Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ ८ – कोणापासून काय घ्यावे ?

ऐका. वाचा.

सूर्यापासून रंग घेउया

चंद्रापासून शांती,

चमचमणाऱ्या ताऱ्यापासुन 

दिव्य घेउया कांती.

 

फुलापासुनी गंध घेउया

कोकिळाकडुन गाणे,

झुळझुळणाऱ्या झऱ्यापासुनी 

घेऊ नवे तराणे.

 

झाडापासुन घेउ सावली 

मातीपासुन जगणे, 

गडगडणाऱ्या ढगापासुनी 

घेऊ जीवनगाणे.

 

प्रभातकाळी एक शिकूया

जगवित जीव जगूया,

संध्यासमयी एक होउनी

सारे मित्र हसूया.

 

– निलम माणगावे

शब्दार्थ

कांती – तेज 

प्रभातकाळ – पहाट, सूर्योदयाचा काळ

संध्यासमयी – संध्याकाळी

स्वाध्याय

प्र. १. रिकाम्या जागा भरा.

(अ) _____ घेउ सावली.

_____ पासुन जगणे.

उत्तर: झाडापासुन घेउ सावली.

मातीपासुन जगणे.

 

(आ) _____ एक शिकूया. 

_____ जीव जगूया.

उत्तर: प्रभातकाळी एक शिकूया. 

जगवित जीव जगूया.

प्र. २. कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

(अ) सूर्य 

उत्तर: रंग

 

(आ) चंद्र

उत्तर: शांती

 

(इ) तारा

उत्तर: कांती

 

(ई) फूल

उत्तर: गंध

 

(उ) कोकीळ

उत्तर: गाणे

 

(ऊ) झरा

उत्तर: नवे तराणे

 

(ए) झाड

उत्तर: सावली

 

(ऐ) माती

उत्तर: जगणे

प्र. ३. कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा.

उत्तर: 

छमछम

घणघण

हमदम

फडफड

टकटक 

मटमट

चटचट

लटलट

पकपक

कडकड