पाठ २४ – ऐका. पाहा. करा.
उपक्रम –
१. हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्हीसुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय केले ते क्रमाने सांगा तुम्ही खपटा कर तथा केला ते मित्रांना सांगा.
उत्तर: आम्ही सशाचा मुखवटा तयार केला. त्यासाठी एक पांढऱ्या रंगाचा कार्डपेपर, एक गुलाबी रंगाचा कार्डपेपर, एक काळ्या रंगाचा कागद, गोंद, कात्री, पेन्सिल, इलॅस्टिक, सुई इत्यादी साहित्य घेतले.
१. मुखवटा बनवण्यासाठी पांढऱ्या कार्डपेपरच्या मागील भागावर पेन्सिलने सशाचा मुखवटा काढून घेतला.
२. रंगीत गुलाबी कार्डपेपरवर सशाचे कान, नाक, तोंड, डोळे असे आकार कात्रीच्या साहाय्याने कापून
३. पांढऱ्या कार्ड पेपरवर काढलेल्या मुखवट्यावर फेव्हिकॉल लावून डोळ्यांच्या जागी डोळे, कानाच्या जागी कान, नाक, तोंड यांचे कापलेले आकार चिकटवले.
४. डोळ्यांना सुईने दोन छिद्रे पाडली.
५. मिश्यांचा कापलेला आकार मिश्यांच्या काढलेल्या चित्रावर लावला.
६. मुखवट्याच्या दोन्ही बाजूंना सुईने छिद्रे पाडून त्यातून इलॅस्टिक घातले आणि गाठ बांधली. अशा तऱ्हेने आमचा सशाचा मुखवटा तयार झाला.
२. कागदाच्या वशीपासून विविध वस्तू तयार करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.