पाठ ९ - झुळूक
शब्दार्थ :
ओढ – आकर्षण.
स्वैर – मुक्त.
राई – बाग.
कानोसा घेणे – चाहूल घेणे.
अंगुली – बोट.
पसार होणे – पळून जाणे.
कुंज – वन.
अलगूज – बासरी.
हितगूज – गुजगोष्टी, मनातल्या गोष्टी सांगणे.
राबणे – कष्ट करणे.
स्वाध्याय
प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
(इ)
उत्तर:
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा
(अ) झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण…..
(१) तिला स्वातंत्र्य हवे असते.
(२) तिला सर्वत्र हिंडायचे असते.
(३) तिचे मन तिकडे ओढ घेते.
(४) तिला लोक आमंत्रण देतात.
उत्तर: (३) तिचे मन तिकडे ओढ घेते.
(आ) वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण…..
(१) झुळूक स्वत:च गाणे गाते.
(२) तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
(३) तिथे ध्वनिफित लावलेली असते.
(४) झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
उत्तर: झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
प्र. ३. परिणाम लिहा.
(अ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला-
उत्तर: झुळकेने कलिकेला स्पर्श केला तर कळी फुलेल व झुळकेसह तिचा सुगंध सर्वत्र दरवळेल.
(आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
उत्तर: बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर ती साऱ्या बकुळफुलांचा सडा डोहात पाडेल.
प्र. ४. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) चुकलीमुकली लकेर-
उत्तर: झुळझुळ झऱ्यावर झुळूक येते व झऱ्याच्या ओघाने झुळूकेचे गाणे ही चौफेर पसरते.
(आ) पाचूचे मखमली शेत-
उत्तर: पाचू या रत्नासारखे हिरवेगार असलेले मऊशार शेत.
प्र. ५. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे –
उत्तर: नदी, झरा, डोह, बागा, शेत
(आ) कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू –
उत्तर: वसंत ऋतु
(इ) झुळकेचा विश्रांतीचा प्रहर –
उत्तर: तिन्हीसांजेचा
खेळूया शब्दांशी
(अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
(१) व्हावे-
उत्तर: न्हावे
(२) काठी-
उत्तर: साठी
(३) हळूवार-
उत्तर: पसार
(४) अलगूज-
उत्तर: हितगूज
(आ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
(१) छोटी-
उत्तर: सानुली
(२) ताजेपणा-
उत्तर: टवटवी
(३) बोट-
उत्तर: अंगुली
(४) पावा-
उत्तर: अलगूज
(इ) तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) झुळुकेची परोपकारी वृत्ती.
उत्तर: ‘झुळूक’ या कवितेत कवीला झुळूक बनून विविध प्रकारची गंमत निर्माण करायची आहे. परोपकारी वृत्तीने फिरून सर्वांना मदत करायची आहे. कळीला हळूहळू फुलावे लागते. फुलाचा सुगंध सर्वत्र पसरायचा असतो. वसंत ऋतूची गोड चमक सर्वत्र पसरायची आहे. वेळूच्या जंगलात जाऊन अलगद बासरीचा मधुर आवाज वाजवून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे असते. कॉर्न फुलू इच्छित आहे. बकुळीचा चुरा करावा लागतो. जांभळा गाळून घ्यावा लागतो. थकलेला, थकलेला चेहरा थंड वाऱ्याच्या स्पर्शाने टवटवीत व्हायचा असतो.
(आ) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
उत्तर: प्रस्तुत कविता ‘दामोदर कारे’ यांनी लिहिली आहे आणि मला ती खूप आवडली. कविता आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे शब्दरचना अतिशय सोपी आहे. समर्पक शब्दरचनेमुळे कवितेला गेयता आहे. कवितेला सुंदर आशय मिळाला आहे. ‘झुळूक’ बनून परोपकारी वृत्तीने मौजमजा करण्याच्या कवीच्या कल्पनेमुळे ही कविता अर्थपूर्ण आहे. चुका, गोंधळ, यमकयुक्त शब्द यांमुळे कविता मधुर आहे. कवितेतील स्पष्टवक्तेपणा आणि उत्स्फूर्तता हृदयस्पर्शी आहे.
कल्पक होऊया.
• ‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
उत्तर: मी पक्षी झाल्यानंतर मला देशभरात तसेच परदेशात जायला आवडेल. मी आकाशात उंच उडून जाईन, मोठ्या पर्वतांवर जाऊन बसेन आणि इंद्रधनुष्य जवळून पाहीन. मी पक्षी झाल्यावर वेगवेगळ्या झाडांवर बसेन आणि झाडांवरची गोड फळे खाईन. मी आकाशाशी मैत्री करीन, मी मुक्तपणे फिरेन. मी वरच्या आकाशातून जमीन कशी दिसते ते पाहीन आणि मी सर्वत्र बियाणे लावीन आणि झाडे तयार करीन.
लिहिते होऊया.
• नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर:
नदी व झाड या दोघांमधील संवाद
नदीः मी अशी खळखळ वाहते ना तेव्हा मला खूप आनंद होतो कारण माझ्यातील वाहणाऱ्या पाण्याने अनेक प्राण्यांची आणि पक्ष्यांची तहान पूर्ण होते.
झाड: खरंच फक्त प्राणी आणि पक्षी नाही तर या भूतलावरील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आम्ही झाडेच बघ ना. आमचं पूर्ण सौंदर्य हे तुझ्या वाहणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असते.
नदीः काही वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरील प्रत्येक नदी ही खळखळून वाहत होती. आणि फक्त पावसाळ्यातच नव्हे तर बाराही महिने नदी ही पृथ्वी तलावावरील सजिवांचे मन तृप्त करत होती.
झाडः पण माणसाच्या स्वार्थी वृत्ती मुळे आम्हा झाडांची कत्तल झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे निसर्गातील सर्व ऋतूंचा कालावधीच बदलला. झाडांची कत्तल झाली आणि त्यामुळे पावसाळ्यात देखील पाऊस पडत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे नदी पहिल्या सारखी वर्षभर वाहत नाही.
नदीः एवढेच नाही तर मनुष्याच्या लोभापायी अनेक कारखान्यांची निर्मिती झाली आणि त्या कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक द्रव्याने नदीचे पाणी खराब झाले. झाडः पूर्वी नदीला आई समान पुजले जायचे पण आज त्याच नदीत प्लास्टिक, रासायनिक पदार्थ फेकून तिची पवित्रता कमी केली.
नदीः मनुष्य जर असाच वागत राहिला तर लवकरच त्याचे पृथ्वीतलावरचे अस्तित्वच धोक्यात येईल. कारण मनुष्याचे अस्तित्व हे नदीचे आणि झाडांच्या अस्तित्वावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जर नद्याच नसतील तर पाणी कुठून येणार आणि झाडच नसतील तर शुद्ध हवा कशी मिळणार.
झाडः पृथ्वी तलावरील सजीवांच्या अस्तित्वासाठी नदीतील पाणी आणि जमिनीवरील झाड हे वाचवलेच पाहिजे.