Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १५ – होळी आली होळी

While elaborating on the significance of Holi, the poem also emphasizes on the importance of celebrating it in an environment-friendly way.

अनिष्ट – वाईट

बंडी – एक प्रकारचे वस्त्र

आण – शपथ

पाणी भरणे – मदत करणे

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) होळीला करायचा गोड पदार्थ-

उत्तर: पुरणाची पोळी

 

(आ) केरकचरा टाकायचे ठिकाण-

उत्तर: खड्डा

प्र. २. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?

उत्तर: कवीने झाडे, फांदया तोडण्यास मनाई केली आहे.

 

(आ) होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?

उत्तर: होळीच्या वेळी सद्गुणांनी झोळी भरावी.

 

(इ) होळीसाठी मोळी कशाची बांधावी?

उत्तर: होळीसाठी अनिष्ट रूढी, प्रथांची मोळी बांधावी.

 

(ई) कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?

उत्तर: पर्यावरणाचे भान ठेवून वृक्षराजी न तोडण्याची शपथ कवीने घ्यायला सांगितली आहे.

 

(उ) कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?

उत्तर: कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्गराजा पाणी भरेल.

प्र. ३. ‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.

उत्तर: पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करायला पाहिजे. झाडे, फांदया तोड़ नयेत. केरकचरा खड्ड्यात टाकावा. आपला परिसर स्वच्छ करावा. अनिष्ट रूढी, प्रथा सोडून दिल्या पाहिजेत.

प्र. ४. ‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.

उत्तर: होळी म्हणजे आमच्या वाडीतील सर्वांचा आवडता सण, दोन दिवस आधीपासूनच आम्ही सर्वजण वाडीच्या सफाईला लागतो. होळी पेटविण्याच्या जागी मोठा खड्डा करतो, त्यात सगळा केरकचरा गोळा करतो. तसेच कुणाला अडगळीचे झालेले लाकडी सामानही त्यात टाकतो. संपूर्ण वाडीला कागदाच्या फुलांनी, रंगीबेरंगी कागदांनी सजावट करतो.

 

मुली व स्त्रिया मिळून होळीभोवती रांगोळ्या काढतात. वाडीतील प्रत्येक घरी पुरणपोळी केली जाते. रात्री सर्वजण होळीची पूजा करतात. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सर्वजण शपथ घेतो. होळीच्या सणाला केवळ वाडीतील साफसफाई आम्ही करत नाही तर एकमेकांच्या मनातील हेवेदावे विसरून मनाचीही स्वच्छता करतो.

प्र. ५. तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.

IMG 20231013 165725 पाठ १५ – होळी आली होळी

उत्तर: 

IMG 20231013 170326 पाठ १५ – होळी आली होळी

प्र. ६. होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.

IMG 20231013 165738 पाठ १५ – होळी आली होळी

उत्तर: 

IMG 20231013 170313 पाठ १५ – होळी आली होळी

खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

IMG 20231013 165750 पाठ १५ – होळी आली होळी
IMG 20231013 165803 पाठ १५ – होळी आली होळी

उत्तर: 

(१) स्वच्छता असेल घरीदारी तर आरोग्य नांदेल घरोघरी.
(२) परिसर ठेवा स्वच्छ, मन होईल प्रसन्न.
(३) नदीत कारखान्यातील प्रदूषित पाणी सोडू नका.
(४) विहिरींजवळ झाडे लावू नका.