पाठ १२ – शब्दकोश (स्थूलवाचन)
स्वाध्याय
प्र. १. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.
उत्तर: मराठीत प्रथम शब्द हे अ पासून सुरु होतात ते पुढे स्वर संपल्यावर क, ख, ग, या व्यंजनांनी सुरु होऊन ज्ञ च्या बाराखडी पर्यंत. थोडक्यात अक्षरक्रमानुसार शब्द मांडणीला अकारविल्ह्यानुसार मांडणी म्हणतात.
अकारविल्हे शब्दांची मांडणी करण्यासाठी खालील २ प्रकार आहेत
१) बाराखडी नुसार : प्रथम शब्द हे अ पासून सुरु होतात ते पुढे स्वर संपल्यावर क, ख, ग, या व्यंजनांनी सुरु होऊन ज्ञ च्या बाराखडी पर्यंत.
२) क्रमांका अनुसार : प्रथम क्रमांक हे १ पासून सुरु होतात ते पुढे २, ३, ४, ५,……. अनंत कडे जातात.
प्रश्नात दिलेल्या शब्दांना आपण बाराखडीनुसार लावले आणि उत्तर खालीलप्रमाणे आले.
आलोक, अंबर, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर, हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावलेले आहेत.
प्र. २. तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
उत्तर: पाठातील शब्दांचा अर्थ जर आपल्याला बरोबर माहिती असला तर आपल्याला पाठ चांगला समजतो. परीक्षेत अचूक उत्तरे लिहिता येतात. प्रत्येक पाठ / कविते शेवटी अवघड प्रश्नांची अर्थ दिलेले असतात तुम्ही ते पण बघू शकतात.
जर मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधावायचा असेल तर मी त्या शबडस शब्दकोशात शोधण्याचा प्रयत्न करेन. तिथे असलेल्या असंख्य शब्दांमद्धे माझ्या शब्द शोधण्यासाठी मे अक्षरांच्या क्रमाने पाहीन. म्हणजेच त्या शब्दाचे पहिले अक्षर आणि त्यापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या यादीत शब्द शोधून त्याचा अर्थ पाहीन.
प्र. ३. शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: शब्दकोश हा शब्दांचा अचूक अर्थ समजून देण्यात फार मदत करतो. कित्येकदा एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात, परंतु बरोबर अर्थबोध होण्यासाठी आपल्याला त्याचा अचूक अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी शब्दकोशात केलेली असते त्यामुळे तो शब्द सुलभरीत्या शोधण्यास मदत होते. शब्दकोशात त्याचा समानार्थी शब्द, अर्थ आणि उच्चार दिलेले असतात ज्याची आपल्याला फार मदत होते.
प्र. ४. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
(अ) शब्दकोशाचा उपयोग
उत्तर: शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहूनही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.
(आ) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे
उत्तर: भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पहाणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे, त्या अर्थाच्या छटा समजणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे आवश्यक असते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे.