पाठ २५ - मालतीची चतुराई
शब्दार्थ
थकून जाणे – खूप दमणे
डोक्याला हात लावणे – विचारात पडणे
अंजारणे गोंजारणे – प्रेमाने थोपटणे
कांगावा करणे – खरे बोलण्याचा आव आणणे
सहजासहजी – त्रास न होता
भंबेरी उडणे खूप – गोंधळून जाणे
लबाडी – खोटेपणा
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?
उत्तर: मलण्णाने शेतातून घरी आल्यावर दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा, पाणी देऊन स्वत:ही हातपाय धुतले. मालतीने केलेली भाजीभाकरी खाऊन मलण्णा अंथरुणावर पडला. शेतात काम करून थकल्यामुळे त्याला पटकन झोप आली. सकाळी लवकर उठून मलण्णा बाहेर आला. पाहतो तर काय गोठ्यात एकच बैल दुसरा बैल गायब होता. त्याने पत्नी मालतीला विचारले, “अगं गोठ्यात एकच बैल आहे. आपला दुसरा बैल कुठे गेला ?” मालती झटकन बाहेर आली व तिनेही पाहिले की खरोखरच गोठ्यात एकच बैल होता. दुसरा बैल रातोरात गायब कसा झाला? या गोष्टीचे मालतीला नवल वाटले. द्या
(आ) मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
उत्तर: मलण्णा व मालतीने गावात हरवलेल्या दुसऱ्या बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला. पण बैल काही सापडला नाही. दोघेही थकून गेले. आता काय करावे ? बैल कोठे गेला असेल ? एकच बैल, शेती कशी करायची? असे अनेक विचार मलण्णाच्या मनात आले व या काळजीने तो डोक्याला हात लावून बसला.
(इ) बैल बोरणारा माणूस मनातून का घाबरला?
उत्तर: तालुक्याच्या बाजारात आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत मलण्णा व मालती बाजारात फिरत असताना मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघेही बैलाजवळ पोहचले. “हा आमचा बैल!” असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले-गोंजारले, त्यानंतर “या
(ई) मालतीने युक्ती करायचे का ठरवले?
उत्तर: “या माणसाने आमचा बैल चोरला.” असा मालतीने आरडाओरडा सुरू करताच बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. “तुमचा बैल मी कशाला घेऊ ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे.” असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. हे सर्व पाहून मालतीच्या लक्षात आले की, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. बैल परत मिळविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून मालतीने युक्ती करायचे ठरवले.
(उ) मालतीने कोणती युक्ती केली ?
उत्तर: बैल चोरणारा जेव्हा हा आपलाच बैल आहे असे म्हणून मालतीशी भांडू लागला. तेव्हा मालतीच्या लक्षात आले. हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. म्हणून तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. “सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा ?” असे मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, “माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना ? बैलाचा डावा डोळा अधू असेल, तर बैल तुझा नाही तर तो माझा आहे.” असे मालतीने म्हणताच चोराच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. परत तो म्हणाला. “नाही, नाही माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे.” हे ऐकताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. अशी युक्ती मालतीने बैल परत मिळवण्यासाठी केली.
(ऊ) चोराची भंबेरी का उडाली?
उत्तर: बैल परत मिळवण्यासाठी मालतीने एक युक्ती केली. बैलाच्या डोळ्यांवर हात ठेवून चोराला बैल कोणत्या डोळ्याने अधू आहे. असे विचारले. चोराने माझा बैल डाव्या डोळ्यानं अधू आहे. असे सांगितले. मालतीने जर बैल डाव्या डोळ्यानं अधू असेल तर तुझा नाही तर माझा असे सांगितले. मालतीच्या या बोलण्यावरून बैल डाव्या डोळ्याने अधू नसावा म्हणून चोराने आपले उत्तर बदलून “माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे.” असे दिले. तेव्हा मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला आणि म्हणाली, “अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत. ” खरोखरच बैलाचे दोन्ही डोळे व्यवस्थित होते. आपली चोरी पकडली जाणार म्हणून चोराची भंबेरी उडाली.
प्र. २. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.
(अ) मालती _____ बाहेर आली.
उत्तर: झटकन
(आ) एका बैलाबर _____ कशी करायची?
उत्तर: नांगरणी
(इ) तेवढ्यात मालतीला त्यांचा _____ बैल दिसला.
उत्तर: हरवलेला
(ई) बैलाभोवती लोकांची _____ जमली.
उत्तर: गर्दी
(उ) सगळ्यांनी मालतीच्या _____ कौतुक केले.
उत्तर: चतुराईचे
प्र. ३. पटकन, झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर: मटकन, चटकन, कटकन, तडकन, गपकन.
प्र. ४. आरडाओरडा, सहजासहजी हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा.
उत्तर:
(१) आरडाओरडा “या माणसाने आमचा बैल चोरला,” असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली.
(२) सहजासहजी हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही.
प्र. ५. मालतोच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या मित्राच्या / मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा.
उत्तर: माझ्या मित्राच्या चतुरपणाचे कौतुक अनगिनत वेळा जाहीर झाले आहे. त्याच्यामध्ये एका दिवशी त्याने आपल्या वाचनाच्या प्रेमातून होणारे काही विचारले आणि आपल्या गोड विचारांसाठी उपयुक्त सुचना दिल्या. त्याच्या आवाजाने जरूरी गोष्टी किंवा घडणे त्याला आग्रहित करू शकले. तिच्या चतुराईच्या अंशामध्ये, ती विवेकी, सुविचारशील आणि हास्यपूर्ण दृष्टिकोन असल्याची माझ्या मैत्रिणीने दिलेल्या सवालांकिंवा स्थितींसाठी ती बघण्याची आणि समाधानाची क्षमता असल्याची सिद्धी केली आहे. ह्या त्याच्या अद्वितीय चतुराईला मी नेहमी आदर करतो आणि माझ्या जीवनात एक मूळ धारक असल्याची माझ्याला गर्व आहे.
प्र.६. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
(अ) खरेदी ×
उत्तर: विक्री
(आ) लहान ×
उत्तर: मोठा
(इ) डावा ×
उत्तर: उजवा
प्र.७. खालील शब्द असेच लिहा.
दोन्ही गोष्टी, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री.
उपक्रम – आतापर्यंतच्या पाठांत आलेले जोडशब्द शोधा. ते ‘माझा शब्दसंग्रह’ वहीत लिहा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.