पाठ ११ – मिनूचा जलप्रवास
Once a tiny little fish named Minu goes on a tour from a river to the sea. exploring the sea life. On her way, she meets a sea turtle who gives her interesting information about different kinds of big fishes in the ocean.
जलप्रवास – पाण्यातील प्रवास
मासोळी – लहान मासा
मुसळधार – फार जोराचा
लोंढे – खूप लोट
चक्कर मारून – भटकून, फिरून
डोळे विस्फारणे – डोळे मोठे करणे
भक्ष्य – शिकार
स्वाध्याय
प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) मिनू मासोळी कुठे राहायची?
उत्तर: निळ्या, थंडगार व स्वच्छ पाण्याच्या नदीत मिनू मासोळी माशांच्या समूहात राहायची.
(आ) मिनूला समुद्र का बघायचा होता?
उत्तर: ‘रोज खूप पाणी जमणारा समुद्र केवढा मोठा असेल?’ या जिज्ञासेपोटी मिनूला समुद्र बघायचा होता.
(इ) नदीचे पाणी गढूळ का झाले?
उत्तर: एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला आणि जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.
(ई) खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
उत्तर: खडकावर फुललेल्या फुलांचे लाल, गुलाबी, अंजिरी असे छान रंग होते.
(उ) समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
उत्तर: समुद्राच्या खोलवर अंधार असतो, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहचत नाही.
प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर: एक नदी होती. तिच्यात खूप खूप पाणी होते. निळे निळे, थंडगार व स्वच्छ ! इतके स्वच्छ की वरून पाहिले तर तळाची वाळू, गोल गोटे व सुळसुळ पोहणारे मासे दिसायचे. अशा सुंदर शब्दांत लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे.
(आ) मिनूची व आईची चुकामूक का झाली?
उत्तर: मुसळधार पाऊस पडल्यामुळे जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले, त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. मासे बावरले. कोणीच कोणाला दिसेना. या गोंधळात मिनूची व तिच्या आईची चुकामूक झाली.
(इ) घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
उत्तर: समुद्रामध्ये मिनूची एका माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. ते पाहून मिनूला हसू आले.
प्र. ३. कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
(अ) ‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
उत्तर: मिनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वत:लाच म्हणाली.
(आ) ‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
उत्तर: समुद्राच्या पाण्यात मिनूची एका विचित्र माशाची टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मिनूला म्हणाले.
(इ) ‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
उत्तर: कासव व मिनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्या मधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता. तेव्हा ती घाबरली, तिची भिती दूर करताना कासव मिनूला म्हणाले.
(ई) ‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
उत्तर: मिनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू कासवाला म्हणाली.
प्र. ४. शिंपल्यामध्येमोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
उत्तर: मोती तयार होण्याची क्रिया :
(१) दोन शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो. अगदी मांसाचा गोळा असतो.
(२) त्याला चालायचे असले, की तो आपले पाय फटीतून बाहेर काढून चालतो.
(३) या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, की शिंपल्यातील गोळयाला तो टोचू लागतो.
(४) मग तो आपल्या अंगावरील पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो.
(५) मग त्यातून छानदार मोती तयार होतो.
प्र. ५. चार-पाच ओळींत वर्णन करा.
(अ) घोडमासा
उत्तर: हा एक विचित्र मासा आहे. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात त्याची छोटी-छोटी पिल्ले बसलेली असतात. खोल समुद्रातील हा विचित्र मासा पाहून मिनूला हसू आले.
(आ) खेकडा
उत्तर: हा प्राणी तिरका तिरका चालतो. त्याचे डोळे बटबटीत असतात. त्याच्या पाठीवर कासवासारखे कठीण कवच असते. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. सहा ते आठ पाय असूनही त्याला सरळ चालता येत नाही. तोंडाजवळच्या नांग्यांनी तो स्वतः चे रक्षण करतो व भक्ष्यही पकडतो.
प्र. ६. ‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:
(१) छोटीशी
(२) लहानशी
(३) छानशी
(४) मोठीशी
(५) बारीकशी
(६) नाजुकशी
प्र. ७. (अ) समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तर:
लांब – दूर
प्रचंड – मोठे
उष्ण – गरम
लहान – इवली
(आ) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तर:
पुढे × मागे
प्रकाश × अंधार
मऊ × टणक
मोठे × लहान
प्र. ८. योग्य जोड्या लावा.
नाम
(अ) मिनू
(आ) पाणी
(इ) डोळे
(ई) पाऊस
विशेषण
(१) मुसळधार
(२) इवलीशी
(३) खारट
(४) बटबटीत
उत्तर: (अ) – (२), (आ) – (३), (इ) – (४), (ई) – (१)
प्र. ९. खालील शब्द वाचा. समजून घ्या.
गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग
प्र. १०. तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
उत्तर: आई, मी आज पहाटे पोहत समुद्रात पोहचले. समुद्राचे पा पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्याणी खारट होते. समुद्र खूप लांब पसरलेला होता. रांगा होत्या. एका खडकावर लाल, गुलाबी, अंजिरी फुलेच फुले होती. माझी घोडामाशाशी टक्कर झाली. त्याच्या पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मला एक मोठे कासव भेटले. त्याने मला अष्टभुज मासा, खेकडे, शंख-शिपले दाखविले व मला त्यांची माहिती सांगितली. ते कासव मला आणखी गमतीजमती दाखविणार होते पण मीच नको म्हटले. त्यानीच मला परत नदीत आणून सोडले. पण समुद्र खूप छान होता.
प्र. ११. शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.
खालील वाक्ये वाचा.
(अ) विसूने ‘ताजमहाल’ पाहिला.
(आ) मंदाने सुरेशला सांगितले, ‘पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे.’
एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना (‘ – ’) असे एकेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.
खालील वाक्यांतील काळ ओळखा.
(अ) सूर्य पूर्वेला उगवतो.
उत्तर: वर्तमानकाळ
(आ) मला लाडू आवडला.
उत्तर: वर्तमानकाळ
(इ) आईचा स्वयंपाक झाला होता.
उत्तर: भूतकाळ
(ई) मी गावाला जाईन.
उत्तर: भविष्यकाळ
(उ) तू का रडतेस?
उत्तर: वर्तमानकाळ
(ऊ) मी पोहायला शिकणार आहे.
उत्तर: भविष्यकाळ