Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

Appaji was a minister of Krishnadevaraya, the ruler of Vijaynagar. Once, the king of Kalinga put both Krishnadevaraya and Appaji to the test. However, wise Appaji solved both tests very cleverly. In this lesson, the author has, in an interesting manner, described the incidents while admiring Appaji’s witty intelligence.

चतुर – हुशार

चवदार – चविष्ट

कलिंग – एका राज्याचे नाव

गाडीवान – वाहक, गाडी हाकणारा

निकृष्ट – कमी प्रतीचे

अफवा – खोटी बातमी

संतुष्ट – समाधानी

पुरावा – दाखला

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?

उत्तर: अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

 

(आ) उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?

उत्तर: तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती.

 

(इ) कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?

उत्तर: अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने कलिंगचा राजा संतुष्ट झाला.

प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?

उत्तर: अप्पाजींनी एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला लावली. त्या मातीत कोबीचे बी पेरले. रोज कोबीच्या रोपांना पाणी दयायला सांगितले. गाडी कलिंग राज्यात पोहचेपर्यंत कोबी तयार झाली.

 

(आ) कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?

उत्तर: कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व अप्पाजींना सांगितले की यांतील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची तर तिसरी उत्कृष्ट आहे. यांतील उत्कृष्ट मूर्ती ओळखायला सांगून त्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली.

 

(इ) मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?

उत्तर: मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अर्थ, एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता, तो त्या दुसऱ्यांना सांगू लागतो. असा अर्थ अप्पाजींनी लावला.

 

(ई) अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?

उत्तर: अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने तो सोडून देत नाही किंवा दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो अप्पाजींच्या मते उत्तम माणूस.

प्र. ३. पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?

उत्तर: पाणी घेऊन येताना मी झाकण असलेल्या भांड्याचा वापर करेल ज्यामुळे पाणी ने-आण करताना कुठेही सांडणार नाही. आणि तसेच मी एखाद्या वाहनाचा वापर करेल जेणेकरून मला एकाचवेळी जास्त पाणी नेता येईल.

प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) हित × 

उत्तर: अहित

 

(आ) अवघड × 

उत्तर: सोपे

 

(इ) निकृष्ट ×

उत्तर: उत्कृष्ट

प्र. ५. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

IMG 20231013 165621 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

उत्तर: 

IMG 20231013 174013 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

प्र. ६. खालील शब्द वाचा व समजून घ्या.

(अ) चतुर – चातुर्य 

(आ) चोरी – चौर्य 

(इ) क्रू- क्रौर्य 

(ई) शूर – शौर्य 

(उ) सुंदर – सौंदर्य

(ऊ) धीर – धैर्य

प्र. ७. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.

(अ) दरी 

उत्तर: ती दरी – स्त्रीलिंग

 

(आ) पान 

उत्तर: ते पान – नपुंसकलिंग

 

(इ) माठ 

उत्तर: तो माठ – पुल्लिंग

 

(ई) लाडू 

उत्तर: तो लाडू – पुल्लिंग

 

(उ) पुस्तक

उत्तर: ते पुस्तक – नपुंसकलिंग

 

(ऊ) वही

उत्तर: ती वही – स्त्रीलिंग

प्र. ८. तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.

उत्तर: माझा वर्गमित्र अमान व त्याचा चतुरपणा हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय. आमच्या शाळेत ‘इ. ८ वी पर्यंत परीक्षा हवी, नको’ या विषयावर तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धा झाली. परीक्षेचे महत्त्व त्याने आपल्या चतुरपणाने असे काही पटवून दिले की, परीक्षक देखील आश्चर्यचकीत झाले. त्यातही प्रतिस्पर्ध्याचे अनेक मुद्दे त्याने आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने खोडून काढले.

 

२२ स्पर्धकांत श्यामने बाजी मारली. प्रथम क्रमांक व रोख रकमेचे पारितोषिक मिळवले. शाळेत व इतर शाळांतही अमानचा चतुरपणा पोहोचला. प्रभावी वक्तृत्व, हजरजबाबी, चतुरपणा असणारा श्याम माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे.

 

अमानचा कौतुक सोहळा घरी सांगितल्यावर आईनेही तिच्या वतीने त्याला अभिनंदन व भोजनास येण्याचे आमंत्रण देण्यास मला सांगितले.

प्र. ९. अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

प्र. १०. खालील आकृतीत दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा.

IMG 20231013 165633 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

उत्तर: 

IMG 20231013 174040 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य
IMG 20231013 165643 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

उत्तर: 

IMG 20231013 174101 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

प्र. ११. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.

उत्तर: नांगरणी, पेरणी, सिंचन, फवारणी, कापणी, मळणी, लावणी, झोडणी इत्यादी. जमिनीच्या वरचा थर भुसभुशीत करणे. त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे अशी मशागत करतात. त्यानंतर जमीन नांगरली जाते. त्यानंतर ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, वाफे तयार करणे, लावणी लावणे, पीक आल्यावर कापणी करणे त्यानंतर झोडणी करणे. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी ही सर्व कामे करतो.

सुविचार

आपल्या शिक्षणाचा जो देशासाठी उपयोग करतो तो सुशिक्षित समजावा.

शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन व बुद्धी यांचा विकास होय.

सांगा पाहू.

शर्टाच्या खिशावर

रुबाबात बसतो,

काहीही लिहिण्यासाठी

माझ्याशिवाय पर्याय नसतो.

उत्तर: पेन

वेली अन् वनस्पतींनी

नटले मी फुलांनी,

खेळण्यासाठी मजेत

शोधले मला मुलांनी.

उत्तर: बाग

खालील तक्ता वाचा. समजून घ्या.

IMG 20231013 165659 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

१. रिमा सहलीला गेली. (वाक्य भविष्यकाळी करा.)

उत्तर: रिमा सहलीला जाईल.

 

२. मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)

उत्तर: मला आंबा आवडला.

 

३. चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)

उत्तर: चंदा लाडू खात आहे.

 

४. सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)

उत्तर: सुभाष माझा मित्र होता.

 

५. वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)

उत्तर: वंदनाने अभ्यास केला.

 

६. संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)

उत्तर: संजू क्रिकेट खेळेल.

पूर, गाव, नगर, बादही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

IMG 20231013 165713 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य

उत्तर: 

IMG 20231013 174258 पाठ १४ – अप्पाजींचे चातुर्य