Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ ५ – सुगरणीचे घरटे

A weaver bird was busy constructing its nest on a neem tree in the school campus. Atul, Nayana, John and Simran happened to spot the bird. They admired the weaving skill of the bird. Later on their teacher shares more information about the weaver bird and its weaving skills.

मजबूत – पक्के

सुबक – सुंदर

शाबूत राहणे – टिकून राहणे

सर येणे – बरोबरी करणे

वाखाणणे – स्तुती करणे

कसब – कौशल्य

विणकाम – धागे एकमेकांत गुंफून विणण्याचे काम

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?

उत्तर: गवताच्या बारीक पण चिवट काड्यांपासून.

 

(आ) सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?

उत्तर: निंव, बाभळीच्या झाडावर.

 

(इ) सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?

उत्तर: नियोजनबद्धता

प्र. २. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?

उत्तर: सुगरण पक्षी गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो. मग आपल्या चोचीने सुबक वीण घालतो.

 

(आ) सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?

उत्तर: सुगरण पक्ष्याचे हे घरटे झाडाच्या फांदीला झोक्यासारखे टांगलेले असते म्हणून वादळात ते शाबूत राहते.

 

(इ) नयना सुगरण पक्ष्याबद्‌दल काय म्हणाली?

उत्तर: ‘कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध ‘ असे नयना सुगरण पक्ष्याबद्दल म्हणाली.

 

(ई) सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.

उत्तर: आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी अपार मेहनत घेऊन तो पक्षी खूपच सुरेख घरटे बांधतो म्हणूनच त्याला कुटुंबवत्सल पक्षी असे म्हटले आहे.

 

(उ) सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?

उत्तर: आपल्या चोचीने सुगरण पक्षी आकारबद्ध घरटे बांधतो म्हणूनच त्याला कसबी विणकर असे म्हटले आहे.

प्र. ३. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

IMG 20230930 162756 पाठ ५ – सुगरणीचे घरटे

उत्तर: 

(अ) शाबूत राहणे – (२) टिकून राहणे 

(आ) वाखाणणे – (३) स्तुती करणे

(इ) सर येणे – (१) बरोबरी करणे

प्र. ४. खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा. 

(अ) सुबक 

उत्तर: पेणचे देवधर गणपतीच्या सुबक मूर्ती बनवतात.

 

(आ) कसब 

उत्तर: सुबक घर बांधणाऱ्या गवंड्याचे कसब कौतुकास्पद असते.

 

(इ) चिकाटी 

उत्तर: उंच पर्वतकडा चढण्यास चिकाटी हवी.

 

(ई) मजबूत

उत्तर: पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम होते.

प्र. ५. तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा. 

उत्तर: या पाठातून सुगरण पक्ष्याच्या घरट्याची माहिती मिळाली पण त्याबरोबरच सफाईदारपणा, कष्टाळूवृत्ती, चिकाटी, नीटनेटकेपणा या गुणांची ओळख झाली. सुगरण पक्ष्याची जबाबदारी व आई-वडिलांची आपल्या बाळाप्रती माया जाणवली. सुगरण पक्षी केवळ चोचीने एवढे सुंदर घरटे विणू शकतो तर देवाने आपल्याला दोन हात व बुद्धी दिली आहे. मग यांच्या जोरावर आपण सुंदर कलाकृती साकार करू शकतो, याची जाणीव झाली. सुगरण पक्ष्याचे सर्व गुण आपण अंगी बाणवावे असे वाटले.

प्र. ६. तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.

उत्तर: होय, मालरणमध्ये मी लिंबू आणि बाभळीच्या झाडांवर साखर पक्ष्यांची घरटी लटकलेली पाहिली आहेत. मला वाटले की त्याचा आकार प्लेइंग कार्डवरील स्पोकसारखा आहे. घरटे नीटनेटके, मजबूत आणि वादळ-प्रतिरोधक, नमुनादार जाळीदार आहे. ‘बाया’ नावाचा पक्षी कौशल्याने हे घरटे बांधतो. म्हणून त्याला ‘सुगरण’ असे म्हणतात.

प्र. ७. खाली काही शब्ददिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.

नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतिप्रिय, निर्दयी, झोपाळू.

IMG 20230930 161002 पाठ ५ – सुगरणीचे घरटे

उत्तर: 

IMG 20230930 161541 पाठ ५ – सुगरणीचे घरटे

प्र. ८. सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.

उत्तर: सुगरण पक्ष्याप्रमाणे जर माझ्यात चिकाटी असेल, तर मी माझे अक्षर चिकाटीने सुधारेन. सगळे पाढे तोंडपाठ करेन. अवघड गणिते नीट सोडवेन. माझे कपड्यांचे आणि खेळण्यांचे कपाट नेहमी नीटनेटके लावून ठेवेन. आईला कोथिंबीर, भाजी निवडायला मदत करेन. मला एखादी गोष्ट करायला जमत नसेल, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करेन.

उपक्रम : तुम्ही पाहिलेले पक्षी व त्यांची घरटी यांची चित्रे गोळा करून एका मोठ्या कागदावर चिकटवा. त्याखाली त्यांची नावे लिहून तक्ता तयार करा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.

खालील वाक्ये वाचा.

    • तो फळा
    • ती वही
    • ते फळ

 

जेव्हा आपण एखाद्या शब्दाच्या आधी ‘तो’ लावतो तेव्हा तो पुल्लिंगी शब्द, ‘ती’ लावतो तेव्हा स्त्रीलिंगी 

शब्द, ‘ते’ लावतो तेव्हा नपुंसकलिंगी शब्द म्हणतो.

आणखी काही उदाहरणे वाचा. वाक्येलिहिताना त्याप्रमाणे लिहा.

    • तो वाडा 
    • तो भात 
    • ती इमारत
    • ती भाकरी
    • ते घर
    • ते पेन

आपन समजून घेउया

मीना हुशार मुलगी आहे. मीनाच्या भावाचे नाव मिहीर आहे. मीना मिहीरला ‘दादा’ म्हणते. मिहीर मीनाला ‘ताई’ म्हणतो. मीना आणि मिहीर एकाच शाळेत शिकतात. मीना आणि मिहीर यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. मीना मोठी असल्याने मीना मिहीरची काळजी घेते.

 

वरील परिच्छेदात मीना आणि मिहीर या भावंडांचे वर्णन आले आहे. मीना व मिहीर या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा.

मीना हुशार मुलगी आहे. तिच्या भावाचे नाव मिहीर आहे. ती त्याला ‘दादा’ म्हणते. तो तिला ‘ताई’ म्हणतो. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यामध्ये कधीच भांडणे होत नाहीत. ती मोठी असल्याने त्याची काळजी घेते.

मीना आणि मिहीर या नामांऐवजी आपण येथे तिच्या, ती, त्याला, तो, तिला, ते, त्यांच्या, ती, त्याची असे शब्द वापरले आहेत.

 

या शब्दांना सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो, त्या शब्दास सर्वनाम म्हणतात.

खालील वाक्यांतील सर्वनामे अधोरेखित करा.

(अ) मी कुमारला हाक मारली.

उत्तर: मी कुमारला हाक मारली.

 

(आ) तुला नवीन दप्तर आणले.

उत्तर: तुला नवीन दप्तर आणले.

 

(इ) त्याचा फोटो छान येतो.

उत्तर: त्याचा फोटो छान येतो.

 

(ई) मी त्यांना सुविचार सांगितला.

उत्तर: मी त्यांना सुविचार सांगितला.

 

(उ) त्याने घर झाडून घेतले.

उत्तर: त्याने घर झाडून घेतले.

 

(ऊ) आपण पतंग उडवूया.

उत्तर: आपण पतंग उडवूया.

खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन.’’

उत्तर: 

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन.’’