Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १३ – मोठी आई

The author, in this lesson has described the greatness of our motherland and its soil, which nurtures us and bestows upon us innumerable gifts of life.

जिन्नस – वस्तू

तुळया – लोखंडाच्या जाड सळया

कडबा – कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग, वैरण

मातृभूमी – जन्मभूमी

प्रेमभाव बाळगणे – प्रेम असणे

स्‍वाध्याय

प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?

उत्तर: दगड, माती, विटा, चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात.

 

(आ) जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?

उत्तर: चांदी, रूपे, पितळ, तांबे, कथील, दगडी कोळसा, लोखंड इ. खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात.

 

(इ) कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?

उत्तर: लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात.

 

(ई) चुना कशापासून तयार करतात?

उत्तर: जमिनीत चुनखडीचे खडक असतात. या खडकांपासून चुना तयार करतात.

 

(उ) लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?

उत्तर: मातृभूमीतले अन्न खाऊन आपण शहाणे झालो, मोठे झालो. तिनेच माणसांना प्रत्येक गोष्ट दिली म्हणून मातृभूमीबद्दल आपण प्रेमभाव बाळगावा.

प्र. २. तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा. 

उत्तर: गहू, तांदूळ, जोंधळे, केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस, भाज्या, दूध, दही, तूप.

प्र. ३. आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: आपली मातृभूमी आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवते. तिच्यामुळेच आपल्याला आजारातून बरी करणारी औषधे मिळतात. आपली प्रत्येक गरज आपली मातृभूमी पूर्ण करते म्हणून जसा आपण आपल्या आईबद्दल प्रेमभाव बाळगतो तसाच आपल्या मातृभूमीबद्दलही प्रेमभाव बाळगला पाहिजे.

प्र. ४. ‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.

उत्तर: जमीन, भूमाता, धरणीमाता, मातृभूमी, भूमी, मायभूमी.

प्र. ५. ‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.

उत्तर: 

(अ) अन्नवस्त्र

(आ) भांडीकुंडी

(इ) चहासाखर

(ई) घरदार

(उ) दूध-दही

(ऊ) गाई-म्हशी

प्र. ६. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(अ) मातृभूमी – 

उत्तर: मयुभुमी

 

(आ) माया – 

उत्तर: प्रेम

 

(इ) वस्त्र –

उत्तर: कपडे

 

(ई) आई –

उत्तर: माता 

प्र. ७. हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.

प्र. ८. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे – 

उत्तर: साखर

 

(आ) मनुके – 

उत्तर: काळी द्राक्षे

 

(इ) भाकरी – 

उत्तर: तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका

 

(ई) चपाती –

उत्तर: गहू

 

(उ) वेफर्स –

उत्तर: बीटा, केळे, फणस

 

(ऊ) सॉस –

उत्तर: टमाटा 

 

(ए) सरबत –

उत्तर: लिंबू, कोकम, वाळा, जांभूळ, इत्यादी

 

(ऐ) चिक्की –

उत्तर: शेंगदाणा, तीळ, राजगिरा, चणा, काजू, इत्यादी

प्र. ९. खालील शब्दांचे अनेकवचन लिहा.

(अ) तुळई – 

उत्तर: तुळया

 

(आ) बिजागरी – 

उत्तर: बिजागऱ्या

 

(इ) झाड – 

उत्तर: झाडे

 

(इ) दागिना –

उत्तर: दागिने

 

(उ) कवठ –

उत्तर: कवठे

 

(ऊ) माती –

उत्तर: माती 

प्र. १०. खालील तक्ता भरा.

IMG 20231013 153234 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 153818 पाठ १३ – मोठी आई

प्र. ११. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.

उत्तर: नांगरणी, पेरणी, सिंचन, फवारणी, कापणी, मळणी, लावणी, झोडणी इत्यादी. जमिनीच्या वरचा थर भुसभुशीत करणे. त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे अशी मशागत करतात. त्यानंतर जमीन नांगरली जाते. त्यानंतर ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, वाफे तयार करणे, लावणी लावणे, पीक आल्यावर कापणी करणे त्यानंतर झोडणी करणे. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी ही सर्व कामे करतो.

प्र. १२. खालील तक्ता पूर्ण करा.

IMG 20231013 153256 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 153800 पाठ १३ – मोठी आई

प्र. १३. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.

उत्तर: 

IMG 20231013 161035 पाठ १३ – मोठी आई

प्र. १४. खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

IMG 20231013 153307 पाठ १३ – मोठी आई
IMG 20231013 153329 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 153924 पाठ १३ – मोठी आई
IMG 20231013 153345 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 153937 पाठ १३ – मोठी आई
IMG 20231013 153401 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 154047 पाठ १३ – मोठी आई

प्र. १५. माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

IMG 20231013 153416 पाठ १३ – मोठी आई

उत्तर: 

IMG 20231013 154122 पाठ १३ – मोठी आई

उपक्रम : आई, मातृभूमी या विषयावरील कवितांचा संग्रह करून त्या कवितांचे वर्गात वाचन करा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

प्रकल्प : शिक्षक किंवा पालकांच्या मदतीने जवळच्या शेताला भेट द्या. शेतात येणाऱ्या विविध पिकांचे निरीक्षण करून शेतातील अन्नधान्याबद्दल माहिती मिळवा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

खालील वाक्यांत (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.

उत्तर: “आवडले का तुला पुस्तक ?” आई म्हणाली.

 

(आ) तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.

उत्तर: “तो प्रामाणिक आहे.” बाबांनी सांगितले.

 

(इ) गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही

उत्तर: गणू म्हणाला, “अगं आई, उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही.”

 

(ई) अहाहा किती छान चित्र आहे

उत्तर: “अहाहा! किती छान चित्र आहे.”

 

(उ) तुला लाडू आवडतो का

उत्तर: तुला लाडू आवडतो का?

 

(ऊ) माझे काका मुंबईला राहतात

उत्तर: माझे काका मुंबईला राहतात.

 

(ए) मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले

उत्तर: मधू, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले.

वाचा

विचार करू लागला, ‘या सुविचारातून निसर्गाचे किती वास्तव स्वरूप दाखवले आहे.’

 

निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहीत आहे, घेणे नाही. झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, पशु, पक्षी, माती, चंद्र, सूर्य, तारे… निसर्गातील असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला असतात. आपल्याला निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये; पण त्याच्याकडून काही ओरबडून घेऊ नये. निसर्ग आपला मित्र आहे. आपण त्याचे मित्र का बनू नये?