Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १२ – चंद्रावरची शाळा

In this technological era of the 21st century, the poetess has imagined a wonderful idea of starting a school on the moon. In this poem, she further elaborates on the amusing things that can happen in this school in a fun way.

शतक – शंभर

यान – अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज वाहन

स्‍वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?

उत्तर: एकविसाव्या शतकात चंद्रावरती शाळा भरेल.

 

(आ) चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?

उत्तर: चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल.

 

(इ) चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?

उत्तर: चंद्रावरच्या शाळेत भाजी-पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही.

 

(ई) चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?

उत्तर: संगणकावरील बटणे दाबून चंद्रावरच्या शाळेत अभ्यास करावा लागेल.

प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?

उत्तर: चंद्रावरती पोचलात की चंद्रावरच्या शाळेत पास केले जाते. तेथे फक्त (संगणकावरची) बटणे दाबणे एवढाच फक्त अभ्यास असतो.

 

(आ) चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?

उत्तर: चंद्रावरची शाळा अशी भारी असेल की त्यामुळे तेथे फक्त चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे.

प्र. ३. योग्य कारण शोधा.

(अ) चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण…

(१) दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे.

(२) चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

(३) सिलिंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून.

 

उत्तर: पर्याय (२) – चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

 

(आ) चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण…

(१) शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.

(२) विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.

(३) चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

 

उत्तर: पर्याय (३) – चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

प्र. ४. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

उदा., भरेल-नसेल. 

उत्तर: 

शाळा – फळा

मुले – खुले

कटकट – पटपट

पहाल – राल

अभ्यास – पास

प्र. ५. ‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.

उत्तर: 

(१) झटपट

(२) कटकट

(३) पटपट

(४) वटवट

(५) झटझट

(६) सटसट

प्र. ६. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.

उत्तर: बटण, ऑक्सिजन, सिलिंडर, पी.टी.

प्र. ७. तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.

उत्तर: पोळी-भाजी, इडली-चटणी, पोहे, उपमा, डोसे असे विविध पदार्थ आम्ही शाळेत नेतो.

प्र. ८. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.

उत्तर: बाहेरील रस्त्यावरचे पदार्थ, चायनीज पदार्थ, रंगीबेरंगी पाकीटातून मिळणारा सुका खाऊ उदा. लेज्, चिटोझ असे पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात. कारण असे पदार्थ आपल्या आरोग्याला घातक असतात.

प्र. ९. चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.

उत्तर: चंद्रावरच्या शाळेत मला जायला आवडेल कारण तेथे खडू आणि फळा ही पारंपरिक शैक्षणिक साधने नसतील. छोट्या-छोट्या यांनातून तेथे जायचे. दप्तराचे ओझे पाठीवर नसेल, भाजी-पोळी ऐवजी गोड गोळी खायची. पी. टी. च्या तासाला तरंगत राहायचे, नुसती बटणे दाबून अभ्यास करायचा व चांदण्यांशीच खेळायचे.

उपक्रम : चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

प्रकल्प : चंद्रावरच्या पाच कविता मिळवा व संग्रह करा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

खालील वाक्ये वाचा.

(अ) गणेश आईला म्हणाला, ‘‘मी कधीही चुकीचे वागणार नाही.’’

(आ) ताई दादाला म्हणाली, ‘‘मला उद्या शाळेला सोडशील का?’’

 

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता ‘‘ – ’’ असे दुहेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.