Maharashtra Board Textbook Solutions for Standard Seven

पाठ ५ – दादास पत्र

This lesson is a letter written by a younger sister Ayesha to ‘dada’ her elder brother. In this letter. Ayesha in her flowing words describes in detail the Maldhok sanctuary, the bird Maldhok and many different birds.

स्‍वाध्याय

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?

उत्तर: विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत विद्यार्थ्याना दाखवली ती पाहून आणि तेव्हा ताई-दादांनी सांगितलेली माहिती ऐकून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.

 

(आ) अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?

उत्तर: अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी या पक्ष्यांची अंडी तुडवली, तर संख्या आणखीच कमी होते.

चर्चा करा मांगा.

पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसाेबत चर्चा करा.

उत्तर: पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे कारण पर्यावरण संतुलित राखण्यास पक्षी मदत करत असतात. शेतातील पिकांचा नाश करणारे कीटक हे पक्ष्यांचे अन्न आहे. कावळे, निळकंठ यांसारखे पक्षी कीटक व त्यांची अंडी खाऊन कीटकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात आणि किडींपासून पिकांचे रक्षण होण्यास मदत होते. कोकिळा, मैना, कबुतरे हे पक्षी फळे खातात आणि बिया बऱ्याच ठिकाणी टाकतात. ज्याठिकाणी या बिया पडतात तेथे नवीन झाडांची निर्मिती होते. तसेच पक्षी परागीभवनाचे काम करतात. शेतीची नासाडी करणारे आणि अनेक आजार पसरवणारे उंदीर-घुशी यांना खाण्याचे काम शिकारी पक्षी करतात. उदा. गरुड, घुबड तसेच मोठ्या मोठ्या मेलेल्या प्राण्यांना खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे काम गरुड, गिधाड हे पक्षी करत असतात. म्हणून पर्यावरणामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.

उत्तर: वाढत चाललेल्या तापमानामुळे वृक्षतोडीमुळे आणि शहरीकरणामुळे पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. ही संख्या वाढावी म्हणून मी गच्चीमध्ये, खिडकीत, बाल्कनीत पक्ष्यांसाठी खाद्य आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करेन. कारण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी मिळत नाही आणि पाण्यावाचून त्यांना आपले प्राण गमवावे लागतात. फुले व फळे देणारी झाडे लावेन ज्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळेल. लोकांना सांगेन की प्रत्येकाने किमान एक झाड लावा कारण पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेली झाडे नष्ट होत आहेत.

माहिती मिळवूया.

माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

 

फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाईल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

IMG 20231017 141906 पाठ ५ – दादास पत्र

उत्तर: 

IMG 20231017 141941 पाठ ५ – दादास पत्र

उपक्रम : तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला / मैत्रिणीला लिहा.

उत्तर: 

सुनेा कदम

‘गंधाली’ कॉलेज रोड, 

नागिरी

२७-१२-१७

 

प्रिय सुप्रिया,

कशी आहेस? कितीतरी दिवसांत आपण बोललोच नाही. रुखरुख लागलेय. म्हणून आज तुला पत्रच लिहायला घेतेय. त्याला कारणही तसंच आहे.

 

अगं, कालच मी व आईवडील महाबळेश्वरहून परतलो नि त्याबद्दल तुला लिहावं अशी ओढ वाटली. डिसेंबरच्या या थंडीच्या दिवसांत महाबळेश्वर अगदी हिरवंगार आहे. निसगांच्या कपाळावर हिरवं गोंदणं लावल्यासारखं महाबळेश्वरचे सगळे पॉइंटस् आम्ही पाहिले. तुला माहीत आहे. पहिल्यांदा मी घोड्यावर बसून रपेट केली.

 

त्यानंतर आम्ही ‘एको’ पॉइंटवर गेलो. तिथे मी वेगवेगळे आवाज काढले. तुझ्या नावाचा पुकारा केला तर मस्त प्रतिसाद आला. तिथे खूप माकडे होती. एका माकडाने तर दुसऱ्या पर्यटकाचा रुमालच पळवला. खूप मजा वाटली.

 

संध्याकाळी आम्ही ‘सनसेट पॉइंटवर गेलो. मावळणारं सूर्यबिंब लालेलाल कलिंगडासारखं दिसत होतं.. तुझी खूप आठवण आली. तू निसर्गचित्र काढतेस ना तेथून परतलो. रात्री खूप गारठा होता. गुडूप झोपलो. पहाटे जाग आली. अंघोळ, नाश्ता करून आम्ही भल्या सकाळी ‘सनराईज पॉइंट’ पाहिला. नंतर तलावावर जाऊन बोटिंगचा आनंद लुटला. महाबळेश्वरच्या मंदिराला भेट देऊन आम्ही बाजारात फेरफटका मारला. थोडी खरेदी केली. तुझ्यासाठी मी कॉलग्राफीचं पेन घेतलंय. नंतर आम्ही घरी परतलो.

 

आई-बाबा कसे आहेत? आणि सागरदादा ? सर्वांना नमस्कार.

 

तुझी मैत्रीण 

   सुनेत्रा

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

IMG 20231017 141918 पाठ ५ – दादास पत्र

उत्तर: 

थोडासा

जरासा

अनेक

काही

मोजके

वर

आज

तिकडे

खाली

जिकडे

सावकाश

हळू

आम्ही सूचनाफलक वाचतो.

IMG 20231017 141927 पाठ ५ – दादास पत्र

वरील सूचनाफलकाच्या आधारेखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?

उत्तर: ही सूचना २३ सप्टेंबर २०२२ या तारखेला देण्यात आली आहे.

 

(२) पाणीपुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे?

उत्तर: पाणीपुरवठा २४ सप्टेंबर २०२२ रोजी बंद करण्यात येणार आहे.

 

(३) पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?

उत्तर: पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

 

(४) पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?

उत्तर: उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा ही सूचना पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना देण्यात आली आहे.

खालील परिच्छेद वाचा..

सायंकाळ झाली, की आजी घराच्या व्हरांड्यात खुर्ची टाकून बसते. साेबत आणखी दोन-तीन खुर्च्याही ठेवते. समोरच्या रस्त्यावरची ये-जा न्याहाळते. रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली, की त्या व्यक्तीस हाक मारते. तिची ख्यालीखुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही.

(– हे चिन्ह दोन कारणांनी वापरतात.)

 

(१) दोन शब्द जोडताना.

उदा., ये-जा, दोन-तीन.

 

(२) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.

उदा., रस्त्या-वरची. 

 

‘–’ या चिन्हास संयोगचिन्ह म्हणतात.