताना झाडाच्या पानांवरील दवबिंदू घरंगळत जणू वहीतील शब्दांमध्ये डोकावतात व आपली करुण कहाणी शब्दांकीत करतात याचाच अर्थ असा की, झाडांपासून कागद, वह्या बनविल्या जातात आणि मग अशा वहीच्या पानावर कोणीतरी कवी, लेखक झाडाचे दुःख नेमक्या शब्दांत लिहून काढतो. जणू झाडाच्या शरीरावर बसलेल्या घावाचे रूपांतर दवांच्या टपोऱ्या थेंबात होते असे कवीला वाटते. कवीने झाडाचा सहनशील हा गुण येथे दर्शविला आहे.

 

English Translation:

No one belongs to a tree, but a tree belongs to everyone. A tree gives shade, shelter, fruits and flowers to others. Benevolence is his characteristic. Even when ruthless humans injure the roots of this tree for their own benefit, the tree bears it uncomplainingly. While the trees are being slaughtered, the dew points on the leaves of the tree rustle as if peering into the words of the notebook and put their compassionate stories into words. The poet feels that the wound on the tree’s body is transformed into drops of medicine. Here the poet has shown the tolerant quality of the tree.

 

 

झाडाकडे टक लावून पाहिलं तर

शरीरभर विरघळतो हिरवा रंग

रक्त होते क्षणभर हिरवेगार

आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत

 

अर्थ : या झाडाच्या मुळावर घाव घालतो तेव्हा देखील झाड बिनतक्रार ते सहन करते. झाडांची कत्तल होत असताना झाडाच्या पानांवरील दवबिंदू घरंगळत जणू वहीतील शब्दांमध्ये डोकावतात व आपली करुण कहाणी शब्दांकीत करतात याचाच अर्थ असा की, झाडांपासून कागद, वह्या बनविल्या जातात आणि मग अशा वहीच्या पानावर कोणीतरी कवी, लेखक झाडाचे दुःख नेमक्या शब्दांत लिहून काढतो. जणू झाडाच्या शरीरावर बसलेल्या घावाचे रूपांतर दवांच्या टपोऱ्या थेंबात होते असे कवीला वाटते. कवीने झाडाचा सहनशील हा गुण येथे दर्शविला आहे.

 

English Translation:

Even when the root of this tree is injured, the tree tolerates it without complaint. While the trees are being slaughtered, the dew points on the leaves of the tree rustle as if peering into the words of the notebook and put their compassionate stories into words. The poet feels that the wound on the tree’s body is transformed into drops of medicine. Here the poet has shown the tolerant quality of the tree.

 

 

झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी

 

अर्थ : झाडाची सहकार्याची वृत्ती विलक्षण असते. परोपकाराची भावना त्यांच्या मनात सतत जागी असते. आपल्या सर्वदूर पसरलेल्या फांदयांमुळे झाड कडक उन्हात वाटसरूंना सावली देते त्यांचा थकवा दूर करत. जणू आपले बाहू पसरवून हे झाड मुसाफिरांना म्हणजे वाटसरूंना आपल्या कवेत घेते, असे वाटते.

 

English Translation:

The cooperative attitude of the tree is extraordinary. The spirit of philanthropy is always present in their minds. With its spreading branches, the tree provides shade to passers-by in the scorching sun, relieving their fatigue. It seems as if this tree spreads its arms and takes the passers-by into its fold.

 

 

पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं

नव्या नवरीसारखं

झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी

अन झटकली जाते मरगळ

 

अर्थ : ऋतूनुसार झाडाच्या अवस्था बदलत जातात. पानझडीत म्हणजेच थंडीत, शिशिर ऋतूत झाडाची सगळी पाने गळून जातात. झाड पूर्ण रिकामे होते. तेव्हा ते एकटे असते तरी ते पुन्हा बहरते. वसंत ऋतूत झाडाला पुन्हा पालवी फुटते. कोवळी हिरवीगार पाने संपूर्ण झाडावर डोलायला लागतात. नव्या नवरीसारखे सजून झाड पुन्हा तजेलदार दिसू लागते. झाडाची ही प्रफुल्लिता पाहून, आपले मन शरीराचा सारा थकवा तसेच आलेली मरगळ झटकून टाकते. जणू आपल्या मनालाच नव्हे तर संपूर्ण शरीराला उत्साहाची पालवी फुटल्यासारखे वाटते.

 

English Translation:

Depending on the season, the stage of the tree changes. In defoliation, i.e. in winter, all the leaves of the tree fall off. The tree was completely empty. Even though it is alone then, it blooms again. In the spring, the tree blooms again. Young green leaves begin to sway all over the plant. Dressed up like a new bride, the tree starts looking bright again. Seeing this blossoming of the tree, our mind shakes off all the tiredness and fatigue of the body. It is as if not only your mind, but your whole body is bursting with enthusiasm.

 

 

पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं

एक संथ गाणे दडलेले असते

 

अर्थ : कोणतेही झाड असो ते आपल्याच मस्तीत, धुंदीत जगत असते. बाहेरची परिस्थिती कशीही असो ते कधी तक्रार करत नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना हसतमुखाने करत ते मौजेने जगत असते. त्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येक प्राणी-पक्ष्यांना ते आनंदच देत असते. झाडावर बसणारे पक्षी आनंदाने झोके घेत मंजुळ गाणी गात असतात, किलबिलाट करत असतात. जणू त्या गाण्याचा आनंद घेत घेत हे झाड आपले जीवन मजेने, उत्साहाने जगत असते.

 

English Translation:

Any tree is living in its own fun and mist. No matter what the external conditions are, it never complains. They face cold, heat, wind and rain with a smile and live happily. It gives happiness to every animal and bird that comes under its shelter. The birds perched on the tree are happily swinging and singing sweet songs, chirping. As if enjoying that song, this tree lives its life with fun and enthusiasm.

 

 

हसावं कसं सळसळत्या पानासारखं

मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत

जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं

रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं!

 

अर्थ : माणसाने झाडाकडून जगण्याच्या कला शिकून घेतल्या पाहिजेत, असे कवी म्हणतात. कोणतेही झाड असो ते वाऱ्याच्या झुळुकीबरोबर पानांच्या सळसळीने हसते. पक्ष्यांच्या मंजुळ गाण्याबरोबर जीवनाचे गाणे गाते. त्याचप्रमाणे आपणही सळसळत्या पानासारखं हसलं पाहिजे. झाड कोणत्याही परिस्थितीत घट्ट पाय रोवून उभे असते. त्याचप्रमाणे आपणही घट्ट पाय रोवून खंबीरपणे जीवनात मुरलं पाहिजे. तसेच येणाऱ्या संकटांचा खंबीरपणे सामना केला पाहिजे.

 

English Translation:

The poet says that man should learn the art of living from the tree. Any tree laughs with the rustling of its leaves in the breeze. Sings the song of life with the sweet song of the birds. Similarly, we should smile like a leaf. The tree stands firm in any situation. Similarly, we should also walk firmly in life with firm feet. Also, the coming crises should be faced firmly.

कृती

(१) चौकटी पूर्ण करा.

(अ) कवीने झाडाला दिलेली उपमा – 

उत्तर: ध्यानस्थ ऋषी

 

(आ) पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे –

उत्तर: नवी नवरी

 

(इ) कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे –

उत्तर: फुलासारखं टवटवीत

 

(ई) अलगद उतरणारे थेंब –

उत्तर: दव

 

(उ) फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ – 

उत्तर: नवउत्साह

(२) आकृती पूर्ण करा.

IMG 20231029 160923 पाठ १३ – हिरवंगार झाडासारखं

उत्तर:

IMG 20231029 160913 पाठ १३ – हिरवंगार झाडासारखं

(३) एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?

उत्तर: झाडाच्या जीवनाचे गाणे पक्ष्यांच्या मंजुळ नादात दडले आहे.

 

(आ) झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते?

उत्तर: ते घाव झाड मुकाट्याने सहन करते.

(४) ‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: झाड नवीन वस्त्र केव्हां धारण करते?

(५) खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(अ) हसावं कसं सळसळत्या पानासारखं. 

उत्तर: झाडांच्या पानांची हवेने होणारी सळसळ विलक्षण असते. सर्व दुःखे बाजूला ठेवून पानांच्या सळसळीसारखे हसले पाहिजे अशी कवीची भावना आहे. सळसळणारी पाने एकत्र असतात. त्याचप्रमाणे इतरांनाही हसण्यात सामील करून घेता आले पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे गुण अंगी बाणवावेत असा कवीने सुंदर संदेश दिला आहे. सळसळणारी पाने हवेमुळे, पक्ष्यांच्या मंजुळ गाण्यामुळे उत्साही असतात. असेच उत्साहाने, आनंदाने जीवनात हसत रहावे, प्रफुल्लित रहावे अशी कवीची भावना आहे.

The movement of leaves in the wind is amazing. The poet feels that one should leave all sorrows aside and smile like the rustle of leaves. The shriveled leaves are grouped together. Likewise, others should be able to join in the laughter. The poet has given a beautiful message that these qualities should be adopted to live a happy life. The rustling leaves are enlivened by the wind, the sweet song of the birds. The poet’s feeling is to smile and be cheerful in life with such enthusiasm and happiness.

(आ) जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.

उत्तर: ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत कवी जॉर्ज लोपीस यांनी मानवाचे जीवन झाडाशी किती सुसंगत आहे याचे उत्तम दर्शन घडवले आहे. झाडाचे अनेक गुण जीवनात आचरण्यासारखे आहेत, हा उपयुक्त संदेश त्यांनी कवितेतून दिला आहे. जीवनात ‘मौन’ अनेकवेळा उपयुक्त असते. झाडही ऋषीसारखे मौन धरून तपश्चर्या करीत असते. ‘मौन’ धरून तपश्चर्या करणे हा झाडाचा गुण उपयुक्त ठरतो. झाड पक्ष्यांना आसरा देते, पण त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवीत नाही. मानवाने विना अपेक्षेने दुसऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. झाडासारखे दातृत्व अंगी बाणले पाहिजे. झाड कितीही संकटे, वादळे आली तरी घट्ट पाय रोवून उभे असते. माणसानेही कठीण प्रसंगी न घाबरता घट्टपणे उभे राहून संकटांशी सामना केला पाहिजे. झाडाचा हिरवेगारपणा, प्रपुल्लितपणा, ताजेपणा बघून आयुष्यात प्रफुल्लित राहिले पाहिजे. नकारात्मकतेची मरगळ झटकून हिरवेगार झाडासारखे ताजेतवाने जगावे असे कवी म्हणतो. मुळावर घाव घातला तरी झाडाची सहनशीलता ढळत नाही. सहनशीलता हा गुण झाडाकडून घ्यावा. हिरव्यागार झाडासारखे अनेक गुणांना आत्मसात करून जगावे असा संदेश कवी देत आहे.

In the poem ‘हिरवंगार झाडासारखं’, poet George Lopes has given a great vision of how human life is in harmony with the tree. He has given this useful message through the poem that there are many qualities of a tree to be followed in life. ‘Silence’ is often helpful in life. A tree also does penance like a sage keeping silence. The virtue of the tree is helpful in doing penance by keeping ‘silence’. The tree shelters the birds, but does not expect anything from them. Human beings should cooperate with others without expectation. Charity should be cultivated like a tree. No matter how many troubles and storms a tree faces, it stands firm. A man should also stand firm and face adversity without fear in difficult times. One should be cheerful in life by seeing the greenness, fertility, freshness of the tree. The poet says to shake off negativity and live refreshed like a green tree. Even if the root is injured, the tolerance of the tree does not decrease. Endurance is a trait to be learned from the tree. The poet is giving the message that one should live by imbibing many qualities like a green tree.

(६) काव्यसौंदर्य. 

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’

उत्तर: झाडाचे कुणीच नसते, पण झाड मात्र सर्वांचे असते. झाड छाया देते, निवारा देते, फळे-फुले सर्व काही इतरांना देते. परोपकार हा त्याचा गुणधर्मच आहे. निर्दयी मानव जेव्हा आपल्या फायद्यासाठी या झाडाच्या मुळावर घाव घालतो तेव्हा देखील झाड बिनतक्रार ते सहन करते. झाडांची कत्तल होत असताना झाडाच्या पानांवरील दवबिंदू घरंगळत जणू वहीतील शब्दांमध्ये डोकावतात व आपली करुण कहाणी शब्दांकीत करतात याचाच अर्थ असा की, झाडांपासून कागद, वह्या बनविल्या जातात आणि मग अशा वहीच्या पानावर कोणीतरी कवी, लेखक झाडाचे दुःख नेमक्या शब्दांत लिहून काढतो. जणू झाडाच्या शरीरावर बसलेल्या घावाचे रूपांतर दवांच्या टपोऱ्या थेंबात होते असे कवीला वाटते. कवीने झाडाचा सहनशील हा गुण येथे दर्शविला आहे.

No one belongs to a tree, but a tree belongs to everyone. A tree gives shade, shelter, fruits and flowers to others. Benevolence is his characteristic. Even when ruthless humans injure the roots of this tree for their own benefit, the tree bears it uncomplainingly. While the trees are being slaughtered, the dew points on the leaves of the tree rustle as if peering into the words of the notebook and put their compassionate stories into words. The poet feels that the wound on the tree’s body is transformed into drops of medicine. Here the poet has shown the tolerant quality of the tree.

(आ) ‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा. 

उत्तर: झाडांचे मानवी जीवनातील स्थान अतुलनीय आहे. संपूर्ण पर्यावरण झाडांवर अवलंबून आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यात झाडे अग्रेसर आहेत. झाडांमुळे फळे, फुले, औषधे तर मिळतांतच, पण थकलेल्या जीवाला सावली मिळते. झाडांमुळे पाऊस पडतो. झाडे मानवी जीवनातील ‘श्वास’ च आहेत. त्यावाचून आपले जीवन जगणे अशक्य आहे.

The place of trees in human life is incomparable. The entire ecosystem depends on trees. Trees are leading in maintaining the balance of nature. Trees not only provide fruits, flowers, medicines, but also provide shade to a tired soul. Trees cause rain. Trees are the ‘breath’ of human life. It is impossible to live your life out of it.

(इ) ‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा.

उत्तर: झाड कोणत्याही परिस्थितीत घट्ट पाय रोवून उभे असते. वाऱ्याच्या झुळूकोबरोबर पानांच्या सळसळाटीने हसते. पक्ष्यांच्या मंजुळ गाण्याबरोबर जीवनाचे गाणे गाते. आपल्या विशाल सावलीत मुसाफिरांना कवेत घेते. पावसाळ्यात हिरवेगार ताजेतवाने होऊन न्हाऊन निघते. पानझडीनंतर नव्या नवरीसारखा नवीन वेष धारण करते. दातृत्व हा झाडाचा मोठाच गुण आहे. फळे, फुले बहरली की झाडे ती दुसऱ्यांच्या पदरात दान करते. संपूर्ण आयुष्य हिरवगार होऊन जगते. अशाच प्रकारे माणसानेही सहनशीलता, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून ठेवण्याची वृत्ती जोपासली तर त्याचेही जीवन आनंदाने भरून जाईल.

The tree stands firm in any situation. Laughs with the rustling of leaves with the breeze. Sings the song of life with the sweet song of the birds. Enticing travelers in its vast shade. During the monsoons, the greenery refreshes and bathes. After the fall of leaves, it takes on a new guise like a new wife. Charity is a great virtue of the tree. When the fruits and flowers bloom, she donates the plants to others. Live the whole life green. In the same way, if a person cultivates patience, co-operation, and firm footing even in difficult situations, his life will be filled with happiness.