पाठ ७ – नातवंडांस पत्र
गिरिस्थान – पर्वतावरील ठिकाण.
नजराणा – मौल्यवान भेट.
सबब – कारण.
स्वाध्याय
प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
(इ)
उत्तर:
प्र. २. एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) लेखक जेथे शिकले ते गाव
उत्तर: सांगली
(आ) लेखकाला मिळालेला पुरस्कार
उत्तर: अर्जुन पुरस्कार
(इ) खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण
उत्तर: जिम
(ई) लेखकाचा आवडता खेळ
उत्तर: बॅडमिंटन
प्र. ३. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर: कोणता ना कोणता खेळ खेळणे हा सुद्धा एक प्रकारचा व्यायाम आहे. वेळ नाही अशी किंवा कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम हा दररोज सेवन केलेल्या अन्नपाण्यासारखाच आहे. व्यायाम हा खुल्या मैदाना- तील असो किंवा एखाद्या क्लबमधील असो किंवा खास व्यायामशाळेतील असो, प्रत्येकाने कमीत कमी एक-दोन तास व्यायाम हा करायलाच हवा. व्यायामाने मन व शरीर तंदुरुस्त राहते व जीवन आरोग्यदायी ठरते. व्यायामाने तनामनात उत्साह संचारतो.
(आ) खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: कोणताही आवडता खेळ खेळायला हवा. खेळ खेळण्यामुळे आपल्या जीवनाला शिस्त लागते. कोणत्याही समस्येशी मुकाबला कसा करायचा हे खेळ शिकवतो. हरलो तरी जिगरबाजपणे कसे हरावे व जिंकलो तर आनंद कसा घ्यायचा हेही खेळच शिकवतो. यासाठी स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हावे लागते. प्रत्येक खेळातील पडताळा जसा आपला आपणच घेतो, त्याप्रमाणे आयुष्यातही चांगले- वाईट काय आहे, याची निर्णयक्षमता खेळ वाढवत असतो. त्यासाठी स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. आपण स्वतः स्वावलंबी व्हायला हवे. खेळ आपल्याला स्वावलंबन शिकवतो व आपली निर्णयक्षमता वाढवतो.
प्र. ४. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
उत्तर: दरवर्षी गणपतीसाठी गावी जाण्याची आपली परंपरा आहे. गेल्या वर्षी या निमित्ताने कोकणात जाण्याची वेळ आली होती. चांगला पाऊस पडल्याने डोंगर हिरवा शालू पांघरून लख्ख प्रकाशात उभा होता. कोकणातील सूर्योदय पाहण्याचा आनंद काही औरच असतो. पूर्वेकडे पसरलेला लालसर गुलाबी रंग मनमोहक आहे. शेतीची कामे जोरात सुरू आहेत. काका-भावंडांसह नदीवरची नियोजित सहल, नदीचे थंडगार पाणी, वर निरभ्र आकाश म्हणजे दुधात साखरेचा योग.
भाषेची गंमत
(अ) खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
(आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
(१) सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.
(२) चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.
उत्तर:
चर्चा करूया
‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.
लिहिते होऊया.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
उत्तर:
‘माझा आवडता खेळ’
बास्केटबॉल हा माझा आवडता खेळ आहे. मला खेळण्याचा थरार आवडतो, जिथे दोन संघ विरोधी संघाच्या हूपमध्ये चेंडू टाकून गोल करण्याचे लक्ष्य ठेवतात. खेळ, सर्वसाधारणपणे, शारीरिक क्रियाकलाप, टीमवर्क आणि रणनीती यांचा एक परिपूर्ण संयोजन देतात जे मला व्यस्त आणि तंदुरुस्त ठेवते.
एनबीए गेम्स, विशेषतः दिग्गज मायकेल जॉर्डन पाहून मला बास्केटबॉल खेळण्याची प्रेरणा मिळाली. आज, लेब्रॉन जेम्स माझा आदर्श म्हणून काम करतो, मला कोर्टात आणि बाहेर महानतेसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतो.
बास्केटबॉलमध्ये सुधारणा करण्यासाठी समर्पित सराव, नेमबाजी, ड्रिब्लिंग आणि बचाव यासारख्या कौशल्यांचा सन्मान आवश्यक आहे. मी ट्यूटोरियल पाहतो, खेळाचा अभ्यास करतो आणि माझे तंत्र सुधारण्यासाठी अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन घेतो.
बास्केटबॉल खेळण्याचा आनंद अतुलनीय आहे. एड्रेनालाईन गर्दी, गेम जिंकणारे शॉट्स आणि सहकाऱ्यांसोबतचे सौहार्द एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करतात. हे मला टीमवर्क, शिस्त आणि लवचिकता शिकवते, ते माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवते.
वाचा.
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.
नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.
यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो.
असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.
उत्तर:
शीर्षक: सकारात्मक मनाचे सामर्थ्य