पाठ १९ – अनुभव – २
शब्दार्थ
गाठणे – पोहचणे
भाव गगनाला भिडणे – खूप महाग होणे
हुश्श करणे – मोकळा श्वास घेणे
स्वाध्याय
प्र. १. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) आईला पाहताच मुलगा घावत का गेला?
उत्तर: शाळा सुटल्यावर मुलगा घरी जायला निघाला. वाटेत त्याला त्याची आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून त्याला जाणवले. तिच्या हातातील पिशवी घेऊन तिला मदत करण्यासाठी मुलगा आईला पाहताच तिच्याकडे धावत गेला.
(आ) आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?
उत्तर: आईने बाजारात जाऊन महिनाभराचे किराणा सामान दोन पिशव्यात भरून आणले होते. आईला मदत करण्यासाठी मुलाने आईच्या हातातील एक पिशवी घेतली. एक पिशवी हातात धरल्यावर मुलाला समजले की त्या जड पिशव्यांच्या ओझ्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते.
(इ) आईला बरे का वाटले?
उत्तर: आई दोन पिशव्या भरून सामान बाजारातून आणत होती. वाटेत तिला मुलगा भेटला. त्याने आईच्या हातातील एक पिशवी घेतली. त्यामुळे आईला थोडी मदत झाली. दर महिन्याला आई अशाच पिशव्या भरून सामान आणत असे. एवढं ओझं ती एकटीच घेऊन येत असे. आज मुलाने आईला सामान आणण्यास मदत केली. त्यामुले आईचे काम थोडे हलके झाले म्हणून आईला बरे वाटले.
(ई) मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले?
उत्तर: आई दर महिन्याला किराणा सामानाने भरलेल्या पिशव्या एकटीच घेऊन येत असे, आज मुलाने आईच्या हातातील एक पिशवी घेतल्याने त्या खूप जड असतात व त्या आणताना आई खूप दमते हे मुलाला समजले. आईला मदत व्हावी म्हणून ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते, त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ म्हणजे आईही दमणार नाही व मुलाचेही व्यवहारज्ञान वाढेल म्हणून मुलाने किराणा सामान शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आणायचे ठरवले.
प्र. २. खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान – मान. पोपट – पोट.
पाठवणी
उत्तर: पाठ
यजमान
उत्तर: मान
आगबोट
उत्तर: बोट
तोंडपाठ
उत्तर: तोंड, पाठ
पोटपूजा
उत्तर: पोट
पायपुसणी
उत्तर: पाय
गालबोट
उत्तर: गाल, बोट
नाकतोडा
उत्तर: नाक
प्र.३. खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी
हुश्श
चक्कर
लख्ख बगी
गच्च
सज्जन
लठ्ठ
उड्डाण
अण्णा
पत्ता
कथ्थक
जिद्द
घट्ट
अन्न
गप्पा
झिम्मा
अय्या
गल्ली
सव्वा
प्र. ४. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
(अ) मोठे ×
उत्तर: छोटे, लहान
(आ) हसणे ×
उत्तर: रडणे
(इ) जड ×
उत्तर: हलके
(ई) खाली ×
उत्तर: वर
(उ) जाणे ×
उत्तर: येणे
(ऊ) सांडणे ×
उत्तर: भरणे
प्र.५. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
(अ) सामानाला
उत्तर: सामान, नाला, मासा, माला
(आ) बाजारात
उत्तर: बाजार, रात, राजा, बाजा, बारा, जात
(इ) चाललीस
उत्तर: चालली, सलील, चाल, सल
(ई) मनापासून
उत्तर: मन, सून, पासून, पान, नाम, नासून
प्र. ६. तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
उत्तर: मी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालते. आईने घरातील एखादी वस्तू मागितली तर ती नेऊन देते. जेवायला बसण्याआधी ताट, वाटी, तांब्या, ग्लास नेऊन ठेवते. कचरा काढते. कोथिंबीर निवडते, लसूण, वाटाणे सोलून देते. छोट्या भावाचा अभ्यास घेते. त्याला सांभाळते. मी कपडे वाळत घालायला मदत करू शकेन. लादी पुसू शकेन. आईला कपाट लावायला मदत करू शकते. बिल्डिंगच्या आवारात असलेल्या दुकानातून वस्तू आणून देऊ शकते इत्यादी.
प्र. ७. तुमच्या घराजवळील किराणामालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा.
उत्तर: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूरडाळ, मुगडाळ, मसूरडाळ, हिरवे वाटाणे, पांढरे वाटाणे, चवळी, मुग, मटकी, काबुली चणे, हरभरा, वाल, राजमा, साखर, चहापावडर, गोडेतेल, खोबरेल तेल, मसाला, हळद, सॉसची पॅकेटे वाटल्या, राई, जिरे, हिंग, नूडल्स पॅकेट, बिस्कीटे, तूप, पोहे, रवा, गूळ, चॉकलेट्स, साबण, टूथब्रश, कोलगेट, इत्यादी.
प्र. ८. खालील शब्द बाधा, रंगछटा समजून घ्या.
लालेलाल
काळेकुट
पांढरेशुभ्र
पिवळेधमक
जांभळट
निळसर
हिरवेगार
प्र. ९. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्ये पूर्ण करा
(असतो, हळूहळू, शाळा, लवकर, पंडली)
(अ) संजू _____ उठतो.
उत्तर: लवकर
(आ) गोगलगाय _____ चालते.
उत्तर: हळूहळू
(इ) हा बंगला नेहमी बंद _____.
उत्तर: असतो
(ई) _____ वेळेवर भरते.
उत्तर: शाळा
(उ) यावर्षी खूप थंडी _____.
उत्तर: पडली
उपक्रम – आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.
उत्तर:
आई
आईचे प्रेम, उबदार मिठी,
कोमल कृपेने मार्गदर्शन.
तिचे हसणे, सूर्यप्रकाशासारखे,
माझे जग उजळते.
तिच्या मिठीत, सुरक्षित,
तिच्या प्रेमात, मी धाडसी आहे.
ती माझी हिरो आहे, माझी मार्गदर्शक आहे,
कायम माझ्या बाजूला.
आईचे प्रेम, शुद्ध आणि खरे,
तिच्यामध्ये, मला माझा संकेत सापडतो.
तिचे प्रेम, एक सौम्य गाणे,
आयुष्यभर.