Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ २१ – छोटेसे बहीणभाऊ

ऐका. याचा. म्हणा.

छोटेसे बहीणभाऊ,

उद्याला मोठा होऊ

उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला 

नवीन आकार देऊ,

 

होतील सुंदर बागा,

ओसाड, उजाड जागा, 

शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना, 

नवीन बहार देऊ

 

मोकळ्या आभाळी जाऊ,

मोकळ्या गळ्याने गाऊ,

निर्मळ मनाने, आनंदराने,

आनंद देऊ अन् घेऊ

 

प्रेमाने एकत्र राहू,

नवीन जीवन पाहू

अनेक देशांचे भाषांचे, बेशांचे, 

अनेक एकच होऊ.

 

– वसंत बापट