Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ २० – गमतीदार पत्र

शब्दार्थ

कोरा कागद – काहीही न लिहिलेला कागद

नवल – आश्चर्य 

गुपित – गुप्त गोष्ट, रहस्य

स्वाध्याय

प्र. १. एक वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) पत्र कोणी पाठवले?

उत्तर: पत्र मायाच्या काकांनी पाठवले.

 

(आ) पत्र कोणाला पाठवले?

उत्तर: पत्र मायाला पाठवले.

 

(इ) मामाला पत्र का वाचता आले नाही? 

उत्तर: काकांनी लिंबाच्या रसाने पत्र लिहिले होते, रस सुकल्यावर कागद कोरा दिसत होता म्हणून मायाला पत्र वाचता आले नाही.

प्र. २. कोण ते सांगा.

(अ) कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.

उत्तर: माया

 

(आ) कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी.

उत्तर: रेश्मा

प्र.३. खालील शब्द असेच लिहा.

पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट

पाठातील खाली वाक्ये पाठा.

(अ) दारावरची बेल वाजली,

(आ) ‘काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला?’

(इ) रेशमाने पत्र हातात घेतले. 

(ई) “अगं, काकांनी कोर पत्र पाठवलं.”

याचा समजून घ्या.

(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात. 

(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.

(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/ नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. या चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात.

 

वरील वाक्यांत (. ? ,) ही विरामचिन्हे आलेली आहेत

खालील वाक्यांत पूर्णविराम, प्रानचिन्ह व स्वल्पविराम घाला. 

(१) मी संगणक सुरू केला मामाचा ई-मेल बाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो

उत्तर: मी संगणक सुरू केला. मामाचा ई-मेल वाचला. काय म्हणतो मामा ? कधी येणार आहे तो घरी? आईने विचारले, मामा चार दिवसांनी येणार होता. आम्ही आनंदित झालो.

 

(२) रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात

उत्तर: रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात.

 

(३) तू जेवण केलेस का

उत्तर: तू जेवण केलेस का?

 

(४) हे ऐकून तुला आनंद झाला का

उत्तर: हे ऐकून तुला आनंद झाला का?

 

(५) मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो

उत्तर: मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो.

 

(६) सुशांत रघु राजेश हे चांगले मित्र आहेत

उत्तर: सुशांत, रघू, राजेश हे चांगले मित्र आहेत.

वाचा व लिहा

आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाड सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.