Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ २६ – पतंग

ऐका. वाचा.

पतंग उडवू चला,

गड्यांनो, पतंग उडवू चला. 

 

रंग ढगांवर मावळतीचा, 

लाल पिवळसर किती मजेचा, 

झुळझुळ वारा नदीकाठचा, 

बाजुस डोंगरमळा.

 

करू चला सुरवात बरोबर, 

सोडा सोडा रीळ भराभर, 

पतंग चढवा हे वाऱ्यावर, 

ढगांस भेटायला.

 

मउमउ वाळुत पाय रोवुनी, 

देऊ झटका दोरा ओढुनि, 

पतंग जातिल वर वर चढुनी, 

पंख नको त्याजला.

 

जशी पाखरे आभाळात, 

पंख पसरुनी तरंगतात, 

दिसतिल तैसे पतंग रंगित, 

खेळ किती चांगला !

 

– अ. ज्ञा. पुराणिक

शब्दार्थ

त्याजला – त्याला

आभाळ – आकाश 

तरंगणे – हवेत उडणे

स्वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? 

उत्तर: सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो.

 

(आ) पतंग कोणासारखे तरंगतात?

उत्तर: पतंग पाखरांसारखे तरंगतात.

प्र. २. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

(अ) चढणे ×

उत्तर: उतरणे

 

(आ) ओढणे ×

उत्तर: सोडणे

 

(इ) मावळणे ×

उत्तर: उगवणे

 

(ई) मऊ ×

उत्तर: कठोर

 

(उ) चांगला ×

उत्तर: वाईट

 

(ऊ) भराभर ×

उत्तर: सावकाश

प्र. ३. खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

उदा., पिवळा पिवळसर.

(अ) काळा 

उत्तर: काळसर

 

(आ) निळा

उत्तर: निळसर

 

(इ) लाल

उत्तर: लालसर

प्र. ४. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

जशी _____ आभाळात,

_____ पसरुनी तरंगतात,

दिसतिल तैसे _____ रंगित,

खेळ किती _____!

उत्तर: 

जशी पाखरे आभाळात,

पंख पसरुनी तरंगतात,

दिसतिल तैसे पतंग रंगित,

खेळ किती चांगला !

प्र. ५. तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.

उत्तर: 

(१) कबड्डी 

(२) खो-खो

(३) क्रिकेट 

(४) हॉकी 

(५) फुटबॉल

प्र. ६. हे शब्द असेच लिहा.

झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.

प्र. ७. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

(अ) पळापळ, रडारड, पडापड.

उत्तर: धडाधड, भराभर, समोरासमोर, इ.

 

(आ) मऊमऊ, वरवर, कळकळ.

उत्तर: हळहळ, सळसळ, गरगर, वळवळ, खळखळ, वटवट, कटकट, इ.

 

(इ) रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत.

उत्तर: बारीकसारीक, आडवातिडवा, उरलासुरला, दगडविगड, गोडधोड, इ.

प्र. ८. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

(अ) मावळतीचा

उत्तर: मजेचा, नदीकाठचा

 

(आ) बरोबर

उत्तर: भराभर, वाऱ्यावर

 

(इ) रोवुनी

उत्तर: ओहुनि, चढुनी

 

(ई) आभाळात

उत्तर: तरंगतात, रंगित

प्र. ९. गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा. चेंडू झेलणे.

वाक्ये 

(१) मी चेंडू झेलतो.

(२) शिवानी चेंडू झेलते.

IMG 20230920 231037 पाठ २६ – पतंग

(१) मी चेंडू झेलतो.

वाक्ये – 

१. मी चेंडू उचलला

२. सोहमने चेंडू उचलला.

 

(२) शिवानी चेंडू झेलते.

वाक्ये – 

१. तो चेंडू उडवतो.

२. मानसी चेंडू उडवते.

 

(३) चेंडू पकडणे.

वाक्ये – 

१. अथर्व चेंडू पकडतो.

२. सायली चेंडू पकडते.

 

(४) चेंडू विकत घेणे.

वाक्ये – 

१. आकाशने चेंडू विकत घेतला.

२. आरतीने चेंडू विकत घेतला.

 

(५) चेंडू विकणे.

वाक्ये –

१. सागर चेंडू विकतो.

२. सारा चेंडू विकते.

 

(६) चेंडू फेकणे.

वाक्ये – 

१. मानसने चेंडू फेकला.

२. मानसीने चेंडू फेकला.

 

(७) चेंडू टाकणे.

वाक्ये –

१. विहंग चेंडू टाकतो.

२. विधी चेंडू टाकते.

वाचा. लक्षात ठेवा.

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.