पाठ ११ – इंधनबचत
स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) हा संवाद कोठे झाला?
उत्तर: हा संवाद स्वयंपाकघरात झाला.
(आ) संवादात किती पात्रे आहेत?
उत्तर: संवादात दिनू व फातिमा अशी दोन पात्रे आहेत.
(इ) दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तर: दिनूला इंधनबचतीचे महत्त्व पटले.
प्र. २. खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्ये वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.
उत्तर: इंधन बचतीचे आणखी काही मार्ग,
(१) गरज नसताना पंखे, लाईट बंद करावी.
(२) स्वयंपाक बनवताना प्रेशर कुकरचा वापर करावा.
(३) वाहनांचा वेग मर्यादित असावा.
(४) गॅसवर कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची आ करून ठेवल्याने गॅसची बचत होईल.
प्र. ३. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.
उत्तर: कोळसा, रॉकेल, लाकडे, शेण, गॅस, सूर्यप्रकाश यांपैकी सौरपेटी हे सूर्यप्रकाशावर सौरऊर्जेवर चालणारे साधन वापरल्यास सर्वात जास्त इंधनबचत होते.
वाचू आणि हसू
सनी: आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा !
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!