Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १० - कुलूप

In this poem, Shripad Krishna Kolhatkar, a talented poet of the 20th century, sketches the bizarre Bandunana, who passionately collects and buys locks of all shapes and sizes. He used to be essentially chained to this amusing craze. This obsession was more about showing off his key collection than protecting his belongings. It caused a number of less pleasant and more unpleasant incidents for his family. There are delicious samples.

 

His wife once misplaced the storeroom key. He wouldn’t be able to afford to borrow food from his neighbours, obtain a duplicate key from the market, or even face the nasty blacksmith who would break his priceless lock. They were forced to go without food for a whole day. The lock was broken the following day when the blacksmith was called, making Bandunana so furious that he did not talk to him for nearly two weeks.

 

He used to entrust his wife with the inexpensive locks and tie up most of the household keys with his sacred thread. Any standard key, a nail, or even a jerk might open such locks. Once, his dependable worker took a sizable sum and fled.

 

He spent a lot of time worrying about choosing the right lock for the safe. He secured it with a number lock, but it was difficult to unlock in the dark. He then fastened a bell-lock. But the bell sounded when he personally opened it. With one hand, he grabbed his and yelled, “Thief! thief!” He once experienced overwhelming joy after coming up with the brilliant concept for a safe key. “If we Indians could get scope,” he bragged to his friends, “we could create numerous Edisons.” Then, after receiving a promise of privacy, he displayed his inventive safe-lock. Observe this! His safe was stolen not long after.

 

A classic event was once invited by his devotion. The village was visited by a nomadic tribe that sold locks, keys, knives, pins, needles, etc. They were bought in bulk by Bandunana. A travelling theatre troupe unintentionally set up camp in the town at the same time. Since Bandunana enjoyed drama, he went with his family and locked the house with the newly bought locks. He saw that everything in the safe had been taken when they came back. Along with him escaped the clan who had sold him the locks. The only jewellery that his wife had worn was unharmed: decorations! How could the poor Bandunana respond? Following that theft, Bandunana’s mouth was perpetually closed. Nothing to say!

स्वाध्याय

प्र. १. (अ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

१.

Screenshot 20221221 152021 01 पाठ १० – कुलूप

उत्तर:

20221221 151729 0000 01 पाठ १० – कुलूप

२.

Screenshot 20221221 152028 01 पाठ १० – कुलूप

उत्तर:

20221221 151807 0000 01 01 पाठ १० – कुलूप

(आ) कारणे शोधा

(१) काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण—–

उत्तर: कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा या नानांच्या हव्यासामुळे.

 

(२) नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण —–

उत्तर: नानांचा स्वभाव मानी होता.

 

(इ) खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१)
वसुधैव कुटुंबकम्वृत्ती
(२)
अक्षरशत्रू कुलूप
(३)
चोर कलेला आश्रय देत नाही
(४)
माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला

उत्तर:

संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१)
वसुधैव कुटुंबकम् वृत्ती
‘सारे विश्व माझे घर’ अशी भावना.
(२)
अक्षरशत्रू कुलूप
अक्षरांचा वापर न करता नुसत्या चावीने उघडणारी कुलपे.
(३)
चोर कलेला आश्रय देत नाही
कुलपांचे कौतुक न करता चोर चोरी करून जातात.
(४)
माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला
दागिने घालण्याच्या आवडीने दागिने वाचवले.

(ई) आकृती पूर्ण करा.

Screenshot 20221221 152153 01 पाठ १० – कुलूप

उत्तर:

20221222 010409 0000 01 पाठ १० – कुलूप

प्र. २. (अ) खालील शब्दांचे अर्थशोधून लिहा. 

(१) दुर्घट 

उत्तर: दुर्गम, अवघड

 

(२) हव्यास 

उत्तर: हाव, आसक्ती

 

(३) कुचकामी 

उत्तर: निरुपयोगी

 

प्र. ३. पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा. 

उत्तर:

(१) ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत.

(२) बाजारी कुलपांची ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली.

(३) आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे; पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हांला संधी मिळत नाही साधी! ती मिळती तर आम्हांमध्ये शेकडो एडिसन झाले असते!

(४) आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.

 

प्र. ४. सहसंबंध शोधा.

(१) अंधार : तम : : किल्ली : 

उत्तर: चावी 

 

(२) सावध : बेसावध : : विश्वासू : 

उत्तर: अविश्वासू

 

(३) रमेश : नाम : : ते :

उत्तर: सर्वनाम 

 

प्र. ५. स्वमत.

(१) बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा. 

उत्तर: अखेर बंडूनानांनी गावात जी टोळी आली होती, त्यांच्याकडून कुलपे विकत घेतली व जुनी कुलपे काढून तिजोरीला ही नवीन कुलपे लावली. निर्धास्त होऊन ते नाटकाला गेले. त्या रात्री नानांच्या विरोधाला न जुमानता नानांच्या पत्नीने सगळे दागिने अंगावर चढवले होते. नाटक सकाळी पाचला संपले. दरम्यान चोरांनी कुलपांना स्वत:कडच्या किल्ल्या लावून तिजोरीतला माल लंपास केला. हे समजल्यावर नानांच्या पत्नीने नानांना टोमणा मारला की, कुलपापेक्षा दागिने घालण्याच्या माझ्या हौसेने तुमच्या मिळकतीचा बचाव केला. त्या वेळी नाना एकदम चूप बसले. याचाच अर्थ त्यांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची वेळ आली.

 

प्र. ६. अभिव्यक्ती.

(१) बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा. 

उत्तर: बंडूनानांना वेगवेगळी आकारांची व कळींची कुलपे जमवण्याचा छंद होता. कुलपांचा हा संग्रह मित्रांच्या दृष्टीस पडावा, म्हणून त्यांनी घरात कुलपांचा सर्रास वापर केला. धान्याच्या कोठीची चावी हरवल्यामुळे त्यांना दोन दिवस उपास घडला नि मित्रांनी कुलूप फोडले ह्याचा त्यांना विषाद वाटला. हे विनोदी वर्णन खुमासदार झाले आहे. घंटेची चावी तिजोरीला लावून रात्री उजव्या हाताने कुलूप काढताना डाव्या हाताने पकडून ‘चोर! चोर !!’ असे स्वतःच ओरडणे, यातला प्रसंगनिष्ठ विनोद बहारीचा झाला आहे. यावर कळस म्हणजे चोरांकडून कुलपे विकत घेणे व चोरीला स्वत:च हातभार लावणे या प्रसंगांतील विसंगती मनोहारी शब्दांत टिपली आहे. पत्नीच्या दागिने घालण्याच्या हौसेपोटी मिळकत वाचणे व त्यामुळे नानांच्या तोंडालाच कुलूप लागणे, हे विनोदी वर्णन म्हणजे पाठाचा कळसाध्याय आहे.

 

(२) व्यक्तिमत्त्वविकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.

उत्तर: आपल्या आवडीची गोष्ट सतत करीत राहणे व त्यातून सातत्याने आनंद घेणे, याला छंद म्हणतात. वस्तूंचा संग्रह, गायन, वादन, चित्रकला, वाचन इत्यादी अनेक छंद आहेत. छंदामुळे आपण एकाग्रता शिकतो. एखादी गोष्ट सर्व बाजूंनी पारखून घेण्याची सवय लागते. तसेच छंदामुळे ज्ञानवृद्धी होते. हळूहळू आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध व्हायला लागते. छंद आणि व्याप्ती यामध्ये जेव्हा अतूट नाते निर्माण होते, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. छंदाचे रूपांतर ध्यासात, ध्यासाचे निष्ठेत व निष्ठेचे रूपांतर जेव्हा व्रतात होते, तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व बहरून येते. म्हणून व्यक्तिमत्त्वविकासात छंदाचे महत्त्व असाधारण आहे.