Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ ७ – उद्यानात भेटलेला विद्यार्थी

In this lesson, the author has described a noteworthy event in the life Dr Babasaheb Ambedkar, the first law minister of Independent India and the principal architect of the Constitution of India. He states how Krishnaji Kelunkar Guruji guided and encouraged Babasaheb in his student life and inculcated reading babit in him.

कुतूहल निर्माण होणे जिज्ञासा निर्माण होणे

विस्तृत – अफाट, विस्तीर्ण

तल्लख – तीक्ष्ण, कुशाग्र

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?

उत्तर: चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करायला येत असत.

 

(आ) उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?

उत्तर: गुरुजींचे सतत तीन दिवस एकाग्र चित्ताने उद्यानात बसून पुस्तकाचे वाचन करणाऱ्या एका विद्यार्थ्याकडे लक्ष गेले.

 

(इ) गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?

उत्तर: एक विदयार्थी इतर मुलांप्रमाणे मस्ती न करता पुस्तकवाचनात मग्न होता म्हणून गुरुजींना त्या विदयार्थ्याची विचारपूस करावी असे वाटले.

 

(ई) केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?

उत्तर: उद्यानात गुरुजी व बाबासाहेब आंबेडकरांची रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागल्यामुळे त्यांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली त्यामुळे त्यांच्यात अभेदय गट्टी जमली.

 

(उ) डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?

उत्तर: आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला.

प्र. २. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

(अ) ‘‘बाळ तुझं नाव काय?’’

उत्तर: असे केळूस्कर गुरुजी भीमरावाला म्हणाले कारण त्याला मार्गदर्शनाची खरी गरज आहे, असे त्यांना वाटले.

 

(आ) ‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’

उत्तर: असे भीमराव केळूस्कर गुरुजींना म्हणाला कारण त्यांनी भीमरावाला वाचन कसे करावे हे आपुलकीने सांगितले.

 

(इ) ‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’

उत्तर: असे भीमराव केळूस्कर गुरुजींना म्हणाले; कारण ती पुस्तके त्यांना विनासायास वाचायला मिळणार होती.

प्र. ३. असे का घडले? ते लिहा.

(अ) केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.

उत्तर: कालचाच विद्यार्थी पुन्हा उद्यानात पुस्तक वाचत असताना गुरुजींना दिसला म्हणून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

 

(आ) भीमराव उद्यानात वाचत बसायचे.

उत्तर: भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर भीमराव उद्यानात वाचत बसायचे.

 

(इ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

उत्तर: गुरुजी व भीमराव यांच्यात वाचनाची समान आवड असल्यामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

 

(ई) गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

उत्तर: गुरुजींनी दिलेली पुस्तके वाचायला आवडतील असे भीमराव म्हणाले. भीमरावांची वाचनाची तळमळ पाहिल्यामुळे गुरुजींनी मायेने भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला.

 

(उ) गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.

उत्तर: केळूस्कर गुरुजींना भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आली. त्यामुळे त्यांनी भीमरावांच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.

प्र. ४. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.

(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.

(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.

उत्तर: योग्य क्रम –

(१) गुरुजींनी विद्याथ्र्यांकडे फारसे लक्ष दिले नाही.

(२) त्या विद्याथ्यनिदेखील गुरुजींकडे बघितले. 

(३) गुरुजी मुलाजवळ आले.

(४) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. 

(५) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

(६) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

प्र. ५. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.

(अ) तुझ्याजवळ 

उत्तर: तुझ्या जवळ, तुज, तूळ, जव, वळ

 

(आ) दिवसापासून 

उत्तर: दिवस, दिन, दिसू, वसा, वन, वसू, साव, सासू, सून, पान, सान.

 

(इ) मार्गदर्शन 

उत्तर: मार्ग, दर्शन, मान, दमा, नद.

 

(ई) आवडतील

उत्तर: आव, आड, आवड, वड, लव.

प्र. ६. खालील शब्दांचे वचन बदला.

(अ) लेखक 

उत्तर: लेखक

 

(आ) पुस्तक 

उत्तर: पुस्तके

 

(इ) शाळा 

उत्तर: शाळा 

 

(ई) भेट 

उत्तर: भेटी

 

(उ) शिफारस 

उत्तर: शिफारशी

 

(ऊ) शब्द

उत्तर: शब्द

प्र. ७. आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव 

उत्तर: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

 

(आ) जन्म स्थळ 

उत्तर: महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश

 

(इ) जन्म दिनांक 

उत्तर: १४ एप्रिल १८९१

 

(ई) आई – वडिलांचे नाव

उत्तर: आईचे नाव – भीमाबाई रामजी सकपाळ

वडीलांचे नाव – सुभेदार रामजी मालोजी सकपाळ

 

(उ) शिक्षण 

उत्तर: बी.ए. एम.ए. पी.एचडी. एम. एससी डी.एससी, बरिस्टर ॲट. लॉ. एल. एल. डी. डी. लिट. (अशा एकूण ३२ पदव्या)

 

(ऊ) लिहिलेली पुस्तके 

उत्तर: ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जातिप्रथेचे विध्वंसन, हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, शूद्र पूर्वी कोण होते?’ इ.

 

(ए) कार्य

उत्तर: समाजशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, मानववंशशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, पत्रकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, लेखक, मानवी हक्कांचे कैवारी, समाजसुधारक इत्यादी विविध रूपामध्ये समाजोपयोगी कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यातील भारतीय घटनेचे लेखन हे त्याचे महत्त्वाचे कार्य मानले जाते.

प्र. ८. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) शब्द – सुशब्द, अपशब्द.

(आ) स्पष्ट – सुस्पष्ट, अस्पष्ट.

(इ) बुद्धी – सुबुद्धी, बुद्‌धिमत्ता, बुद्‌धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी

प्र. ९. खालील शब्द असेच लिहा.

उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्‌धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.

उपक्रम : वेगवेगळ्या वृत्तपत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा व वहीत चिकटवा. त्याचे वाचन करा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.

सांगा पाहू.

कधी हातावर, कधी भिंतीवर

जाऊन मी बसतो,

तीन हात माझे सतत

फिरवत मी असतो,

वेळ वाया घालवू नका

असा नेहमी उपदेश करतो.

उत्तर: घड्याळ

शिस्तीचे धडे

उत्तम गडे,

कणकण शोधते

कधीच न रडे.

उत्तर: मुंगी