पाठ १० – पंडिता रमाबाई
अनुवाद – भाषांतर
ख्याती – प्रसिद्धी
पराङ्मुख – तोंड, पाठ फिरवलेला, विन्मुख झालेला
हातभार लावणे – मदत करणे
Pandita Ramabai was a great social reformer. This lesson elaborates in detail the profound work done by her for the emancipation of women.
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?
उत्तर: स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली.
(आ) पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?
उत्तर: मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.’ या त्यांच्या उद्गारांवरून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते है समजते.
(इ) पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?
उत्तर: अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थनामंदिर बांधताना रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते.
प्र. २. खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला –
उत्तर: बिपिनबिहारी मेधावी
(आ) त्यांच्या मुलीचे नाव –
उत्तर: मनोरमा
(इ) अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी-
उत्तर: ब्रेल लिपी
(ई) सहस्रकातील कर्मयोगिनी-
उत्तर: पंडिता रमाबाई
प्र. ३. पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.
उत्तर: पंडिता रमाबाईनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड- सतरंज्या विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी लहान उदयोग सुरू केले.
प्र. ४. पंडिता रमाबाईसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
उत्तर: पंडिता, कर्मयोगिनी, सत्शील साध्वी, सूर्यकन्या.
प्र. ४. अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
उत्तर: फक्त अभ्यास एके अभ्यास करायचा मला कंटाळा येतो. शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत उपक्रमात भाग घ्यायला मला आवडतो. चित्रकला स्पर्धेत चित्र काढायला आवडतात. खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मित्रांना हरवायला खूप मजा येते. खेळायला गेल्यावर खूप ताजेतवाने वाटते. स्नायूंचा खूप व्यायाम होतो. भूक चांगली लागते आणि झोपही पटकन लागते. शाळेत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतही भाग घ्यायला आवडतो. व्यासपीठावर उभे राहून सर्वांसमोर आपले विचार मांडताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. अशाप्रकारे सगळीकडे सहभागी होणे मला आवडते.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा., गारवा गार, रवा, वार, गावा, वागा. –
(१) आराखडा
उत्तर: खड़ा, खरा, आख
(२) सुधारक
उत्तर: सुधा, धार, धाक, धारक, कर, सुर
(आ) असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर ‘र’ आहे. त्याची यादी करा.
उदा., करंजी, चौरंग, कारंजे…………
उत्तर: तरंग, सारंग, प्रारंभ, आरंभ, निरंक, परंतु बेरंग
(इ) खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) – मजूर –
(१) पुस्तक (डोके) –
उत्तर: मस्तक
(२) समता (माया) –
उत्तर: ममता
(३) घागर (समुद्र) –
उत्तर: सागर
(४) कडक (रस्ता) –
उत्तर: सडक
(५) गाजर (पाळीव प्राणी) –
उत्तर: मांजर
(६) प्रवास (घर) –
उत्तर: आवास
(ई) हे शब्द असेच लिहा.
स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.
खेळ खेळूया.
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
उत्तर:
ओळखा पाहू!
महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.
खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक दया.
सकाळची वेळ … बाबांबरोबर फिरायला … झाडांवर बसलेले पाखरांचे थवे … किलबिल … शुद्ध हवा … आल्हाददायक वातावरण … बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे … दिवसभर ताजेतवाने वाटणे.
उत्तर:
आज सुट्टी असूनही मला लवकर जाग आली होती. बाबा रोज सकाळी फिरायला जातात. आज मीही त्यांच्याबरोबर फिरायला निघालो. केवढी ! शांतता होती बाहेर. ना मोटारींचा आवाज, ना धूर. पूर्वेकडे हळूहळू सूर्य वर येत होता. आकाशात तांबूस प्रकाश पसरला होता. ढगांना लाली चढली होती. इतक्यात काय गंमत झाली. एका झाडावरून पक्ष्यांचा थवा उडू लागला. मला खूप मज्जा वाटली. जरा नजर वळवून पाहतो तर काय, एकेका झाडावरून पक्ष्यांचे थवेच्या थवे उडत होते. त्यांचा किलबिलाट तर मन मोहून टाकणारा होता. हवेत मंद गारवा होता. कसलीही गडबड नाही, गोंधळ नाही. वातावरण अगदी आल्हाददायक होते. मी शुद्ध हवा अनुभवत होतो. मला खूप प्रसन्न वाटत होते. या निर्मळ निसर्गाचा मी प्रथमच आनंद घेत होतो. बाबांशी गप्पा मारत मी कधी घरी परतलो, हे कळलेच नाही. कोणतेही हेल्थ ड्रींक न घेता मला आज ताजेतवाने वाटत होते. मी मनाशी पक्का निश्चय केला की रोज सकाळी बाबांबरोबर फिरायला जायचं आणि निसर्गाचा बूस्टर डोस घ्यायचा.
चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा.
(१) मंगल खंजिरी _____ टाळ छान वाजवते.
उत्तर: आणि
(२) काका आला _____ काकी आली नाही.
उत्तर: परंतु
(३) कुंदाचा पाय मुरगळला _____ ती शाळेत येऊ शकली नाही.
उत्तर: म्हणून
(४) मला बूट _____ चप्पल खरेदी करायची आहे.
उत्तर: किंवा
(५) धोधो पाऊस पडत होता _____ मुले पटांगणावर खेळत होती.
उत्तर: तरी
(६) तुझी तयारी असो _____ ‘नसो, तुला गावी जावेच लागेल.
उत्तर: वा
आपण समजून घेऊया.
- खालील वाक्ये वाचा.
आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखादया उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यांतील शाब्बास, अरेरे, बापरे, अहाहा ही केवलप्रयोगी अव्यये आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात.
खालील वाक्यांत कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.
(अरेरे, अबब, शी, चूप)
(अ) _____ ! काय दशा झाली त्याची !
उत्तर: अरेरे
(आ) _____ ! एक अक्षरही बोलू नकोस.
उत्तर: चूप
(इ) _____ ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.
उत्तर: शी
(ई) _____ ! केवढा मोठा अजगर !
उत्तर: अबब