Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ १२ – बोलावे कसे ?

स्वाध्याय

प्र. १. अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा. 

(अ) तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.

उत्तर: अशा वेळी स्वतः उभे राहून त्या वृद्ध व्यक्तीला बसण्यासाठी जागा देऊ.

 

(आ) लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत. 

उत्तर: अशा वेळी स्वतः उभे राहून त्या काकूंना बसण्यासाठी जागा देऊ.

 

(इ) तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.

उत्तर: त्या व्यक्तीशी चांगल्याप्रकारे संवाद साधून त्यांच्याविषयी सगळी माहिती विचारून, त्यांच्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे नम्रपणे देऊ.

 

(ई) एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.

उत्तर: त्या व्यक्तीची अडचण समजून त्या व्यक्तीला योग्य पत्ता सांगून त्याला मदत करू.

 

(उ) तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो. 

उत्तर: त्या मुलाला शाळेत जाताना व परत येताना बरोबर घेऊन जाऊ. त्याची बॅगही घेऊन त्याला मदत करू.

प्र. २. खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती, वस्तु, गुण यांच्या नावांना ‘नाम’ असे म्हणतात.

प्र. ३. खालील वाक्यांतील नामे ओळखा. त्यांखाली रेप ओवा.

(अ) हॅलो काका, मी संजू बोलतोय. 

उत्तर: हॅलो काका, मी संजू बोलतोय. 

 

(आ) आजी, तुम्ही या जागेवर बसा.

उत्तर: आजी, तुम्ही या जागेवर बसा.

 

(इ) दिनेश हा गुणी मुलगा आहे.

उत्तर: दिनेश हा गुणी मुलगा आहे.

प्र. ४. खालील वाक्यांत योग्य नामे लिहा.

(अ) _____ हा माझा जिवलग मित्र आहे.

उत्तर: विजय

 

(आ) माझ्या दप्तरात _____, _____, _____ या वस्तू आहेत. 

उत्तर: वही, पुस्तक, पेन

प्र. ५. खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा. 

उदा., ओल – ओलावा.

IMG 20230920 002513 पाठ १२ – बोलावे कसे ?

उत्तर: 

(१) माया – मायाळू 

(२) कष्ट – कष्टाळू

(३) गोड – गोडवा

(४) लहान लहानपण

(५) चपळ – चपळाई / चपळता 

(६) मोठे – मोठेपण

वाचा

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे. 
  • आपली चूक असेल, तर मोठ्या मनाने ती कबूल करावी.