पाठ ६ – आभाळाची अम्ही लेकरे
आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
अर्थ : पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही बाळे आहोत. पिके देणारी ही काळी माती आमची आई आहे. आभाळ आमचा पिता व धरती आमची माता आहे. आम्ही निसर्गाची वाळे आहोत. याशिवाय आमची जात वेगळी नाही. याशिवाय आमचा धर्म निराळा नाही.
English Translation:
We are children of the raining sky. This black soil that produces crops is our mother. Sky is our father and earth is our mother. We are nature’s hair. Apart from this our caste is not different. Apart from this, our religion is not unique.
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही ।।
अर्थ : श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हां कष्टकऱ्यांची वस्ती आहे. कष्ट आम्हांला गंगेसारखे पवित्र आहेत. आम्ही सर्व कष्टकरी आहोत. याशिवाय आम्हांला निराळे नाव नाही की वेगळे गाव नाही.
English Translation:
On the banks of the laborious Ganga we have a settlement of laborers. Hardships are as sacred to us as the Ganges. We are all hard workers. Apart from this, we do not have a unique name or a distinct village.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही ।।
अर्थ : घाम गाळून, अतोनात कष्ट करून काम करायचे ही एकच निष्ठा आम्हांला माहीत आहे. कष्ट करणे आमचे इमान आहे. याशिवाय आम्हांला वेगळे कर्म नाही. यापेक्षा वेगळा आमचा मार्ग नाही. इमानाने कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे.
English Translation:
The only loyalty we know is to work hard and sweat. It is our faith to work hard. Apart from this we have no separate karma. There is no other way for us. To work hard with faith is our only karma, the only way.
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
अर्थ : आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो. आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत. आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. यापेक्षा वेगळा आमचा संप्रदाय नाही. याशिवाय आमचा साधुपुरुष नाही. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे.
English Translation:
We cherish the unbreakable bond of humanity. We are our destiny makers. We are going to save ourselves. Our denomination is not different from this. Apart from this, we do not have a sadhu purush. Humanity is our creed and saint.
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ।।
अर्थ : कोट्यवधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाजनिर्मितीचा जगन्नाथाचा रथ ओढून नेणार आहोत. यापेक्षा वेगळी आमची कोणतीही इच्छा नाही. याहून वेगळा आमचा कोणताही ध्यास नाही. (एकजुटीने सामाजिक कार्य करणे, हे आमचे ध्येय आहे.)
English Translation:
With the strong hands of crores of Indians, we are going to pull Jagannath’s chariot of a new society. We have no other desire. We have no other obsession. Our mission is to do social work together.
तीर - किनारा.
इमान – निष्ठा.
ठावे – माहीत असणे.
अभंग – अखंड.
आस – इच्छा.
स्वाध्याय
प्र. १. खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा-
उत्तर: तीर
(आ) इच्छा-
उत्तर: आस
(इ) अखंड-
उत्तर: अभंग
(ई) आकाश-
उत्तर: आभाळ
प्र. २. कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
(अ) घाम गाळुनी काम करावे
(आ) अम्हीच अमुचे भाग्यविधाते
(इ) जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
प्र. ३. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
(अ) माणुसकीचे अभंग नाते
(आ) कोटि कोटि हे बळकट बाहू.
प्र. ४. ‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर: मानवता हा आमचा धर्म आहे. माणुसकीचे व आमचे अतूट नाते असल्यामुळे कोणत्याही एका संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी आमची बांधिलकी नाही किंवा कोणत्याही एका संताचा उपदेश आम्हांस शिरसावंदय नाही. मानवता हाच आमचा पंथ व संत आहे. खरे तर आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत. आम्हीच आमचे उद्धारकर्ते आहोत.
प्र. ५. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:
(अ) आई – नाही
(आ) ठावे – करावे
(इ) तीरावरती – वसती
(ई) नाते – भाग्यविधाते
प्र. ६. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही ।।
उत्तर: कष्टकरी म्हणतात, शेतात राबणारे शेतकरी म्हणतात – आम्ही आभाळाची बाळे आहोत. आभाळाची बापासारखी आमच्यावर माया आहे. पावसाचे छत्र तो आम्हांवर पांघरतो आणि भरघोस पिके देणारी काळी माती आमची आई आहे. आभाळ पिता आणि धरती माता आहे. आम्ही निसर्गाची मुले आहोत. आमची जात व धर्म वेगळा नाही. निसर्ग हाच आमचा धर्म.
(आ) इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम कराव
उत्तर: कष्टकरी म्हणतात – घाम गाळून, अतोनात कष्ट करून राबायचे, काम करायचे ही एकच निष्ठा आमची आहे. कष्ट करणे आमचे इमान आहे, याशिवाय वेगळे कर्म आमचे नाही. प्रामाणिकपणे कष्टाची भाकर खाणे, हे आमचे काम आहे, जीवनमार्ग आहे.
भाषेची गंमत
भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा.,
(१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्येलिहा व त्यातील गंमत समजून घ्या.