पाठ ४ – आपण सारे एक
फिरस्ती - फिरणे.
पोटोबाची पूजा करणे - जेवणे, खाणे.
पोटासाठी वणवण हिंडणे – अन्न मिळवण्यासाठी कष्ट करणे.
फरफट होणे – गैरसोय होणे.
बेअदबी – अवमान.
कसूर – गुन्हा.
कुरकुर करणे – तक्रार करण.
स्वाध्याय
प्र. १. एका शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे
उत्तर: नयनकुमार
(आ) माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी
उत्तर: कर्णिका
(इ) वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी
उत्तर: नासिका
(ई) जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते
उत्तर: दंतराज
(उ) सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते
उत्तर: मेंदूराज
(ऊ) अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते
उत्तर: पोटोबा प्रधान
प्र. २. आकृती पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
(इ)
उत्तर:
प्र. ३. कारणे शोधा व लिहा.
(अ) जिव्हाताई गप्प आहे, कारण………
उत्तर: जिव्हाताई गप्प आहे; कारण तिला पोटोबा खवय्येची चीड येत होती.
(आ) पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण………
उत्तर: पोटोबांविरुद्ध संप करायचा, असे जिव्हाताई म्हणाली; कारण पोटोबा आयते बसून खातात.
प्र. ४. स्वमत स्पष्ट करा.
(अ) ‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
उत्तर: या नाटिकेमध्ये शरीराच्या काही अवयवांचा संवाद आहे. त्यामध्ये बरीचशी इंद्रिये पोटाविषयी तक्रार करीत आहेत, की आम्ही सर्व कामे करतो व पोट आयते बसून खाते. ही तक्रार जेव्हा मेंदूराजाकडे जाते, तेव्हा मेंदूराजे सर्वांना समजवतात की, हे शरीररूपी राज्य आहे. यातील प्रत्येक अवयवाला नेमून दिलेली कामे आहेत. पोट हे प्रत्यक्ष काम करताना दिसत नाही; पण ते सर्व अवयवांना जीवनरस पुरवते. त्याने जर त्याचे काम बंद केले; तर सारे अवयव निकामी होतील. हा विचार पटवताना मेंदूराजे म्हणतात की आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. या त्यांच्या बोलण्यातून एकजुटीची शिकवण मिळते. लेखकांनी या नाटिकेतून भारतीय एकात्मतेचे तत्त्व मांडले आहे.
(आ) पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
उत्तर: सर्व इंद्रियांना पोटोबाबद्दल राग होता. पोटोबामुळे सगळ्यांची फरफट होते आणि मानसन्मान मात्र पोटोबाला मिळतो, अशी जिव्हाताईची तक्रार होती. जरा जास्त खाल्ले की पोटोबा गुरगुरतो, याची चीड तिला येई. कर्णिका म्हणाली, पोटोबामहाशय, नुसतं बसून खातात. पदकुमार म्हणाला, सगळ्यांवर पोटोबा उगाचच गुरगुरतो नि आम्हांला राबवून घेतो. सर्वांचे पोटोबाविषयी असे म्हणणे होते की आम्ही सारे रात्रंदिवस काम करतो पण पोटोबा मात्र काहीच काम करीत नाहीत. म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी मेंदूराजेकडे पोटोबाची तक्रार करायचे सर्व इंद्रियांनी ठरवले.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला.
(अ) तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर
उत्तर: तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर!
(आ) हो हो आमची तयारी आहे
उत्तर: हो, हो, आमची तयारी आहे.
(आ) वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब
उत्तर:
(इ) खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा.
(अ) कान –
उत्तर: कर्णिका
(आ) नाक –
उत्तर: नासिका
(इ) हात –
उत्तर: हस्तकराज
(ई) पाय –
उत्तर: पदकुमार
(उ) जीभ –
उत्तर: जिव्हाताई
उपक्रम :
(१) ‘आधी पोटोबा मग विठोबा’ ही, म्हण या पाठात आली आहे. याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्याइतर म्हणी शोधा व लिहा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.
(२) या पाठाचे नाट्यीकरण वर्गात सादर करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.