पाठ ८ – कुंदाचे साहस
Kunda was a skilled swimmer. On a Sunday, she was playing with her friends on the banks of the river Sona. All at once, little Razia fell into the water Brave Kunda plunged into the water and saved Raats. Everyone praised Kunda for her brave act
पट्टीची जलतरणपटू – पोहण्यात एकदम तरबेज असलेली
मग्न, दंग असणे – गुंग असणे
गलका वाढणे – आवाज वाढणे
गटांगळ्या खाणे – पाण्यात वर-खाली होण्याची क्रिया
माघारी – मागे
सुखरूप – सुरक्षित
कवटाळणे – मिठी मारणे
स्वाध्याय
प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
उत्तर: पावसामुळे झाडे, शेते हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.
(आ) कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
उत्तर: कुंदा वयाच्या आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती.
(इ) कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
उत्तर: रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती हे दृश्य कुंदाला नदीवर दिसले.
(ई) नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
उत्तर: नदीच्या काठावरचे लोक कुंदाला, ‘कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे. माघारी फीर’ अशा सूचना देत होते.
(उ) रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
उत्तर: नदीत बुडणारी रझिया व तिला वाचवणारी कुंदा या दोघींना सुखरूप पाहून रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
प्र. २. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) प्रसन्न ×
उत्तर: अप्रसन्न, दुःखी
(आ) दूरवर ×
उत्तर: जवळ
(इ) शूर ×
उत्तर: भित्रा
(ई) हसणे ×
उत्तर: रडणे
(उ) पुढे ×
उत्तर: मागे
(ऊ) लवकर ×
उत्तर: उशिरा, सावकाश
प्र. ३. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत
(आ) धावण्यात पटाईत
(इ) भाषण करण्यात पटाईत
‘ब’ गट
(१) वक्ता
(२) क्रिकेटपटू
(३) धावपटू
उत्तर:
‘अ’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत
(आ) धावण्यात पटाईत
(इ) भाषण करण्यात पटाईत
‘ब’ गट
(२) क्रिकेटपटू
(३) धावपटू
(१) वक्ता
प्र. ४. खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
(अ) क्रिकेट –
उत्तर: बॅट, चेंडू, स्टम्प्स, बेल्स, हॅन्डग्लोव्ज, पॅड्स (सेंटर पॅड, हाताचे बाहू व पायांचे पॅड्स)
(आ) कबड्डी –
उत्तर: मैदान आखण्यासाठी चुना, दोया (पाट्यांसाठी)
(इ) फुटबॉल –
उत्तर: फुटबॉल, मैदान, गोल्सचे सेट्स्
(ई) लिंबूचमचा –
उत्तर: लिंबू, चमचा
(उ) संगीतखुर्ची –
उत्तर: संगीत, टेपरेकॉर्डर किंवा कॅसेट प्लेअर, खुर्च्या
(ऊ) विटीदांडू –
उत्तर: विटी दांडू व गली
(ए) लगोरी –
उत्तर: लगोरीचा सेट व चेंडू
(ऐ) पोहणे –
उत्तर: नदी, तलाव, तरणतलाव, जंपिंग सेटस्, लाईफ गार्डस्
प्र. ५. कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यांत योग्य ठिकाणी वापरा.
(दंग होणे, गलका वाढणे.)
(अ) शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.
उत्तर: गलका
(आ) परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली.
उत्तर: दंग
प्र. ६. आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चार-पाच वाक्यांत लिहा.
उत्तर:
(अ) कांचनमाला विनोद पांडे-देशमुखः ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरणपटू आहे. तिचा जन्म ३१ डिसेंबर १९९० रोजी झाला. ती महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एकलारा येथे राहते, ती अंध आहे परंतु जिद्दीने वयाच्या १०व्या वर्षापासून पोहायला तिने सुरुवात केली, लिम्का बुकमध्ये तिने सात कि.मी. समुद्री अंतर चौदा मिनिटात पार करून नाव नोंदवले आहे. मेक्सिको येथे पॅरा जागतिक जलतरण स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकले.
(आ) साजन प्रकाश हा भारतीय जलतरणपटू आहे. जन्म १४ सप्टेंबर १९९३ मध्ये इडुक्की, केरळ येथे झाला. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक मध्ये याने २०० मी बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले.
(इ) शिखा टंडन या भारतीय जलतरणपटू आहेत. यांचा जन्म २० जानेवारी + १९८५ मध्ये झाला. त्या बेंगळुरूमधील स्विमिंग चैम्पियन आहेत. शिखा टंडन यांनी राष्ट्रीय स्तरावर १४६ पदके तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३६ पदके मिळवली आहेत, ज्यात ५ सुवर्ण पदके आहेत. सध्या त्या अमेरिकेच्या विज्ञान संघाच्या सदस्य आहेत.
प्र. ७. तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
उत्तर: रझिया तू लहान मुलगी आहेस. मोठ्या माणसाबरोबरच नदीच्या पाण्यात उत्तरावे. कुंदाप्रमाणे तू प्रथम पोहायला शिकणे आवश्यक आहे. पोहणे जमल्यावरही पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यात उत्तर. स्वतःची काळजी घे.
प्र. ८. पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
उत्तर:
प्र. ९. कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा
उत्तर:
वाचू आणि हसू.
आई : किती वेळा तुला सांगायचं, त्या डब्याजवळ जाऊ नकोस म्हणून!
आशू : आता नाही सांगावं लागणार. आता त्या डब्यातले लाडू संपले आहेत.
उत्तर: घड्याळ
एक वेडा गाढवावर बसून जात असतो. दुसरा वेडा त्याला थांबवतो अन् विचारतो, ‘‘अरे, हेल्मेट का नाही घातलंस?’’
तेव्हा पहिला वेडा म्हणतो, ‘‘अरे, नीट बघ ना खाली. फोर व्हिलर आहे फाेर व्हिलर!’’
आपण समजून घेऊया.
खालील शब्दसमूह वाचा.
सुंदर फुले, गोड आंबा, उंच डोंगर, ताजे दूध, पिवळा झेंडू, सात केळी, लांब नदी, अवखळ मुले.
वरील शब्दसमूहात फुले, आंबा, डोेंगर, दूध, झेंडू, केळी, नदी, मुले ही नामे आहेत, तर सुंदर, गोड, उंच, ताजे, पिवळा, सात, लांब, अवखळ हे शब्द त्या नामांबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. अशा शब्दांना विशेषण म्हणतात.
खालील आकृतीत गुलाबाच्या फुलाला आठ विशेषणे लावली आहेत. ती समजून घ्या.
खालील चित्रांना दोन-दोन विशेषणे लावा.
उत्तर: उंच इमारती
(i) टोलेजंग इमारती
(ii) भव्य इमारती
उत्तर: पांढरा ससा
(i) मोठे मोठे कान
(ii) भित्राससा
उत्तर: लाल कलिंगड
(i) गोल कलिंगड
(ii) मोठे कलिंगड
उत्तर: मोठा हत्ती
(i) पांढरे सुळे
(ii) सुपाएवढे कान
खालील वाक्ये वाचा.
(अ) अरेरे! तू पडलास.
(आ) शाबास! छान खेळलास.
(इ) अरे वाह! छान कपडे आहेत.
उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी ‘!’ असे चिन्ह देतात. या चिन्हास उद्गारचिन्ह म्हणतात.