पाठ ५ – घाटात घाट वरंधाघाट
वेध – लक्ष्य.
बेफाम – सुसाट वेगाने.
पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे.
प्रत्यय - अनुभव.
रोरावत – रों रों आवाज करत.
विहंगम – विलोभनीय, सुंदर.
चापणे – खाणे.
कारवी – एक झाड.
अवशेष – शिल्लक राहिलेला भाग.
स्वाध्याय
प्र. १. आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. २. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
उत्तर:
प्र. ३. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) जिगरबाज भटके-
उत्तर: बराच वेळ गेल्यावर ज्यांना थोडे भिजावेसे वाटते, पाय मोकळे करावेसे वाटतात; म्हणून ज्यांना डेरिंग करावेसे वाटते, त्यांना ‘जिगरबाज भटके’ म्हटले आहे.
(आ) रंगिली पायवाट-
उत्तर: डोंगरमाथ्यावर नऊ टाक्यांचा – समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. त्या टाक्यापासून परत जाताना या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतातच. म्हणून तिला रंगिली पायवाट’ म्हटले आहे.
(इ) डोंगराची सोंड-
उत्तर: कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ट्रेकवर वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराचे जे सुळके आहेत, ते सोंडसारखे दिसतात; म्हणून त्याला ‘डोंगराची सोंड’ असे म्हटले आहे.
प्र. ४. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
(अ) वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर: पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्गसौंदर्य मनोहारी असते. पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते. त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात. दरीमध्ये जिकडेतिकडे २ हिरवळ फुललेली असते. डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात. पाऊस सतत पडत असतो. मोठमोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खळाळत वाहत असते. हे दृश्य अतिशय विहंगम असते. डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी वडे चहा – असा राजेशाही, चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो.
(आ) कावळ्या किल्ला.
उत्तर: जे जिगरबाज भटके आहेत, त्यांच्यासाठी : कावळ्या किल्ला सदैव तयार आहे, असे लेखकांनी म्हटले आहे. वरंधा घाटातला कावळ्या किल्ला फार मोठा आहे. तो फोडून घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्रीवाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ जो नऊ टाक्यांचा समूह आहे, तो पूर्वी कावळ्या किल्ल्याचाच एक भाग होता इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे. वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते; तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंधा घाटाचे सुरेख दर्शन होते.
डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कावळ्या किल्ल्याचे जोत्याचे अवशेष व ढासळून गेलेल्या बुरुजांचे अवशेष दिसतात. कावळ्या किल्ल्याची सफर अशी मनोहारी आहे.
खेळूया शब्दांशी
(अ) खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तर:
(अ) विहंगम – दृश्य
(आ) गरमागरम – कांदाभजी
(इ) घोंघावणारा – वारा
(ई) काळाशार – पाषाण
(उ) अरूंद – पायवाट
(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.
(अ) पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.
उत्तर: कडे, वर
(आ) चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
उत्तर: सारखी
(इ) जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
उत्तर: साठी
(इ) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.
(अ) घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटियाँ!
उत्तर: ! – उद्गार्वाचक चिन्ह
(आ) गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.
उत्तर:
‘ ‘ – एकेरी अवतरण चिन्ह
. – पूर्णविराम
चर्चा करूया
वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.
शोध घेऊया
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.