Maharashtra Board Textbook Solutions for Standard Seven

पाठ ११ – लेक

आस – इच्छा, अपेक्षा

ऊर – हृदय

पर्वा न करणे – काळजी न करणे

The poetess says this while saying how pleasurable it is to have a daughter at home. My daughter is as good as a red ruby gem. My daughter is indeed an ever-glimmering green tattoo. She is like the foliage blooming on a tree. Like sweet-smelling sandalwood, which being rubbed spreads fragrance, my daughter wears away her bones in serving the home.
 
When my daughter pervades my mind, all my worry withers away. When she is moving into the house, her presence illuminates every nook and cranny of the house like the gentle wick of an oil lamp.
 
When my daughter is not at home, my mind longs for her. The time stops as if frozen, and my mind becomes gloomy (as it becomes difficult to pass time in any way in her separation).
 
My mind rejoices to see my daughter playing, laughing, and prattling all around the house like the chirping of a sparrow. But when I scold her even a little, she lets out a huff.
 
I don’t care, even if everyone else is dissatisfied with me. But I feel that my daughter, who is like a tender petal, should never be upset with me.
 
Only my daughter understands the words of nature. Just as morning dawns with hope and promise, after a night filled with darkness, likewise, my daughter illuminates and enlivens my life.

स्‍वाध्याय

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?

उत्तर: लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था विचित्र होते. वेळ जाता जात नाही जणू काही वेळ थांबूनच राहिली आहे असे वाटते. मन खूप उदास होते. कशातही लक्ष लागत नाही.

 

(आ) कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?

उत्तर: कवयित्रीला आपली लेक बोलकी चिमणी वाटते कारण तो सगळ्या घरात हसत-खेळत, बागडत असते. तिची घरात अखंड बडबड सुरू असते.

 

(इ) कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?

उत्तर: थोडे रागावले तर कवितेतील लेक रुसून बसते.

प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ)

IMG 20231017 214153 पाठ ११ – लेक

उत्तर: 

IMG 20231017 214821 पाठ ११ – लेक

(आ)

IMG 20231017 214205 पाठ ११ – लेक

उत्तर: 

IMG 20231017 214846 पाठ ११ – लेक

प्र. ३. तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.

उत्तर: माझी ताई घरात नसली, तर मला काही सुचेनासे होते. चैन पडत नाही, ताई घरी कधी येईल ? याची मी वाट पहात बसते. ती नसल्यामुळे माझा अभ्यास अपूर्ण राहतो, माझ्याशी कुणी खेळायला नसतं की भांडायला कुणी नसतं.

प्र. ४. पाठ क्रमांक २ ते पाठ क्रमांक ११ यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

खेळूया शब्दांशी

(अ) शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

उदा., कुंदन-गोंदण, चंदन.

उत्तर: 

(१) मिटते – पेटते 

(२) हसते – बसते

(३) उरास – उदास 

(४) भाषा – आशा

(५) कळते – लागते

वाचा.

आई म्हणते माझा छावा, 

बाबांचा मी बोलका रावा, 

ताई म्हणते मला राजा,

तिच्याशी खेळताना येते मजा.

 

आजोबांचा मी गुणांचा ठेवा,

आजी करते माझी वाहवा,

धावून करतो कामे चार,

सर्वांचा मी लाडका फार.

  • मुलगा-मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान.

भाषेची गंमत पाहूया.

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

(१) टेप आणा आपटे.

(२) तो कवी ईशाला शाई विकतो.

(३) ती होडी जाडी होती.

(४) हाच तो चहा.

(५) सर जाताना प्या ना ताजा रस.

(६) काका, वाचवा, काका.

 

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

IMG 20231017 214217 पाठ ११ – लेक

उत्तर:

वा! ससा किती जलद पळतोय.

किती छान! मुलगी आहे.

अरेरे! पायाला ठेच लागली वाटते.

वाचा. समजून घ्या.

आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहेत.

IMG 20231017 214233 पाठ ११ – लेक

आपली समस्या आपले उपाय - २

विचार करा. सांगा.

आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?

उत्तर: दुसऱ्यांना देऊन टाकतो.

 

जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल, असे तुम्हांला वाटते?

उत्तर: गोधडी, पायपुसणी

 

आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील, असे तुम्हांला वाटते?

उत्तर: घरात कपड्यांचा खूप साठा होणार नाही.