Maharashtra Board Textbook Solutions for Standard Eight

पाठ ३ – प्रभात

हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात

कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

 

अर्थ : तंत्रज्ञानाच्या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचा, विदधेचा प्रकाश पसरला आहे. कलागुणांच्या क्षितिजावर ही नवनिर्मितीची सकाळ उगवली आहे.

 

English Translation:

The light of knowledge and wisdom has spread in the sky of the new age of technology. This dawn of innovation has dawned on the horizon of talent.



भव्य पटांगण, बाग मनोहर

फुला-पाखरांचे जग सुंदर 

आपुलकीचा सुवास पसरे

मनामनांतून इथे निरंतर. 

गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,

कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

 

अर्थ : भव्य प्रांगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे. जणू ही सुंदर बाग फुलली आहे. फुले व पाखरे यांसारख्या माणसांचे हे सुंदर जग आहे. इथे स्नेहाचा, प्रेमाचा सुगंध पसरलेला आहे. या स्पर्धेच्या जमान्यात आपल्या गुरुजनांनी आपल्याला अनमोल शिकवण दिली आहे. जणू कलागुणांच्या क्षितिजापाशी ही प्रतिभेची सकाळ उजाडली आहे.

 

English Translation:

This is our vast motherland like a grand courtyard. As if this beautiful garden has blossomed. This is a beautiful world of people like flowers and birds. The fragrance of affection and love is spread here. In this age of competition, our teachers have given us valuable lessons. It is as if the morning of talent has dawned on the horizon of talent.



पायाभरणी अस्तित्वाची 

प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, 

तन सुदृढ, मन विशाल होई 

इथे रुजवणूक त्या तत्त्वांची

विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,

कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

 

अर्थ : स्वतःचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी ही व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते आणि मन विशाल होते. थोर मूल्यांचे थोर तत्त्वज्ञानांचे इथे रोपण होते. आमच्या नसानसांत, रंध्रारंध्रांत तीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. कलागुणांच्या क्षितिजावर आता नवनिर्मितीची प्रभात होत आहे.

 

English Translation:

It is a laboratory of personality formation to strengthen one’s existence. Here the body is healthy and wholesome and the mind is vast. Great values ​​and great philosophies are implanted here. The same precious ideology flows like blood in our veins and pores. Innovation is now dawning on the horizon of talent.



नवीन स्वप्ने, नवीन आशा

ही प्रगतीची नवपरिभाषा,

परिश्रमाने, अभ्यासाने

उन्नत बनवू आपल्या देशा.

मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात

कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

 

अर्थ : इथल्या मनामनांत नवीन स्वप्ने रुजली आहेत. नवीन उमेद, नवीन आशा फुलते आहे. प्रगतीची ही नवीन व्याख्या आम्ही दृढ केली आहे. अपार कष्टाने व अविरत अभ्यासाने आमच्या देशाला आपण प्रगतिशील बनवूया. सारे भेदभाव मिटवून माणुसकीचे नवीन युग आणूया. कलागुणांच्या या क्षितिजावर नवनिर्माणाची सकाळ झाली आहे.

 

English Translation:

New dreams have taken root in the minds here. New hope, new hope is blooming. We have solidified this new definition of progress. Let us make our country progressive with immense hard work and continuous study. Let’s eradicate all discrimination and usher in a new era of humanity. Innovation has dawned on this horizon of talents.

क्षितिज – आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा. 

मनोहर – सुंदर. 

निरंतर – सतत. 

प्रयोगशाळा व्यक्तित्वाची – व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे ठिकाण. 

नवपरिभाषा – नवीन व्याख्या. 

उन्नत – विकसित.

स्‍वाध्याय

प्र. १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?

उत्तर: कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे.

 

(आ) कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?

उत्तर: कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ, मन विशाल, तत्त्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते.

 

(इ) प्रगतीची नवपरिभाषा कोणती? 

उत्तर: नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

प्र. २. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.

(अ) सुंदर जग → कोणाचे 

उत्तर: फुला पाखरांचे

 

(आ) पसरणारा सुवास → कशाचा 

उत्तर: आपुलकीचा

 

(इ) अमूल्य शिकवण → कोणाची 

उत्तर: गुरुजनांची

 

(ई) पायाभरणी → कशाची 

उत्तर: अस्तित्वाची

प्र. ३. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

(अ) कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण

(१) सूर्योदय होऊन सकाळ झाली.
(२) नवे युग उजाडले.
(३) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
(४) पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.

 

उत्तर: (३) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

 

(आ) कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे-

(१) मानवांचे युग.
(२) नव्या विचारांचे युग.
(३) माणसाच्या प्रगतीचे युग.
(४) भेदाभेद नसलेले युग.

 

उत्तर: (४) भेदाभेद नसलेले युग.

प्र. ४. योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात
(अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात
(आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची
(इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा
(ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात

उत्तर:

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात
(ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात
(२) प्रतिभेची प्रभात
(इ) नवनिर्मितीची पहाट
(३) पायाभरणी अस्तित्वाची
(आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा
(अ) व्यक्तित्वाची जडणघडण

प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तर लिहा.

(अ) ‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

उत्तर: जिथे व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, अशा प्रयोगशाळेत रुजू झाल्यावर व्यक्तित्वात काय बदल होतात हे सांगताना कवी म्हणतात शरीर हे निरोगी होते, – आरोग्यदायी व सुदृढ होते. शरीराला आजार स्पर्श करीत नाहीत. मनातील सर्व जळमटे दूर होऊन मन स्वच्छ होते. मनात मानवतेचा रहिवास होतो आणि ते विशाल होते. मन सात्त्विक होते. मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाहीत. सर्व दुर्गुणांचा निचरा होतो.

 

(आ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.

उत्तर: या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचे तेज पसरल्यावर व नवनिर्मितीची प्रभात झाल्यावर देशाच्या उज्ज्वल भवितव्याची खूण पटेल हे समजावून सांगताना कवी म्हणतात की नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे. आपल्या अपार कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नत होईल. भेदाभेद नसलेल्या या मानवतेच्या युगात देश प्रगतिपथावर जाईल. हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे. ही भरभराटीची व उत्कर्षाची नवीन परिभाषा आहे.

 

(इ) ‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थलिहा.

उत्तर: नवीन स्वप्ने उराशी बाळगून, नवीन आशेने पल्लवित होऊन प्रगतीची नवीन व्याख्या करूया असा तरुणपिढीला सल्ला देताना कवी म्हणतात – आपल्या मेहनतीने व गाढ अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर आपल्यातील हेवेदावे, भेदाभेद हे सर्व मिटवून टाकायला हवेत; तरच माणुसकीचे युग अवतरेल. मानवतेचे युग निर्माण करूया; त्यासाठी परस्परांतील विषमतेचे विष धुडकावून लावूया. सर्व समान आहेत हा विश्वास रुजवूया.

प्र. ६. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

(अ) नभात –

उत्तर: प्रभात – युगात

 

(आ) मनोहर –

उत्तर: सुंदर – निरंतर

 

(इ) अस्तित्वाची –

उत्तर: व्यक्तित्वाची – तत्त्वांची

 

(ई) युगात –

उत्तर: प्रभात – रगारगांत

खेळूया शब्दांशी

(अ) खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

(अ) आकाश –

उत्तर: नभ

 

(आ) सुगंध –

उत्तर: सुवास

 

(इ) सुंदर –

उत्तर: मनोहर

 

(ई) शरीर –

उत्तर: तन

(आ) विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) भव्य
(अ) मन
(२) अमूल्य
(आ) युग
(३) नवे
(इ) शिकवण
(४) सुंदर
(ई) पटांगण
(५) विशाल
(उ) जग

उत्तर:

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) भव्य
(अ) मन
(२) अमूल्य
(आ) युग
(३) नवे
(इ) शिकवण
(४) सुंदर
(ई) पटांगण
(५) विशाल
(उ) जग

उपक्रम : ‘सुदृढ शरीर’ बनवण्यासाठी खालील मुद्‌द्यांना अनुसरून माहिती मिळवा व वर्गात त्याचे वाचन करा. 

(१) व्यायाम

(२) सवयी

(३) आहार

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.