Maharashtra Board Textbook Solutions for Standard Seven

पाठ ९ – वाचनाचे वेड

मन वळवणे – तयार करणे

नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे

आमूलाग्र – मोठ्या प्रमाणात

Sonali was not fond of reading. Her mother plays a trick to develop reading interest in her and that idea works. This lesson is about an interesting story of how Sonali becomes passionate about reading.

स्‍वाध्याय

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?

उत्तर: सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत. तिला वाचनाची आवड लागावी असे सोनालीच्या आईला वाटत होते.

 

(आ) सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?

उत्तर: कथांचा सारांश लिहून काढण्यासाठी सोनालीने पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे आईला सांगितले. तिला लागलेली ही वाचनाची गोडी पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होते.

 

(इ) सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?

उत्तर: सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एकेक पुस्तक भेट स्वरूपात दिले.

प्र. २. खालील घटनांमागील कारणे लिहा.

(अ) आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

उत्तर: सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. एका शाळेत पाहुणी म्हणून गेल्यावर तेथील मुलांना सांगण्यासाठी एक गोष्ट सोनालीने पुस्तकातून निवडून द्यावी, यासाठी आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

 

(आ) आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.

उत्तर: आईने दिलेल्या पुस्तकातील सर्वच कथा सोनालीला आवडल्या पण त्यातली कोणती निवडावी ते तिला समजेना म्हणून आईने वाचलेल्या सर्व कथांचा सारांश सोनालीला लिहायला सांगितला.

 

(इ) सोनालीला आता ‘पुस्तक वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नव्हती. 

उत्तर: शाळेत गेल्यावर सोनालीने बाईंना आपण आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले, सोबत एक कथाही ऐकवली. बाईनी प्रथम आईला मदत केली म्हणून तिचे अभिनंदन केले व वर्गात छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने शाबासकी दिली. सोनालीला खूप आनंद झाला आणि तिने वेगवेगळी पुस्तके वाचून त्यातील आवडलेले प्रसंग व ओळी लिहून ठेवण्याचे ठरवले म्हणून आता तिला पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही.

प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

IMG 20231017 190254 पाठ ९ – वाचनाचे वेड

उत्तर: 

IMG 20231017 190441 पाठ ९ – वाचनाचे वेड

प्र. ४. अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.

उत्तर: फक्त अभ्यास एके अभ्यास करायचा मला कंटाळा येतो. शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत उपक्रमात भाग घ्यायला मला आवडतो. चित्रकला स्पर्धेत चित्र काढायला आवडतात. खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मित्रांना हरवायला खूप मजा येते. खेळायला गेल्यावर खूप ताजेतवाने वाटते. स्नायूंचा खूप व्यायाम होतो. भूक चांगली लागते आणि झोपही पटकन लागते. शाळेत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतही भाग घ्यायला आवडतो. व्यासपीठावर उभे राहून सर्वांसमोर आपले विचार मांडताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. अशाप्रकारे सगळीकडे सहभागी होणे मला आवडते.

खेळूया शब्दांशी

(अ) खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

(अ) सफल होणे – 

(१) यशासाठी झटणे. 

(२) यशस्वी होणे. 

(३) अपयश येणे.

 

उत्तर: पर्याय (२) – यशस्वी होणे. 

 

(आ) नोंदी करणे – 

(१) लिहून ठेवणे. 

(२) नोंदवही लिहिणे. 

(३) लक्षात ठेवणे.

 

उत्तर: पर्याय (१) – लिहून ठेवणे. 

 

(इ) आनंद गगनात न मावणे – 

(१) आनंद वाहून जाणे. 

(२) दु:खी होणे. 

(३) खूप आनंद होणे.

 

उत्तर: पर्याय (३) – खूप आनंद होणे.

 

(ई) नवल वाटणे – 

(१) आश्चर्य वाटणे. 

(२) खूप आनंद होणे. 

(३) नाराज होणे.

 

उत्तर: पर्याय (१) – आश्चर्य वाटणे.

(आ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) आमूलाग्र 

उत्तर: ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचल्यावर, लीनाच्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला.

 

(आ) शाबासकी 

उत्तर: सुंदर चित्र काढल्यावर मिनूला बाईंनी शाबासकी दिली.

 

(इ) अवांतर

उत्तर: अवांतर वाचनामुळे आपले ज्ञान वाढते.

(इ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा.

IMG 20231017 190304 पाठ ९ – वाचनाचे वेड

(अ) बक्षीस

उत्तर: पारितोषिक

 

(आ) यश

उत्तर: विजय

 

(इ) गोष्ट

उत्तर: कथा

 

(ई) मदत

उत्तर: साहाय्य

 

(उ) आवड

उत्तर: रस

(ई) हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.

उपक्रम : तुम्हांला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

खालील वाक्ये वाचा.

(अ) अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन् पावसाची रिपरिप सुरू झाली. 

(आ) मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.

(इ) रमेश रत्ना मावशीकडे पुण्याला गेले.

(ई) आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.

(उ) बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.

 

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन् हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.

 

लक्षात ठेवा : उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे, हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे.

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई : आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.

 

अंकुश : आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक ?

 

उत्तर: 

आई : आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया. 

 

अंकुश : आई, तू बटाट्याची भाजी अन् पुन्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक ?

आम्ही बातमी वाचतो.

IMG 20231017 190316 पाठ ९ – वाचनाचे वेड

वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?

उत्तर: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.

 

(२) वरील बातमी कोणत्या तारखेची आहे?

उत्तर: वरील बातमी १६ ऑक्टोबरची आहे.

 

(३) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले?

उत्तर: वाचन प्रेरणा दिनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. परिसरातील महत्त्वाच्या चौकांत ‘वाचन संस्कृती वाचवा’ या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. ‘उत्कृष्ट वाचन’ ही स्पर्धा घेण्यात आली. अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

(४) कोणत्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले?

उत्तर: इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विदयार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले.

 

(५) विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाढावे, यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील, यावर गटात चर्चा करा. त्याची यादी तयार करा.

उत्तर: विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत पुढील उपक्रम घेता येतील. 

(अ) विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुस्तके सहज उपलब्ध करून दिली पाहिजेत. 

(आ) जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांना वर्षाअखेर बक्षीस दद्यावे.

(इ) पुस्तक प्रदर्शन भरवावे.

(ई) लेखक-कवी यांच्याशी गप्पा मारण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावी.

आपण समजून घेऊया.

खालील वाक्ये वाचा.

(अ) असे स्‍थळ–जे निसर्गरम्‍य आहे. 

(आ) आभाळ भरून आले, पण –

 

वरील वाक्यांमध्‍ये ‘’ हे चिन्‍ह आले आहे. वाक्यांमध्‍ये ‘’ हे चिन्‍‍ह दोन कारणांनी वापरतात.

 

(१) स्‍पष्‍टीकरण द्यायचे असल्‍यास.

(२) बोलताबोलता विचारमालिका तुटल्‍यास. 

 

’ या चिन्‍हास अपसरण‍चिन्‍ह म्‍हणतात.

 

लक्षात ठेवा : अपसरणचिन्‍हाची लांबी संयोगचिन्‍हापेक्षा जास्त असते.